ती तारीख होती बुधवार दि. २७ एप्रिल ७७! कांदिवली गव्हर्नमेण्ट कॉलेजच्या बी.एड्. फिजीकल कोर्ससाठी प्रवेश अर्जा सोबतजोडायला सिव्हिल सर्जनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला मी मुणग्यातून सकाळच्या देवगड गाडीने रत्नागिरीला जायला निघालो होतो. आदल्या दिवशी गोरेगावच्या निळूभाऊ गोखल्यांचं टपाल आलं. त्यातून तो प्रवेश अर्ज आलेला होता. अर्ज पाठवायची अंतीम तारीख होती ३० एप्रिल. मी साधले क्लार्कनाअर्ज दाखवला. त्यानी छापिल प्रवेश अर्जावर थेट माहिती न भरता कोरा फुलस्केप घेवून त्यावर माहिती भरून घेतली. अर्जास

1

बी.एड्. फिजीकल - 1

बी.एड्. फिजीकल भाग 1 तीतारीख होती बुधवार दि. २७ एप्रिल ७७! कांदिवली गव्हर्नमेण्ट कॉलेजच्या बी.एड्. फिजीकल कोर्ससाठी प्रवेश सोबतजोडायला सिव्हिल सर्जनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला मी मुणग्यातून सकाळच्या देवगड गाडीने रत्नागिरीला जायला निघालो होतो. आदल्या दिवशी गोरेगावच्या निळूभाऊ गोखल्यांचं टपाल आलं.त्यातून तो प्रवेश अर्ज आलेला होता. अर्ज पाठवायची अंतीम तारीख होती ३० एप्रिल. मी साधले क्लार्कनाअर्ज दाखवला. त्यानी छापिल प्रवेश अर्जावर थेट माहिती न भरता कोरा फुलस्केप घेवून त्यावरमाहिती भरून घेतली. अर्जासोबत शालेय व महाविद्यालयीन काळात जिल्हा/ राज्यस्तरावर खेळांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक सहभाग, मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये मिळवलेली नैपुण्य पदकं, प्रशस्तीपत्रं जोडायची होती. मी शालेय ...Read More

2

बी.एड्. फिजीकल - 2

बी. एड्. फिजीकल भाग 2 दोन मुलाना एक खोली मिळे. खोलीत दोन कॉट,दोन टेबलं नी खुर्च्या मिळत. आंघोळीसाठी २५बाथरूम्स २५ संडासहोते. मोठ्या कॉन्क्रिटच्या टाक्या होत्या नी २४ तास पाणी मिळायचे. प्रत्येकाने आपला बेड बेडिंग, डास खूप असल्यामुळे मच्छरदाणी व बादली तांब्या भांडेन्यायचे होते. दुसरे दिवशी सामानाची जमकरून शुक्रवारी ११ वाजता सामान खोलीत टाकून मी लेक्चर हॉलमध्ये प्रवेश केला. प्रा.सानप मॅडम रोलकॉल घेत होत्या. मी परवानगी विचारून वर्गात प्रवेश करताच मला भेदक नजरेने न्याहाळून मॅडम बोलल्या, “तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात?क्वालिफिकेशन काय?”मी म्हणालो , “ श्रीराम विनायक काळे.मी कोकणातून, आयमीन देवगड तालुक्यातूनआलो.१९ ७६मध्ये ...Read More

3

बी.एड्. फिजीकल - 3

बी. एड्. फिजीकल भाग 3 एकमेकांशी बोलताना काहीजण सहजावारी पण कळवळ्याने म्हणायचे, “ह्ये काळ्या बिचारं हितं काय जगत न्हाय पण दोनचार दिवस गेल्यावर मला त्या रुटीनमध्ये अवघड, जीवघेणं असं कधीही काहीभासलं नाही. पहिल्या टर्ममध्ये सकाळच्या असेंब्लीत १०० जोर नी संध्याकाळी१५० बैठका काढायच्या असत. अर्थात हेआकडे म्हणजे सक्ती नसे. तेवढं न जमणारेवआणखी साताठ महाभाग होते. उलट मांडवे, घाटे, मुच्छड थोरात नी काझी यांच्या सारखे काहीपैलवान गडी हा व्यायाम कमी पडतो म्हणून रोज सकाळी उठून दोनशे जोर नी अडिजशेबैठका मारीत असत. मेस मधलं जेवण म्हणजे मात्र कहर होता.फुलके काही अर्धे कच्चे, काही करपलेले नी कडा ...Read More

4

बी.एड्. फिजीकल - 4

बी. एड्. फिजीकल भाग 4 सुरू आज कुर्मा पुरी, बासुंदी स्पेशल बेत होता. प्राचार्यांसह सर्व स्टाफ आणि कमिटी गेस्ट रूम मध्येलंच घेवून ऑफिसकडे गेले. साडे अकराला लेक्चर्स सुरू झाली. साडेतीनला कमिटी मेंबर्स विजीट पूर्ण करून निघून गेले.प्राचार्य लेक्चर हॉलमध्येआले.कमिटी व्हिजिट मुळे इव्हिनिंग असेंब्ली रद्द केलेली होती. दोन दिवसानी सराव पाठ सुरूव्हायचे होते. दहा ऑक्टोबरला लेसन्सचे सेशन असे पर्यंत दुपारची लेक्चर्स बंद होती त्या ऐवजी रोज रात्री आठ ते अकरा या वेळेत चार लेक्चर्स होणार असा बदलेला कार्यक्रम त्यांनी संगितला. क्लास सुटला नी आम्ही आनंदात रूमवर निघालो. शिंदे मास्तरची खबर ...Read More

5

बी.एड्. फिजीकल - 5

बी. एड्. फिजीकल भाग 5 आम्ही टॅक्सी करून निघालो. वाटेत भेळवाल्यांच्या गाड्या दिसल्यातिथे थांबलो. प्रचंड भूक लागलेली होती. आम्ही पॅटिस खाल्लं. कुल्फी खाल्ली तेव्हाजरा पोटाला आधार लागला. आम्ही पाच जिने चढूनराजाच्या बिऱ्हाडी गेलो. चार पाच वेळा बेलमारल्यावर दार उघडलं. आठ बाय सहा फ़ूट बंदिस्तव्हरांड्यात सोफा नी नी स्टुल ठेवलेलंहोतं. आम्ही सोफ्यावर बसलो. शर्ट काढून आत जाता जाता राजा त्याच्या बायकोला म्हणाला, “याना पाण्याचा तांब्या भांडं आणून दे. तिने दोन मिनिटात तांब्या भांड आणूनस्टुलावर ठेवलं नी धाड्कन दार लावून आतून कडीघालून घेतली. राजा आमची झोपायची काहीतरी सोय लावील म्हणूनआम्ही तासभर वाट बघितली. ...Read More