किंकाळी

(0)
  • 18
  • 0
  • 459

पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात,चाळीशीच्या घरातला, एक हसऱ्या, आनंदी चेहेऱ्याचा जाडगेला माणूस पाणिनीला भेटायला आला. सौंम्याने त्याची पाणिनीशी ओळख करून दिली. “ हे मिस्टर धुरी म्हणून आहेत.” पाणिनीने त्याला नमस्कार केला आणि बसायला सांगितलं. “ तुमच्या बद्दल मी बरंच ऐकलंय, वाचलंय. पण तुमची भेट घ्यायला लागेल असं वाटलं नव्हतं.” तो म्हणाला. “ म्हणजे मना विरुद्ध किंवा नाईलाजाने भेटावं लागतंय ?” पाणिनीने विचारलं “ तसंच नाही अगदी पण माझ्या बायकोचा आग्रह आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुम्ही माझी उलट तपासणी घ्यावी. ” धुरी म्हणाला.

New Episodes : : Every Sunday

1

किंकाळी प्रकरण 1

किंकाळी.......प्रकरण १पाणिनी पटवर्धनच्या ऑफिसात,चाळीशीच्या घरातला, एक हसऱ्या, आनंदी चेहेऱ्याचा जाडगेला माणूस पाणिनीला भेटायला आला.सौंम्याने त्याची पाणिनीशी ओळख करून दिली.“ मिस्टर धुरी म्हणून आहेत.”पाणिनीने त्याला नमस्कार केला आणि बसायला सांगितलं.“ तुमच्या बद्दल मी बरंच ऐकलंय, वाचलंय. पण तुमची भेट घ्यायला लागेल असं वाटलं नव्हतं.” तो म्हणाला.“ म्हणजे मना विरुद्ध किंवा नाईलाजाने भेटावं लागतंय ?” पाणिनीने विचारलं“ तसंच नाही अगदी पण माझ्या बायकोचा आग्रह आहे की मी तुम्हाला भेटावं आणि तुम्ही माझी उलट तपासणी घ्यावी. ” धुरी म्हणाला.“ कोर्टात प्रकरण आहे? घटस्फोटाचं वगैरे?”“ छे: हो ! बायको आणि मी एकत्रच राहतोय प्रेमाने संसार चाललाय.”“ मग उलट तपासणीचा विषय कुठे येतो?” पाणिनीने ...Read More