कामीनी ट्रॅव्हल

(44)
  • 76.1k
  • 1
  • 44.3k

हाॅल गच्च भरला होता. यावर्षी लागोपाठ तिस-यांदा कामीनी ट्रॅव्हल्सला उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला होता. कामीनी ट्रॅव्हल्सचा सर्वेसर्वा होता हर्षवर्धन पटवर्धन. फार कमी दिवसांत हर्षवर्धननी आणि कामीनी ट्रॅव्हल्सनी आपले पाय ट्रॅव्हल्स च्या क्षेत्रात मजबूतपणे रोवले होते. सतत तीन वर्ष हा पुरस्कार पटकावून हर्षवर्धनने हॅट्रीक साधली होती. म्हणून या वर्षी कामीनी ट्रॅव्हल्सच्या दृष्टीनी कार्यक्रमाला चार चांद लागले होते. कामीनी ट्रॅव्हल्सच्या सगळ्या लोकांसाठी हा दिवस खूप आनंदाचा होता. ट्रॅव्हल्सच्या या क्षेत्रात खूपच स्पर्धा होती. प्रत्येकजण प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी काही न काही आकर्षक गोष्टी प्रवासात ठेवतात. कामीनी ट्रॅव्हल्स सुरु झाली ती एका टूरनी आणि सहा कर्मचा-यांच्या साथीने. सुरवातीला या प्रवासात हर्षवर्धन, प्राची आणि कामीनी बाई तिघही असतं. या पहिल्या टूरमध्ये प्रवासी होते फक्त पंधरा आणि प्रवासही खूप लांबचा नव्हता.

Full Novel

1

कामीनी ट्रॅव्हल - भाग १

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १ला.","कामीनी ट्रॅव्हल्स...भाग १ ला हाॅल गच्च भरला होता. यावर्षी लागोपाठ तिस-यांदा कामीनी ट्रॅव्हल्सला उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार होता. कामीनी ट्रॅव्हल्सचा सर्वेसर्वा होता हर्षवर्धन पटवर्धन. फार कमी दिवसांत हर्षवर्धननी आणि कामीनी ट्रॅव्हल्सनी आपले पाय ट्रॅव्हल्स च्या क्षेत्रात मजबूतपणे रोवले होते. सतत तीन वर्ष हा पुरस्कार पटकावून हर्षवर्धनने हॅट्रीक साधली होती. म्हणून या वर्षी कामीनी ट्रॅव्हल्सच्या दृष्टीनी कार्यक्रमाला चार चांद लागले होते. कामीनी ट्रॅव्हल्सच्या सगळ्या लोकांसाठी हा दिवस खूप आनंदाचा होता. ट्रॅव्हल्सच्या या क्षेत्रात खूपच स्पर्धा होती. प्रत्येकजण प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी काही न काही आकर्षक गोष्टी प्रवासात ठेवतात. कामीनी ट्रॅव्हल्स सुरु झाली ती एका टूरनी आणि सहा कर्मचा-यांच्या साथीने. ...Read More

2

कामीनी ट्रॅव्हल - भाग २

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २रा मागील भागावरून पुढे. मागील भागात आपण बघीतले की कामीनी ट्रॅव्हल्स ला पुन्हा एकदा पुरस्कार मिळाल्याने बाई,प्राची आणि हर्षवर्धन आनंदात आहेत.बघूया आता काय होईल... कार्यक्रमात असूनही प्राची नसल्यासारखीच होती. ती भूतकाळात कधी शिरली तिलाच कळलं नाही. त्यादिवशी पाटणकरांकडे सकाळपासून धावपळ सुरु होती. कारण प्राचीला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती. प्राचीनी आज साडी नेसावी असं तिच्या आईचं वासंतीचं म्हणणं होतं तर प्राचीचं म्हणणं होतं. "आई आता तुझ्यावेळचा काळ राहिला नाही.मी सुटसुटीत ड्रेस घालीन " " होका मग घाल जीन पॅन्ट आणि टी शर्ट किंवा टाॅप." असं वासंतीनं म्हटल्याबरोबर प्राचीनं जागच्या जागी उडीच मारली. "आई खरच घालू. किती ...Read More

3

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३

कामीनी ट्रॅव्हल भाग ३ मागील भागात आपण बघीतले की हर्षवर्धन आणि कामीनी बाईंचा गंभीर चेहरा बघून प्राचीनता खूप प्रश्न तिला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? बघू या भागात.कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३रामागील भागावरून पुढे…सकाळी प्राचीला जाग आली. पण अंथरूणातून तिला ऊठावसं वाटतं नव्हतं. आपलं डोकं खूप जड झालंय हे तिच्या लक्षात आलं. कालचा सगळा प्रसंग आठवल्यावर पुन्हा तिची चीडचीड सुरू झाली. तिला वाटायला लागलं कुठून त्या शरूच्या लग्नात या माणसानी आपल्याला बघीतलं. तो मुलगा पण कसला नेभळट.प्राचीच्या लक्षात आलं की आपल्या आईबाबांना हे स्थळ पटलंय.आपल ऐकतील याची तिला खात्री वाटत नव्हती.आपल्या खोलीबाहेर येताच तिला समोरच्या खोलीत आई-बाबा चर्चा करताहेत असं ...Read More

4

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४था मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धनच्या स्थळाला होकार द्यावा असं अशोक आणि वासंती यांना वाटत असतं.बघूया प्राची होकार देईल का? मागील पानावरून पुढे. त्या दिवशी प्राचीनी आईबाबांच्या नकळत त्यांचं बोलणं ऐकलं होतं.वासंती कळकळीनी अशोकला म्हणत होती."अहो आपण या स्थळाला हो का म्हणतोय हे तिला समजणार नाही का?" "तू काळजी करू नकोस.आपली प्राची समजूतदार आहे.तिला कळेल आपण सांगीतलं तर.मी ऊद्या बोलतो तिच्याशी" अशोक म्हणाला."आयुष्यभर आपली आर्थिक कोंडी मिटवताना फरपट झाली. प्राची इतकी शहाणी की प्रत्येक वेळी पैशाकडे बघून मला ती गोष्ट नको म्हणत गेली. सासरी तरी तिला हव्या त्या गोष्टी सहज मिळतील. हर्षवर्धनचं काय तो ...Read More

5

कामीनी ट्रॅव्हल - भाग ५

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ५वा मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धनच्या स्थळाला होकार दिला आहे.आता पुढे काय घडेल बघू. पटवर्धनांच्या घरी पाटणकरांना रितीनुसार घर बघायला बोलवलं. प्राची आणि तीचे आई-बाबा सगळे पटवर्धनांच्या घरी पोचले. घराचं गेटच शानदार होतं. खूप वजनी आणि छान कलाकुसर केलेली होती दारावर. वाॅचमननी दार उघडलं.‌त्यानी दार उघडताच कुत्री भुंकायला लागली.त्यांना बघून तिघही घाबरले. वाॅचमन म्हणाला "घाबरू नका बांधलंय त्यांना." तो त्यांना आत घेऊन गेला.ती एक छोटीशी वेटींग रूम होती.त्यांना तिथे बसायला सांगून वाॅचमन आत गेला.वेटींग रूमचं छान इंटीरियर केलेलं होतं. पाचच मिनीटात वाॅचमन बाहेर आला.वेटिंगरूमच्या डाव्या बाजूला असलेलं स्लाईडींग डोअर त्यांनी उघडलं आणि आत बसा ...Read More

6

कामीनी ट्रॅव्हल - भाग ६

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ६वा मागील भागावरून पुढे. साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता. लग्नाची खरेदी सुरू झाली होती. साखरपुडा झाल्यावरही एकपण फोन नाही आला याचं प्राचीला आश्चर्य वाटत होतं.त्यादिवशी तिनी केला होता तर हर्षवर्धनला त्यांनी फोन दिला नाही.नंतरही त्याचा फोन आला नाही. तिनी ते आई- बाबांना बोलूनही दाखवलं. अशोक आणि वासंतीनं प्राचीन बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. विचार करून प्राची थकून गेली. एक दिवस तिनी अशोक आणि वासंतीवर बाॅंम्ब हल्लाच केला. "आई बाबा तुम्हाला मी खूपदा त्या मुला बद्दल सांगीतलं पण तुम्ही लक्ष देत नाही मला असं वाटतंय त्यांच्या श्रीमंतीची तुम्हाला भूरळ पडली आहे. त्यादिवशी त्यांच्या घरी आपण गेलो होतो ...Read More

7

कामीनी ट्रॅव्हल - भाग ७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ७वा मागील भागावरून पुढे. संध्याकाळी नववधू प्राचीचं स्वागत पटवर्धनांच्या घरी खूप झोकात झालं. संपुर्ण बंगल्याला दिव्यांची केली होती.मुख्य दारापासून आतल्या दारापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. दोघांवरही फुलांचा वर्षाव केल्या जात होता. नवीन नवरीच्या गृहप्रवेश झाला. नंतर उखाणे घेण्याचा कार्यक्रम झाला. इतकावेळ हर्षवर्धन आपल्याबरोबर असूनही तो आपल्यापासून खूप लांब आहे असंच प्राचीला वाटत होतं. त्याच्याकडे ती डोळ्यांच्या कोप-यातून बघत होती. त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. तो ढिम्मच बसलेला होता. तिचं लक्ष सासूकडे गेलं आत्ताही त्यांचा चेहरा तसाच गंभीर होता जसा मांडवात होता. तिला एका खुर्चीवर बसायला जागा दिली कोणीतरी. ती बसली नंतर थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं ...Read More

8

कामीनी ट्रॅव्हल - भाग ९

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ९वा मागील भागात आपण बघीतले की भय्यासाहेबांचा प्राचीला राग यायचा.तिला भय्यासाहेबांचं खरं रूप दिसेल का? मागील पुढे. त्या दिवशी भय्यासाहेबांनी प्राचीला आपल्या खोलीत बोलावलं..प्राची खोलीत गेल्यावर त्यांनी दार लावल़ं तशी प्राची चमकली. "बाबा दार का लावलत?" "अगं भींतीलापण कान असतात. म्हणून दार लावलं""कोण येणारं दुसरं?" "हं" भय्यासाहेब फक्त हसले. प्राचीला त्यांचं वागणं काही ठीक वाटलं नाही. ."प्राची काल तुला कळलंच असेल ह्रषवर्धन ड्रग्ज घेतो हे." हे ऐकताच प्राचीचा चेहरा रागानी लाल झाला." रागाने बघू नको.हर्षवर्धन पासून घटस्फोट घ्यायची गरज नाही." "प्राची तू इथेच रहा. हर्षवर्धन जे तुला नवरा म्हणून देऊ शकणार नाही. ते सगळं तुला मी ...Read More

9

कामीनी ट्रॅव्हल - भाग ८

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ८वा मागील भागावरून पुढे. काल काय घडलं हे आपण बघीतलं.त्या प्रकरणाने प्राचीची झोप उडाली होती आता होईल पुढे… सकाळी सकाळी प्राचीला थोडा डोळा लागला होता. तेवढ्यात तिच्या खोलीचं दार वाजलं प्राचीने डोळे उघडले पण क्षणभर तिला काहीच कळेना. मग हळुहळू तिच्या सगळं लक्षात आलं. तिनी उठून दार उघडलं बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या. "प्राची सकाळी तू सकाळी चहा घेतेस की काॅफी?" "काही नको मला." हे बोलतांना ती रागानेच सासूकडे बघत होती. तिच्या अश्या बघण्याने त्या काव-याबाव-या झाल्या. "काल जे घडलं त्यामुळे तू नाराज असणं स्वाभाविक आहे. पण तू रागावू नकोस.एकदा माझं ऐकून घे्. हर्षवर्धन असा का ...Read More

10

कामीनी ट्रॅव्हल - भाग १०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १० मागील भागावरून पुढे.हर्षवर्धनला रिहॅबसेंटरला ठेवल्यानंतर प्राची एक दिवस माहेरी गेली.आईबाबा खूष झाले तिला अचानक बघून.प्राचीनी समोर बसवून हर्षवर्धनबद्दल सगळं सांगीतलं.ही गोष्ट ऐकल्यावर अशोक आणि वासंतीला फार धक्का बसला. अशोक म्हणाला " प्राची तू सारखी शंका काढत होतीस तेव्हा आम्ही तुझं ऐकायला हवं होतं.आता काय करायचं?" " परवा हर्षवर्धनला रिहॅब सेंटर मध्ये ठेवलंय.तो बरा झाला की आम्ही तिचं वेगळं राहू." " तिघं?" "हो.मी ,हर्षवर्धन आणि आई.भय्यासाहेब फार नीच माणूस आहे.आई मात्र देवमाणूस आहेत.परीस्थितीमुळे त्या घरात आई अडकून पडल्या. भय्यासाहेब नीच म्हणजे इतके नीच आहेत की त्यांचं लक्ष माझ्यावर आहे." " काय?" अशोक वासंती दोघंही जोरात ओरडले. ...Read More

11

कामीनी ट्रॅव्हल - भाग ११

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ११ मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धन आणि कामीनी बाईंसह भय्यासाहेबांचं घर सोडलं आणि आता वेगळ्या ठिकाणी राहू लागतात आता पुढे बघू. *** प्राची हर्षवर्धन आणि कामीनीबाई यांना भय्यासाहेबांचं घर सोडून बरेच दिवस होतात. हर्षवर्धनची तब्येत आता छान झाली असते. आत्ता पर्यंत हर्षवर्धनला नवरा बायको हे नातं कळलेलं नव्हतं कारण ड्रग्जने त्याच्या मेंदूचा ताबा घेतलेला होता. प्राचीने कामीनी बाईंच्या डोळ्यातील वेदना वाचली आणि तिने हर्षवर्धनला या ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं ठरवलं.प्राची आणि कामीनीबाईंनी यासाठी खूप कष्ट घेतले.त्याचच फळ म्हणजे हर्षवर्धन पहिल्या सारखा होउन घरी परतला. हर्षवर्धन ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर पडला पण अजूनही त्याचा मेंदू खूप ...Read More

12

कामीनी ट्रॅव्हल - भाग १२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १२ हर्षवर्धन प्राचीशी काहीतरी बोलायला आलेला असतो हे आपण मागील भागात बघीतलं. या भागात बघू हर्षवर्धन काय सांगतो. " हर्षवर्धन बोल नं.तू काही तरी सांगायला आला होतास नं?" " प्राची तू सांगशील तसं मी वागीन.मला तू खूप आवडतेस.पण तू रूसून नकोस माझ्यावर." एवढं बोलून हर्षवर्धनचा चेहरा गोरामोरा झाला.तो जरा घाबरून एकदा प्राचीकडे एकदा खाली बघू लागला.हाताची चाळवा चाळव करू लागला. त्यांची ती बावरलेली स्थिती बघून प्राचीला हसू आलं पण लगेच तिने स्वतःला सावरलं.तिच्या लक्षात आलं हर्षवर्धनचं गोंधळलेली अवस्था आत्ताच दूर करायला हवी नाही तर दोघांमध्ये नेहमीसाठी अवघडलेपण राहील जे हर्षवर्धनसाठी योग्य नाही. अशा अवघडलेल्या अवस्थेत हर्षवर्धनची ...Read More

13

कामीनी ट्रॅव्हल - भाग १३

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १३ठरल्याप्रमाणे राधा शशांक आणि शशांकनचे मित्र मंगेश भाई प्राचीच्या घरी ठरल्याप्रमाणे आले.शशांकने प्राचीला मंगेश भाई ची करून दिली." नमस्कार मंगेश भाई."" नमस्कार."" मंगेश भाई हे माझे मिस्टर हर्षवर्धन आणि या सासूबाई."मंगेश भाईंनी दोघांना नमस्कार करतात." मंगेश भाई शशांकने तुम्हाला सगळं सांगितलं असेल."" हो. त्याचं कामासाठी मी शशांक बरोबर आज आलोय."" शशांक म्हणाला ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकतो."" हो. मीच तसं सुचवलं होतं शशांकला."" ट्रॅव्हल एजन्सीचं खूप मेहनतीचं काम आहे तर सद्य परिस्थितीत हर्षवर्धन कडून ही जबाबदारी पेलवल्या जाईल का हा प्रश्न मला पडलाय." प्राची म्हणाली." मॅडम मेहनत तर कोणत्याही क्षेत्रात आहेच. तुम्ही मेहनत किती घेता त्यावर ...Read More

14

कामीनी ट्रॅव्हल - भाग १४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १४ मागील भागावरून पुढे.. प्राची, राधा आणि शशांक ठरल्याप्रमाणे मंगेशभाईंच्या ऑफीसमध्ये पोचले. " या.बरं झालं आज भेटलो." " का काय झालं?" प्राचीने विचारलं. " आत्ताच ब्रोकरचा फोन आला.आपल्याला हवी तशी जागा मिळाली आहे.कधी बघायला येताय म्हणून विचारत होता." मंगेश भाई प्राचीकडे बघून म्हणाले. " जागा उद्याही बघायला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या सोयीची वेळ सांगा. तसच डिपाॅझीट भाडं आपल्या आवाक्यात असलं पाहिजे." प्राची म्हणाली. " हो मंगेश भाई ते जरा बघायला हवं." शशांक मंगेश भाई ला म्हणाला. " अरे शशांक तुम चिंता मत करो.प्राची मॅडमना त्यांच्या बजेटमध्ये बसेल आणि त्यांना आवडेल अशीच जागा मी बघतोय.ही जागा बघा ...Read More

15

कामीनी ट्रॅव्हल - भाग १५

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १५ मागील भागात आपण बघीतले की प्राची हर्षवर्धनला आपल्या बरोबर टूरवर न्यायचं ठरवते. हर्षवर्धन जाईल का या भागात. " आई यावेळी मी साउथच्या टूरवर हर्षवर्धनला बरोबर घेऊन जावं असा विचार करतेय." प्राची कामीनी बाईंना म्हणाली. नुकतंच रात्रीची जेवणं आटोपली होती आणि कामीनी बाईं बाहेर अंगणात शतपावली करत असताना प्राची अंगणात येऊन त्यांना म्हणाली. " प्राची विचार तुझा चांगला आहे.हर्षवर्धनला कधीतरी टूरवर जायची सवय करावी लागणार पण एकदम एवढ्या लांब न्यायचं का?" " काय हरकत आहे? अर्धा प्रवास ट्रेनने होणार आहे. माझ्याबरोबर शशांक पण येणार आहे.आपला टूरलिडर निखील आहेच. टूरलिडर असला तरी प्रत्यक्ष टूर कसा असतो? तिथे ...Read More

16

कामीनी ट्रॅव्हल - भाग १६

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १६ कामीनी ट्रॅव्हल्स सुरू होउन आता काही वर्ष झाली.आता हर्षवर्धन कसा आहे? पुढे काय घडेल बघू भागात. कामीनी ट्रॅव्हल्स सुरु होऊन आज आठ वर्ष झालीत. पहिली तीन वर्ष हर्षवर्धनच्या तब्येतीत सुधारणा करण्याकडेच प्राची आणि कामीनी बाईंंचं लक्ष होतं. त्यामुळे ट्रॅव्हलचा व्यवसाय मुंगीच्या पावलानी पुढे सरकत होता. प्राचीच्या बोलण्याने हर्षवर्धनमध्ये खूप फरक पडला. तीन वर्षांत हर्षवर्धनच्या जिद्दीमुळे तसेच प्राची आणि कामीनीबाईंच्या कष्टामुळे हर्षवर्धनमध्ये बरीच सुधारणा झाली. हर्षवर्धन अगदी पूर्वीसारखं व्हायला थोडी वाट बघावी लागणार होती. यासाठी प्राची आणि कामीनी बाईं तयार होत्या. *** कामीनी ट्रॅव्हल्सचा या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायात ब-यापैकी जम बसला होता. हर्षवर्धनच्या अश्या केसमुळे ...Read More

17

कामीनी ट्रॅव्हल - भाग १७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १७ या भागात आशू हर्षवर्धनमध्ये कसा बदल घडवेल बघू. आशूशी बोलणं झालं त्याप्रमाणे ती आजपासून येणार प्राची कामीनी बाईंना सांगीतलं आणि प्राची ऑफिसमध्ये निघाली. ऑफीसमध्ये गेल्यावर एक दोन मिटींग होत्या त्यातील पहिली मिटींग झाली. दुसरी मिटींग चालू असतानाच कामीनी बाईंचा फोन आला.यावेळी कामीनी बाईचा फोन बघून प्राचीला आश्चर्य वाटलं.तिने मिटींग थोडावेळ थांबवून फोन घेतला. " हॅलो.आई आत्ता कसा काय फोन केला? घरी सगळं ठीक आहे ना?" प्राचीने पलीकडून कामीनी बाईंनी फोन उचलल्या उचलल्या प्रश्न केला. "हर्षवर्धन खूप उदास आहे मी त्याला खूप विचारलं पण तो त्यांना काही सांगायलाच तयार नाही. काय करायचं?" प्राचीला कामीनी बाईंचा आवाजात ...Read More

18

कामीनी ट्रॅव्हल - भाग १८

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १८ आशूने हर्षवर्धनला टूरवर नेण्याची परवानगी दिल्यानंतर काय होईल बघू . हर्षवर्धनला टूरवर नेता येऊ शकतं कळल्यावर प्राचीला फार आनंद झाला.आता हर्षवर्धन लवकर बरा होईल. एका वेगळ्या आनंदाने तिचं मन भरून आलं. हर्षवर्धन चांगला बरा झाल्यावच प्राची आणि हर्षवर्धन यांचं वैवाहिक जीवन सुरू होईल. यामुळे प्राचीला आनंद झाला. प्राची संयमी वृत्तीची असल्यामुळेच ती आपल्या संसाराची सुरुवात होण्यासाठी वाट बघू शकली. आईंना ही बातमी सांगीतलीच पाहिजे. प्राचीने घरचा फोन नंबर फिरवला.आणि आनंदाने तिने ही गोष्ट कामीनी बाईंना सांगीतली. त्याही खूप खूष झाल्या. *** ट्रॅव्हल्स कंपनीत सुरवातीला एक आचारी त्याचा असीस्टंट, एक टूर लीडर एवढेच होते. पेपरमध्ये टूर ...Read More

19

कामीनी ट्रॅव्हल - भाग १९

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १९ मागील भागात आपण बघीतले की कामीनी बाईंना काही तरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं बघू भागात. " आई काहीतरी सांगायचं होत तुम्हाला.सांगा." प्राचीने पुन्हा असं म्हणताच जरा घाबरत का होईना कामीनी बाईं बोलल्या. "आपल्या ऑफीस मध्ये अकाऊंट सांभाळणारे आहेत का कोणी?" "सध्या बाहेर देतोय आपण अकाऊंट तपासायला. शशांक ठेवतो सगळे अकाऊंट. पण त्याला त्याच्या ऑफीसचं कामपण असतं. बाहेर सगळं व्यवस्थित आहे नं हे बघायला देतो. म्हणूनच मी विचार करतेय अकाऊंटट हवा अशी जाहीरात द्यावी." "मला वाटतं जाहीरात देऊन नवीन कोणी माणूस घेतला तरी त्यांच्यावर कोणीतरी आपला माणूस हवा. मी म्हणत होते. तुझे बाबा रिटायर्ड झालेत ...Read More

20

कामीनी ट्रॅव्हल - भाग २०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २० मागील भागात आपण बघीतले की हर्षवर्धन आणि प्राचीचं एक हळूवार नातं तयार होऊ लागलं. आता या भागात काय होईल. सकाळी प्राची उठली तेव्हा तिला खूपच ताजतवानं वाटतं होतं. तिचं हर्षवर्धनकडे लक्ष गेलं.एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो झोपला होता. प्राची आपलं आवरून खोलीबाहेर आली. कामीनी बाई स्वयंपाकघरात चहा करत होत्या.प्राचीकडे लक्ष जाताच म्हणाल्या " अरे व्वा! आज गडी खूष दिसतोय.काॅफी करु का तुझी?" त्यांच्या प्रश्नावर प्राचीनी त्यांना घट्ट मिठी मारली. कामीनी बाईंच्या लक्षात आलं आजचा आनंद काही वेगळाच आहे. हिची मिठी थरथरतेय. ही थरथर एक संवेदनशील गोष्ट आनंदाने आपल्यापर्यंत काहीतरी पोचवते आहे. बराच वेळ हळव्या, संवेदनशील प्रेमात ...Read More

21

कामीनी ट्रॅव्हल - भाग २१

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २१ राधाचा फोन कशासाठी आला असेल बघू या भागात. " हॅलो, बोल राधा.मी आत्ता तुलाच फोन होते." " कधी जाताय तुम्ही हनिमूनला?" " प्रियाला प्लॅन करायला सांगते आहे." " प्राची हनिमूनला जातांना ऑफीसमधले सगळे विचार ऑफीसमध्येच सोडून जायचे. तू जितके दिवस हनिमूनला जाणार आहेस तितके दिवस तुला हर्षवर्धनच्या जवळच राह्यचं आहे." " हो कळतंय मला. मलाच हर्षवर्धनला आमच्यामधील नात्याची ओळख करून द्यावी लागेल. त्याच्या मनातील माझ्या प्रेमाला हळूवारपणे बाहेर आणावं लागेल. सध्यातरी तो माझ्या बद्दलच्या भावना व्यक्त करायला बिचकतो. ते बिचकणं मला आधी दूर करावं लागेल. राधा खूप हळूवारपणे मला वागावं लागणार आहे." " तेच म्हणतेय ...Read More

22

कामीनी ट्रॅव्हल - भाग २२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २२ मागील भागात आपण बघीतले की प्राची छान स्वप्नात मश्गूल असताना कोणाचा तरी तिला फोन आल्याने भानावर आली. कोणाचा फोन आला असेल? बघू या भागात फोन कोणाचा आहे म्हणून प्राचीने बघीतलं तर स्क्रीन वर नाव नव्हतं नुसताच नंबर दिसला तरी प्राचीने फोन घेतला, " हॅलो…" प्राची म्हणाली. " मॅडम मी पटेल इनव्हेस्टमेंट मधून बोलतेय.आपण प्राची मॅडम बोलताय?" समोरून त्या मुलीने प्राचीला विचारलं. " हो पण मी सध्या मिटींग मध्ये आहे. मला तुर्तास तरी काही इनव्हेस्ट करायचं नाही.साॅरी." " ओके मॅम नो प्राॅब्लेम.थॅंक्यू." समोरून फोन कट झाला. प्राची मधील अभिसारीकेचा फार हिरमोड झाला.खूप सुंदर स्वप्नात ती रममाण ...Read More

23

कामीनी ट्रॅव्हल - भाग २३

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २३ठरल्याप्रमाणे प्रवाशांच्या घरी जाऊन जाहिरातीचे शूटिंग झाले.सगळ्यांना शुटींग हा प्रकार नवीन होता त्यामुळे सगळे एक्साईट झालेले ॲडशूट करणा-या टीमला हे सगळं बघून गंम्मत वाटत होती.जाहीरातीच्या शुटींगच्या दिवशी प्रियाला प्रत्येक प्रवाशांच्या घरी जातीनं हजर रहा असं प्राचीने तिला सांगितलं होतं. त्यामुळे ऑफीसमधलं काम नीट सांभाळून काही काम असीस्टंटवर सोपवून प्रिया शुटींग ज्या घरी असे तिथे हजर राहात असे.टिव्हीवरच्या जाहीरातीत त्यांच्याबरोबर प्रवास केलेले तरूण जोडपं, वृद्ध जोडपं, मध्यमवयीन जोडपं आणि हनीमून पॅकेज घेणा-यांची मुलाखत घेतल्याने कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल एक विश्वासार्हता निर्माण झाली. प्रवाश्यांच्या घरी हसत खेळत मूलाखत होऊ लागली. प्रत्येक जाहीरातीत वेगळे चेहरे असतं.हे चेहरे सामान्या लोकांचे होते. ...Read More

24

कामीनी ट्रॅव्हल - भाग २४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २४ प्राची हर्षवर्धन टूरवर जायला निघतात. दोघांना सोडायला राधा, शशांक आणि कामीनी बाई जातात. हर्षवर्धन गोंधळलेलाच सगळ्यांना ते जाणवतं पण कोणीच तसं दर्शवत नाही. दोघं ऊटी म्हैसूर हैद्राबाद फिरुन येणार असतात. सुरवातीला प्राचीला लक्षात येतं प्रथम हर्षवर्धनची गोंधळलेली अवस्था दूर करावी लागणार तेव्हा तो मनमोकळेपणानी बोलेल. असं बोलणं सुरु झाल्यावर आपोआप त्याच्यातला न्यूनगंड कमी होईल. न्यूनगंड गेला की प्राचीच्या बरोबरच्या पातळीवर आपण आहोत हे हर्षवर्धनला जाणवेल. दोघांमधलं प्रेम त्याचवेळी फुलायला सुरवात होईल. प्राची त्यांचं क्षणाची वाट बघते आहे. प्राची सगळ्या अंगानी हर्षवर्धनला समर्पित होण्यासाठी तयार आहे. ते विमानात बसतात. हर्षवर्धनचं चेहरा बावरलेला असतो.त्याने प्राचीकडे बघीतलं तशी ...Read More

25

कामीनी ट्रॅव्हल - भाग २५

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २५ मागील भागात आपण बघीतले की भय्यासासेबांच्या आजारपणामुळे कामीनी बाईं अस्वस्थ झाल्या.आता पुढे काय होईल ते .दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर कामीनी बाई देवघरातील देवासमोर हात जोडून नि:श्चल उभ्या राहून मनातच देवाजवळ आपली चिंता,काळजी सांगू लागल्या. "देवा परमेश्वरा प्राची आपल्या आयुष्याची छान सुरुवात करायला केवढ्या ऊत्साहानी प्रवासाला निघाली होती. मध्येच यांचं आजारपण का निघालं? परमेश्वरा यांच्या दुखण्याचे पडसाद प्राची आणि हर्षवर्धन यांच्या आयुष्यावर संसारावर नको उमटू देऊ. त्याची काळजी तूच घे. तुझ्या मनात काय आहे हे कोणालाच कधीही कळत नाही. तू कश्या चाली चालतोय ते कोणालाच माहित नसतं. यांच्या आजारपणातून काही चांगलं घडवणार आहेस का? माझा तुझ्यावर ...Read More

26

कामीनी ट्रॅव्हल - भाग २६

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २६ भय्यासाहेबांना आज दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. भय्यासाहेबांनी स्वतःच्या कारनी घरी जाईन ॲम्ब्यूलन्स नको असं स्पष्ट सांगीतलं डिस्चार्ज घेताना बिलींग डिपार्टमेंटमध्ये सगळे पैसे भरल्यावर भय्यासाहेबांना वाॅर्डबाॅयनी त्यांचे कपडे घालून व्हिलचेयर वर बसवलं. भय्यासाहेबांच्या नजरेस कोणी येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली. न जाणो यांच्यापैकी कोणाला बघून त्यांचा पारा चढला तर पुन्हा पंचाईत. कारमध्ये भय्यासाहेबांना वाॅर्डबाॅयने बसवलं.आणि कारचं दार लावलं. एवढ्याश्या गोष्टींनी पण त्यांना दमल्या सारखं झालं. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. आपल्या शेजारी कोणीतरी बसल्याचं त्यांना जाणवलं तसं त्यांनी डोळे उघडून बघीतलं तर बाजूला कामीनी बाई बसलेल्या दिसल्या. "तुम्ही कशाला बसलात कारमध्ये? उतरा." " अहो ओरडू नका. आत्ताच ...Read More

27

कामीनी ट्रॅव्हल - भाग २७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २७ सकाळी सकाळी प्राचीला सरदेसाई काकांचा फोन येतो. "हॅलो.बोला काका." "प्राची तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. भय्या झाला वहिनींना घरी येऊ द्यायला." " काका खूप खूप धन्यवाद. तुम्ही केवढं मोठ्ठं काम केलंय माझं. आईं तर सारख्या अस्वस्थ आहेत.मी शंकरला आजच बोलावते. आईंना घेऊन जाईल तो." "अगं चांगलं तासला भय्याला एवढा आजारी आहे पण हरामखोराची घमेंड जात नाही. तू आता काळ्जी करू नको. मी कालच त्याला सांगून टाकलंय की मी रोज येणार आहे म्हणून. सध्या रोज जाण्याचा माझा उद्देश हा आहे की मध्येच या प्राण्याचं काही बिनसलं तर वहिनींची पंचाईत होईल. आमचा मित्र आहे म्हणून सांगतो व्हिमझिकल स्वभावाचा ...Read More

28

कामीनी ट्रॅव्हल - भाग २८

कामीनी ट्रॅव्हलक्ष भाग २८ पाटकर विद्यूतची माहिती देतो. त्याला प्राची केबीनमध्ये बोलावून चांगलीच झापते. विद्युत प्रथम आपला गुन्हा कबूल नाही.पाटकर समोरून त्याला सगळे फोटो दाखवतात.ते बघीतल्यावर त्याची बोलती बंद होते. "विद्युत... फोटोवरून आणि पाटकरांनी जी माहिती दिली त्यावरून आम्हाला कळलय तू कोणासाठी काम करतोस.पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. पटकन बोललास तर ठीक नाहीतर मला पोलीसांनी मदत घ्यावी लागेल.तुला काय आवडेल?" प्राचीचा कडक स्वर ऐकून विद्युत मनातून घाबरला. " मॅम मी तोंडलकर गृपसाठी काम करतो. मी तिथेच काम करतो पण जास्तीच्या पैशासाठी मी हे काम करायला तयार झालो. मॅम मला माफ करा.मला काढू नका." " तुझं इथे काम काय आहे. ...Read More

29

कामीनी ट्रॅव्हल - भाग २९

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २९ काही वर्षांनंतर… कामीनी ट्रॅव्हल्स आता ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात सिनीयर झाली होती. निसर्ग नियमानुसार सगळ्यांची वयं वाढली भय्यासाहेब ऐंशीच्या घरात होते तर कामीनी बाई त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असल्या तरी त्याचीही पंच्याहत्तरी झाली होती. हर्षवर्धन पन्नाशीच्याजवळ पोचला होता आणि प्राची पन्नाशीच्या आत होती. प्राची हर्षवर्धनचा मुलगा तन्मय आता पंधरा वर्षांचा होता.लग्नांतर बरेच वर्षांनी प्राची हर्षवर्धन आई-बाबां झाले होते. प्राचीच्या बाबांनी दोन वर्षापूर्वी कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये येणं सोडलं होतं. त्यांचही वय झालं होतं. तन्मय यंदा दहावीच्या वर्गात होता. त्याचा अभ्यास, त्याच्या ट्युशन त्याचे मित्र या सगळ्यात म्हणजे तन्मयच्या जगात त्याचे आजी आजोबा म्हणजे भय्यासाहेब आणि कामीनी बाईं जातीनं ...Read More

30

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग३० त्या दिवशी सकाळची थोडी कामं आटोपून कामीनी बाई समोरच्या खोलीत पेपर वाचत बसल्या होत्या. प्राची आणि नाश्ता करून कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये गेले होते. भय्यासाहेब त्यांचे मित्र जयंत सरदेसाई यांच्याकडे गेले होते. तन्मय नेहमीप्रमाणे काॅलेजला गेला होता. समोरच्या खोलीचं दार उघडंच होतं. कामीनीबाईंचा सावत्र मामेभाऊ आणि मामा तरातरा चालत घरात शिरले. "बोलायला वेळ आहे का?" कामीनी बाईंनी नजर वर करून आवाजाच्या दिशेनी बघीतलं. दिनूमामा आणि विश्वासला बघून त्यांना आश्चर्य वाटलं. कामीनी बाई त्यांना बसा म्हणाल्या तसा दिनू मामाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. "वा! हे छान आहे आपलं भलं झालं की इतरांना विसरायचं. माझ्यामुळे तू या श्रीमंत घरी ...Read More

31

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३१

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३१ सकाळी सकाळी कामीनी बाईंच्या आईचा फोन आला. तीही कामीनी बाईंना खूप सुनवायला लागली..कामीनी बाईंच्या आईचा मुळात चिरका होता आता तर रागानी आणखी चिरकला. "काय ग दिनूला काल काय वाट्टेल ते बोललीस. लाज नाही वाटत. मामा आहे तुझा तो. त्याच्यामुळे तुझं त्या श्रीमंत भय्यासाहेबाशी लग्नं झालं आता त्यालाच उलटून बोलते. त्याने तुझ्याकडे थोडे पैसे मागीतले तर काय बिघडलं?" "आई ओरडायची गरज नाही. दिनूमामामुळे माझं लग्नं जमलं हे तू मला आयुष्य भर ऐकवणार आहेस का? आणि का म्हणून त्याला मी सतत पैसे देऊ? मला माझा. संसार नाही का?" " वा ! आता फार जोर आला तोंडात.आजपर्यंत तर ...Read More

32

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३२ प्राची आज दिवसभर कामात होती.कारण यावेळी एकाच वेळी चार ठिकाणी कामीनी ट्रॅव्हल्सचे टूर निघणार होते. असे टूर काढणार असल्यामुळे त्यांचं योग्य नियोजन करणं आवश्यक होतं. कामीनी ट्रॅव्हल्सच्या जाहीरातीत ज्या व्यक्ती आपले अनुभव सांगत त्या व्यक्ती कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास केलेल्या किंवा अजूनही करणा-या होत्या. त्यामुळे सामान्य व्यक्तींचा त्या जाहीराती बघून कामीनी ट्रॅव्हल्सवर विश्वास बसत असे. या जाहीरातीत कोणाही सेलिब्रिटीना प्राचीनी घेतलं नव्हतं. तिच्या दृष्टीनी तिचे प्रवासी हेच तिच्यासाठी सेलिब्रिटी होते. ही तिची युक्ती जाहीरात प्रदर्शित झाल्यानंतर खूप उपयुक्त ठरल्याचं लक्षात आलं. या जाहीराती मुळे कामीनी ट्रॅव्हल्सकडे येणा-या प्रवाश्यांची संख्या वाढली होती. म्हणूनच यावेळी एका वेळी ...Read More

33

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३३

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३३ संध्याकाळी प्राची घरी आली तेव्हा ती थकल्यासारखी दिसत होती कारण तिची आज खूप धावपळ झालेली तिला भय्यासाहेब म्हणाले, " आजच तू टूरवर गेलीस आणि लगेच परत यावं लागलं नं त्या विश्वास मुळे? मला कामीनीने सांगितलं या विश्वास आणि दिनूचा आता कायमचा बंदोबस्त करावाच लागणार." भय्यासाहेबांना प्राची सोफ्यावर बसत सांगू लागली. "भय्यासाहेब आज विश्वास आपल्या गुंड मित्राला घेऊन ऑफीसमध्ये आला होता. मी जाण्यापूर्वी यादव आणि संदीपला सांगून गेले होते की काही झालं तर लगेच मला कळवा.मला मनातून वाटतच होतं की हा विश्वास नक्की काहीतरी गोंधळ करणार आहे." थोडं थांबून प्राचीने पुढे म्हणाली, "यादव मला फोन करणार ...Read More

34

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३४ प्राची ऑफीससाठी जशी घराबाहेर पडली तसा तन्मय भय्यासाहेबांपाशी आला आणि म्हणाला "आजोबा आपल्या घराजवळच्या बगीच्यात माझे सगळे मित्र आलेत तिथे. त्यांना तुमच्याकडून डिटेक्टीव्ह स्टोरी ऐकायची आहे.चलानं" तन्मय गयावया करू लागला. हे त्यांचं बोलणं कामीनी बाईंनी ऐकलं आणि हातातलं काम तसंच ठेऊन त्या समोरच्या खोलीत आल्या. "तन्मय आईनी काय सांगीतलं आहे लक्षात आहे नं? का विसरलास?" " आजी बगीचा तर घराजवळच आहे. आज शंकर नाही प्रदीपदादा आहे नं!" " नको. प्राची नाही जायचं म्हणाली नं मग नको." कामीनी बाईं ठामपणे म्हणाल्या.तसा तन्मयचा चेहरा पडला. त्याचा पडलेला चेहरा बघून भय्यासाहेबांना वाईट वाटलं.ते म्हणाले. "अगं घराजवळच आहे बगीचा ...Read More

35

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३५

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३५ काल दवाखान्यात भय्यासाहेबांजवळ कोणाला थांबू देत नव्हते.पण तरी प्रदीप थांबला होता.प्राचीनही त्याला थांबू दिलं. प्राची कामीनी बाईंना घेऊन घरी आली येण्यापूर्वी कामीनी बाईंनी बाहेरूनच भय्यासाहेबांना बघीतलं. आज प्राची कामीनी बाईंच्याच खोलीत झोपणार असते. कारण अजूनही त्यांना थकवा असतो. तन्मयला हर्षवर्धनच्या खोलीत झोपायला सांगते. तन्मय आजच्या दिवसांतच एकदम मोठा होतो. आपण हट्ट करून आजोबांना बगीच्यात नेलं नसतं तर हे घडलं नसतं. याची टोचणी त्याला लागते. वरुन तो शांत दिसत असला तरी त्याच्या मनात खूप खळबळ माजलेली असते.तो हळूच पाय न वाजवता हर्षवर्धनच्या खोलीत जातो. *** प्राची कामीनी बाईंना हळूच पलंगावर बसवते. नंतर हळूहळू त्यांना पलंगावर झोपवले. ...Read More

36

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३६

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३६ हर्षवर्धनच्या मनात काय चालू आहे हे बघू या भागात भय्यासाहेबांची तब्येत आता ठीक आहे असं प्रदीपने फोनवर आपल्याला सांगीतलं मग आई का एवढी घाबरली? प्राचीने आईला भय्यासाहेबांबद्दल सांगीतली असेल तरी आई का एवढी थकलेली दिसतेय? हर्षवर्धनला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं.त्याने प्राचीला विचारलंच, " प्राची तू आईला भय्यासाहेबांची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं नाहीस का?" " सांगीतलं." " मग तरी आई एवढी थकल्यासारखी का दिसतेय. एवढी घाबरली? खरं काय आहे ते मला सांग. प्लीज इतरांसारखं मला वाढवू नकोस." हर्षवर्धनला इतकं अस्वस्थ आणि गडबडलेला बघून प्राचीने त्याला शांत करत म्हटलं, " हर्षवर्धन घाबरू नकोस.आई ठीक आहेत." " मला ...Read More

37

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३७ प्रदीप दवाखान्यात आल्यावर प्राची त्याला डाॅक्टर काय म्हणाले ते सांगते. "आता काळजी करू नकोस.आणि काकूंना दवाखान्यात ये जा करू देऊ नकोस. त्यांनाही जपायला हवं. मी आता निघते." प्राची म्हणाली. " हो ताई तुम्ही निघालात तरी चालेल. तुम्ही दवाखान्यात होता म्हणून मी आईकडे बघू शकलो. तुमचे किती धन्यवाद मानू." बोलताना प्रदीपचा आवाज गहिवरला. "अरे धन्यवाद कसलेदेतोस. आपले खूप जुने संबंध आहेत. आईसमोर तू धीर सोडू नको.ठीक चल निघते." " ताई गाडीच्या चाव्या." "अरे हो.दे" प्राची गाडीच्या किल्ल्या घेऊन दवाखान्यातून निघते. *** गाडी चालवताना पुन्हा तिच्या डोक्यात दुपारसारखेच काही बाही विचार पिंगा घालू लागले. प्राची गाडी यंत्रवत ...Read More

38

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३८

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३८ प्राची आता जरा सावरलेली दिसत होती.पण अजून तिच्या मनात गोंधळ होताच. ऑफीसमध्ये जायची तिला इच्छा नव्हती. आज कामीनी बाईंनी तिला घरीच रहा म्हटलं. हर्षवर्धनला कळत नव्हतं किती दिवस प्राची घरात राहणार आहे? ऑफीसमध्ये एकट्याने जाऊन सगळं मॅनेज करणं त्याला कठीण जात होतं. म्हणून तो कामीनी बाईंना म्हणाला. "आई प्राची किती दिवस घरी थांबणार आहे? ऑफीसमध्ये सगळं तिच्या निर्णयावर अवलंबून असतं." हर्षवर्धनचा चेहरा बघून कामीनी बाईंना त्याचा राग आला. " हर्षवर्धन अरे प्राची ची अवस्था काय झाली आहे बघतोस नं तू. तू घे पुढाकार.ऑफीसमध्ये जे निर्णय घ्यायचे तू घे." " मी…? " " मग काय झालं? ...Read More

39

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३९

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व भाग३९ वासंती आणि अशोक हे दोघेही भैया साहेबांची तब्येत बघायला प्राचीच्या घरी आले. दोघांनाही भैय्यासाहेबांना बघून बसतो. भैय्यासाहेब खूप थकलेले दिसतात. अशोक विचारतो "आता कसं वाटतंय?" भैय्यासाहेब म्हणाले, "थोडावेळ बसलो,चाललो तर थकायला होतं." यावर अशोक म्हणतो " फार तडतड करू नका.काही दिवस फक्त आराम करा. हळुहळू तब्येत ठीक होईल." यावर भय्यासाहेब स्मीत करतात. अशोक आणि वासंती समोरच्या खोलीत येतात.तिथे कामिनी बाई आणि त्यांच्या गप्पा चालू होतात. कामिनी बाई म्हणाल्या, "माहिती नाही काय झालं असं अचानक प्राचीला. पण ती परवापासून अस्वस्थ आहे. तिला ऑफिस मध्ये जायची इच्छा होत नाही. जेवायची इच्छा होत नाही. ती नेहमीसारखी बोलत सुद्धा ...Read More

40

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४० हर्षवर्धन ऑफीसमध्ये जायला म्हणून तयारी करत असतो. प्राची खोलीतल्याच इझीचेयरवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून असते. हर्षवर्धनचं तिच्याकडे लक्ष गेलं. हर्षवर्धन प्राचीला म्हणाला, "प्राची आज आठवडा झाला तू ऑफिस मध्ये आलेली नाही ऑफिस मध्ये किती कामं खोळंबली आहेत. किती टूर्सचं नियोजन करणं थांबलेलं आहे. कधी येणार आहेस ऑफीसमध्ये? तू फक्त स्वतःच्या मनस्थितीचच कौतुक करत बसणार आहेस?" हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकलं तशी प्राची खुर्चीवरून ताडकन उठली आणि त्याला म्हणाली, "हर्षवर्धन गेली अनेक वर्ष तुझ्या मनस्थितीला सांभाळत मी जगले. माझ आयुष्य राहीलच कुठे माझ्यासाठी? मी वेगळं म्हणून काही जगलीच नाही. सतत हर्षवर्धन ..हर्षवर्धन... हर्षवर्धन. फक्त हर्षवर्धनसाठी जगले. ...Read More

41

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४१

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४१ प्राची आणि हर्षवर्धन यांचा वाद होऊन जवळपास चार महिने उलटले होते. या चार महिन्यांत बरंच घडून गेलं होतं. प्राची अजूनही घरीच होती. तिनी हर्षवर्धनशी बोलणं जवळपास सोडून दिलं होतं. कामीनी बाईं पण हर्षवर्धनशी आवश्यक तेवढंच बोलत. त्यांचा बहुतेक वेळ भय्यासाहेबांकडे लक्ष देण्यात जात असे. भय्यासाहेबांना बघायला जरी केयरटेकर असला तरी बराच वेळ कामात जात असे. आजकाल तन्मय आणि हर्षवर्धन दोघंही ऑफीसमध्ये जायला लागले होते. तन्मयला घरातील वातावरणाची थोडीफार कल्पना आली होती. कामीनी बाईंनी त्याला या वातावरणामागचं कारण सांगीतलं होतं. त्यामुळे तो समजूतीनी कामीनी ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात लक्ष घालू लागला होता. रोज कामीनी बाईंना तन्मय ऑफीसमधल्या गोष्टी ...Read More

42

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४२ हर्षवर्धन आता चांगल्या प्रकारे व्यवसाय सांभाळू लागला होता. तन्मय सुद्धा वयाच्या मानाने खूपच लवकर या शिरला होता आणि चांगलं काम करत होता. यावर्षी तन्मयचं शिक्षण पूर्ण झालं होतं. कामीनी ट्रॅव्हल्सच्या इतर शाखांमध्ये तन्मय मधून मधून भेट देत असे. या वर्षभरात प्राचीनी ऑफिस मध्ये प्रवेश केला नव्हता. तिने ग्रफिक डिझाईनिंगमध्ये स्वतःला बिझी करून घेतलं होतं. हर्षवर्धन आणि तन्मय या दोघांनी कामनी ट्रॅव्हल साठी खूप धडपड केली. यावर्षी खूप वर्षानंतर उत्तम ट्रॅव्हल कंपनी म्हणून कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाला होता. याचे श्रेय अर्थातच हर्षवर्धन आणि तन्मयला मिळालं होतं त्या दिवशी संध्याकाळी हर्षवर्धनने कामिनी बाईंना या पुरस्काराची बातमी दिली ...Read More

43

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४३ (अंतिम भाग)

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४३ कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाल्याचा आनंद पटवर्धन कुटूंबात भरभरून वाहत होता. या आनंदाच्या पार्श्वभूमीवर कामीनीबाईंनी आपल्या इच्छा व्यक्त केली. " प्राची, हर्षवर्धन पुरस्कार मिळाल्याने आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.यामुळे तुम्हा दोघांचा मूड छान आहे तेव्हा मला वाटतं तुम्ही आता कुठेतरी फिरायला जावं. मागच्या वेळी अर्ध्यातून तुम्हाला परत यावं लागलं होतं. त्यामुळे आता पुन्हा जा. यांची काळजी करू नका.मी आहे. प्रदिप आणि तन्मय आहे." कामीनी बाईंच्या बोलण्यावर भय्यासाहेबांनी पण होकारार्थी मान डोलावली. "हे बघा मी आता ठीक आहे.तुम्ही आता खरंच कुठे तरी फिरायला जा.तुमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करा. मधला संघर्षाचा काळ विसरा.आम्ही इथे व्यवस्थित आहोत." कामीनी ...Read More