सात मैल चार फर्लांग रस्ता

(8)
  • 11.4k
  • 0
  • 4.2k

नावळे दस्तुरी नाका ते चिवारी चवाठा सात मैल चार फर्लांग रस्त्या बांधायचं कंत्राट चिवारीतल्या भाऊघाट्याने घेतलं ही वार्ता पसरल्यावर जानशी, कुवेशी, नावळे, चिवेली आणि हरचली यापाच गावातल्या पैसेवाल्या असामीना अगदीपोटशूळ उठला. हरचलीचा बळी भंडारी, कुवेशीतला बाबुराव देसाई आणि नावळे मुसलमान वाडीतला इद्रूसकोळशेकर हे सिलीपाट आणि खुटवळाचा धंदा करीत. देसायाचा पावसाळी काठ्या- बांबूचा मोठा धंदा होता. तो खाडी काठच्या सहा सात गावानी फिरून आगाऊ बयाणा देवून गावागावानी मुख्य रस्त्याच्या कडेला आवती, मलकी काठ्यांचे थप मारून ठेवीत असे. पाऊस सुरू झाल्यावर साधारण महिनाभरात बेटांची तोड होत असे. काठीची लांबी किती भरते त्या प्रमाणात नऊहाती तीन तोडे आणि चवथा तोडा सात किंवा सहा हाती भरेल तसा मारून वीस वीस तोड्यांची बंडलं काठीच्या बेळाने बांधून वाडी वाडीवार रस्त्याच्या कडेला एकत्र करून थप मारलेले असत.

1

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग १ नावळे दस्तुरी नाका ते चिवारी चवाठा सात मैल चार फर्लांग कंत्राट चिवारीतल्या भाऊघाट्याने घेतलं ही वार्ता पसरल्यावर जानशी, कुवेशी, नावळे, चिवेली आणि हरचली यापाच गावातल्या पैसेवाल्या असामीना अगदीपोटशूळ उठला. हरचलीचा बळी भंडारी, कुवेशीतला बाबुराव देसाई आणि नावळे मुसलमान वाडीतला इद्रूसकोळशेकर हे सिलीपाट आणि खुटवळाचा धंदा करीत. देसायाचा पावसाळी काठ्या- बांबूचा मोठा धंदा होता. तो खाडी काठच्या सहा सात गावानी फिरून आगाऊ बयाणा देवून गावागावानी मुख्य रस्त्याच्या कडेला आवती, मलकी काठ्यांचे थप मारून ठेवीत असे. पाऊस सुरू झाल्यावर साधारण महिनाभरात बेटांची तोड होत असे. काठीची लांबी किती भरते ...Read More

2

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 2

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग २ बापयांच्या फैलातले निम्मे गडी सुरुंगघालूक पाव हिश्शान गडी फोड कामारनी उरलेले नी बायल मान्सा भर घालूक ठेवायाची. माजो अंदाज दोन आणे दुकू चुकणार नाय. बाबल्याच्या अंदाजावर भाऊचा पूर्ण विश्वास होता. तो हातातल्या चोपडीत गड्यानी केलेल्या अंदाजाप्रमाणे नोंदीकरीत होता. ही चर्चा होईतो साडेबारा होवून गेले होते. लांबून जेवणकरी येताना दिसला. कामाचा अंदाज घेईतो संध्याकाळ होणार याची कल्पना असल्यामुळे गड्यांसह सात जणांच जेवण घेवून गडीपाठवायची आगावू व्यवस्था भाऊनी केलेली होती. आंब्याच्या सावलीत बसूनतांदुळाच्या भाकऱ्या काळ्या वाटाण्याची उसळ, खारातल्या मिरच्या नी दही खाल्ल्यावर सगळ्यानी पान जुळवून जरा आराम ...Read More

3

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 3

धाकू नी बाबल्या हे इमानी होते. कामगारांवर त्यांचा चांगलाच वचक होता. जरा कोणी दुर्लक्ष हलगर्जीपणा करताना आढळला तर दोघेही फैलावर घेत. “तीन सीजन पुरणारा ह्या काम भाऊंच्या म्हेरबानीन मिळालेला हा. ह्या काम चांगला झाला तर भाऊंची पत वाढात नी आणकी आणकी कामा तेंका मिळती. ते तगले तर आपल्याक कायमचे रोजमुरो मिळात. तवा आपल्या घरचा समजून आंग मोडून काम करूक व्हया...... भाऊ काय सदी आमच्यार नदर करूक ऱ्हवणार नाय. पन आमी तेचे मुखत्यारी आसंव ... इला काय नी ग्येला काय असला हलगर्जीपान आमका खपणार नाय. आमका ह्या सांग़ॉची येळच येवक् देव नुको....... ” हे त्यांचं सांगणं असे. येण्या जाण्याच्या वेळा ...Read More

4

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 4

रस्त्याचं काम हे भाऊच्या आहारा बाहेरचं. तो काय पैशाची मोट बांधून बसलेला सावकार गडी थोडाच होता? एवढी मोठी गडी फैलं सांभाळायची म्हणजे काय चेष्टा नव्हे. महिना दोन महिने गेल्यावर कामगार मजुरीला हात पगळणार. सरकारी पैसा काय झटपट थोडाच मिळणार? सरकारी काम नी सहा महिने थांब अशी लांबड लागणार. एकदा पत गेली विषय संपला. म्हणून ह्या व्यवहारात भाऊने चार आणे ? आठ आणे भागीदारी आपल्याला द्यावी. खर्च सगळा आपण उचलू. मात्र या कामात खुटवळ नी सिलीपाट असेल तो सगळा बळीला द्यायचा. ती रक्कम वजा करून राहिलेली रक्कम जेंव्हा कधी सरकारी पैसा येईल तेंव्हा सावकाश मिळाली तरी चालेल. असा प्रस्ताव बळीने ...Read More

5

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 5

काम सुरू होते तिथे आजू बाजुला धवडाचं काटं , मोंड्यांची खरी आणि बाणे , येरम यांच्या खरी होत्या. (खरी खोलगट कातळी भागात ४/५आंगूळे ते वीतभर उंच मातीची भर घालून केलेले शेत मळे) कवळाच्या भाऱ्यांची निर्गत लावायची जबाबदारी भाऊनी धाकू नी बाबल्या यांच्यावर सोपवली. चार दिवसानी रत्नागिरी गाठून त्यानी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचे वर्दी दिली. साहेब त्यावेळी रजेवर होते. पण अव्वल कारकूनाने प्रोसिजर प्रमाणे विहीत नमुन्यात कम्प्लायन्स रिपोर्ट तयार करून त्यावर भाऊंच्या सह्या घेवून तो दाखल करून घेतला. प्रोसिजर प्रमाणे केलेल्या कामाची पाहाणे करून ते कंत्राटात दिलेल्या अटीशर्थी प्रमाणे झाले आहे की नाही याची पडताळणी करून त्याचा फेव्हरेबल व्हेरिफिकेशन ...Read More

6

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 6

घरी गेल्यावर भाऊनी पिशवी कपाटात ठेवून कुलुप घातलं. त्या पंच क्रोशीतली काही मंडळी पैसेवाली होती हे भाऊ ऐकून होते. खोतानी बसल्या बैठकीत इतकी मोठी रक्कम आपल्या शब्दा सरशी कसलाही बियादा न सांगता कशी काय दिली हे भाऊना कोडंच वाटलं. जेवणं झाल्यावर भांडी घासायला आलेल्या काशी बाणणीला बाबल्याला भेटायला ये असा निरोप सांगायला पाठवली. बाबल्या आला. त्याला सोबत घेवून गोठ्यात जाताना ते म्हणाले, “ घरात जोकमीची वस्तू हा..... आता मी सांगासर तू चोवीस तास जेवणा खाण्यासकट माझ्या घरीच ऱ्हवायचा...... ” संध्याकाळी ते बर्वे मास्तराना भेटायला गेले, त्याना सादिलात काय विषय आहे तो सांगितल्यावर त्यानी रत्नागिरीला जायचा ...Read More

7

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 7

आनी दुसरा म्हनशा तर आवंदाजग दुनियेत लय बागांची कामासुरू हायेत..... इतक्या सगल्यान्ला थोडाच गिराईक भेटनार हाय.....तिकडे गडा पासून (विजयदुर्ग) कुनकेसूर पावत बागांची लय कामा चल्लेलीआशेत.... तकडे दो दोन वर्सा खुटवळपडून आशे. तेनला गिराईक बी भेटतनाय..... तुमचे कमीच तरी वीसावर पाचलोड आशेत येवडा म्हाल उकलन्याचीशामत इकडच्या भागात तरीकोन येपारी माला दिसत नाय......तुमी इचार करा जुम्मादिन झाल्यावर मी खेप करीन तवा काय तां नक्की सांगा....” अशी भीती दाखवून इद्रूस उठून गेला. ठोक व्यापाऱ्यांची व्यवहार करायची नीतीआणि बोलण्याची ठराविक पद्धत होती. एकतर धंद्यात मुरलेले व्यापारीसर्व सामान्याला बेअक्कल समजून त्याच्या मालाची जमेल तेवढी केंड करून त्याला बुचकळ्यात पाडीत. माल कमी असेल तर ...Read More

8

सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 8

शामराव दुसऱ्या ट्रीप च्या वेळी पन्नास पोती कांदा घेवून आला. दर खूप कमी होता भरताड करणाऱ्या फैलातल्या गड्यानी हातोहात पोती संपवली. त्यानंतर दर तीन चार दिवसाआड दोन दोन लोड भरायचं काम शिस्तीत सुरू होतं. पुढचा सीझन भर कामाचा असाच धुमेपलास सुरू रहायचा होता. म्हणून कामगाराना अधून मधून देता यावं याबेताने पाच सहा काथोटल्या लोणचं घालून ठेवायची वर्दी भाऊनी दिली. येसू मिराशाचा लोणच्याचा आंबा घडानी ओथंबलेला होता. त्याचे तीन फाटी आंबे आणून पैरी करून भाऊंच्या मागारणीने लोणच्याची बेगमी करून ठेवली. तसेच दोन मोठ्या मातीच्या घड्यांमध्ये खारातले आंबे घातले. दहा लोड घातल्यावर पुढच्या ट्रीपला बाबूरावाने ...Read More