Kamini Traval - 14 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १४

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १४
मागील भागावरून पुढे..

प्राची, राधा आणि शशांक ठरल्याप्रमाणे मंगेशभाईंच्या ऑफीसमध्ये पोचले.

" या.बरं झालं आज आपण भेटलो."

" का काय झालं?" प्राचीने विचारलं.

" आत्ताच ब्रोकरचा फोन आला.आपल्याला हवी तशी जागा मिळाली आहे.कधी बघायला येताय म्हणून विचारत होता." मंगेश भाई प्राचीकडे बघून म्हणाले.

" जागा उद्याही बघायला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या सोयीची वेळ सांगा. तसच डिपाॅझीट भाडं आपल्या आवाक्यात असलं पाहिजे." प्राची म्हणाली.

" हो मंगेश भाई ते जरा बघायला हवं." शशांक मंगेश भाई ला म्हणाला.

" अरे शशांक तुम चिंता मत करो.प्राची मॅडमना त्यांच्या बजेटमध्ये बसेल आणि त्यांना आवडेल अशीच जागा मी बघतोय.ही जागा बघा मला वाटतं तुम्हाला ही जागा आवडेल."

" तुम्ही तुमची आणि या दोघांची वेळ कधी जमते ते बघून ठरवा. त्याप्रमाणे आम्ही तिघं येऊ."
यावर शशांक म्हणाला,

" मंगेश भाई शक्यतो रवीवारी जाउ." शशांक म्हणाला.

" अरे पण रविवारी सुद्धा यांचं ऑफीस चालू असतं." राधा म्हणाली.

" त्याचा काही प्राॅब्लेम नाही मॅडम.सकाळी ऑफीसमध्ये मी नसलो तरी बाकी लोक असतात." मंगेश भाई म्हणाले.

"अगं मी रवीवारी सकाळीच जाउया असं नाही म्हणतंय.त्या ब्रोकरला जेव्हा वेळ असेल तेव्हाच आपल्याला जावं लागेल.रवीवारी जाउ एवढंच म्हणतोय." शशांक ने राधाच्या मनातील गोंधळ दूर केला.

" प्राची तुला जमेल?" राधा ने विचारलं.
" मला कोणत्याही दिवशी जमेल." प्राची म्हणाली.
" अगं तुझं ऑफीस असतं नं म्हणून विचारलं." राधाच्या या म्हणण्यावर प्राचीने ती नोकरी सोडणार असल्याचं सांगितलं.
" हो.अरे ही न्यूज आहे माझ्यासाठी." राधा ने प्राचीला असं म्हटल्यावर प्राची किंचीत हसली.

येत्या रविवारी वेळ पक्की करून कळवतो असं मंगेश भाई म्हणाले.त्यानौतर बिझनेस बद्दल थोड्याशा गप्पा झाल्या.गप्पा म्हणण्यापेक्षा मंगेश भाईंनी प्राचीला बिझनेसच्या काही टिप्स दिल्या.

जरा वेळाने तिघही मंगेश भाईंच्या ऑफीसमधून निघाले.

***
मंगेश भाईंच्या ऑफीसमधून तिघही काॅफी शाॅपमध्ये गेले. काॅफीबरोबर सॅन्डविचची ऑर्डर देऊन प्राचीने बोलायला सुरुवात केली.

"शशांक तुझ्या मदतीमुळे हर्षवर्धनसाठी आपल्याला खूप लवकर मार्ग सापडला. हर्षवर्धनला फार काळ रिकामं ठेवून चालणार नाही. रिकाम्या डोक्यात ड्रग्जची ओढ कधीही निर्माण होऊ शकते. हेच आपल्याला टाळायचं आहे." प्राचीचं बोलणं दोघांनाही पटलं.

" प्राची मंगेश भाई आपल्या बरोबर आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस. तो त्याच्या कामातून कसाही वेळ काढेल,त्यांचे सगळे काॅन्ट्याक्ट्स वापरेल पण आपल्या बरोबर राहील.फार चांगला माणूस आहे मंगेश भाई." शशांक म्हणाला.

" हे तुझ्या मुळेच शक्य झालं. तुझे आभार किती मानू तेवढे कमीच आहेत."

प्राचीच्या या बोलण्यावर शशांक संकोचून म्हणाला,

" अगं प्राची आभार कसले मानतेस? तू राधाची जीवलग मैत्रीण आहेस म्हणजे माझीसुद्धा आहेस. एवढंतर मी करायलाच हवं."

" प्राची हे मात्र खरं आहे. शशांकपण तुला जवळची मैत्रीण मानतो. यार यामुळे माझा तोटा झाला."

" राधा यात तुझा काय तोटा झाला? " काहीच न कळून प्राचीने विचारलं.

"अरे तुझ्यावरचा माझा हक्क फिफ्टी परसेंट झाला. तोटा नाही झाला का? "

राधाच्या या बोलण्यावर प्राचीला हसू आलं.शशांकही गालातल्या गालात हसू लागला.

" चला चेष्टा मस्करी पुरे झाली.ते दुकान बघीतल्यावर पुढचं सगळं ठरवता येईल."

" या एकदोन दिवसांतच मंगेश भाई कळवतील मला कधी जायचं ते.त्यांनी मला कळवलं की लगेच तुला कळवीन."

शशांकच्या या बोलण्यावर प्राचीने मान हलवली. तिघांचीही काॅफी आणि सॅन्डविच संपलं होतं. खाता खाता चर्चाही झाली होती.आता राधा आणि शशांकला ऑफिसला जायचं असल्याने ते आपापल्या वाटेने निघून गेले. प्राचीने आज सुट्टी घेतल्याने ती घरी गेली. घरी गेल्यावर कामीनी बाईंना सगळं सांगायचं होतं.

***

कामीनी ट्रॅव्हल्स सुरु होऊन आज आठ वर्ष झालीत. पहिली तीन वर्ष हर्षवर्धनच्या तब्येतीत सुधारणा करण्याकडेच लक्ष होतं. त्यामुळे ट्रॅव्हलचा व्यवसाय मुंगीच्या पावलानी पुढे सरकत होता. तीन वर्षांत हर्षवर्धनच्या जिद्दीमुळे तसेच प्राची आणि कामीनीबाईंच्या कष्टामुळे हर्षवर्धन पुर्वी सारखा झाला.

आता हर्षवर्धनला फोनवर दुस-या शी कसं बोलावं हे समजू लागलं.

हर्षवर्धनचा या व्यवसायात ब-यापैकी जम बसला होता. हर्षवर्धनच्या अश्या केसमुळे सुरवातीपासूनच कामीनी बाई आणि प्राची या व्यवसायात हर्षवर्धनच्या बरोबरीनी मेहनत करत.कारण हर्षवर्धन एकदम खोलवर विचार करू शकत नसे.तसच एकदम निर्णय घेऊ शकत नसे.

आत्ता स्वतःच्या केबीनमध्ये बसून प्राची पुढच्या टूरचं सगळं नियोजन कसं केलेलं आहे हे बघत होती. हे बघता बघता प्राचीन मन भूतकाळात गेलं. तिला हर्षवर्धन,आणि कामीनी बाईं बरोबर भय्यासाहेबांचं घर सोडल्यापासूनचे दिवस आठवू लागले.

लग्नानंतर हर्षवर्धनची स्थिती बघता चिडून घटस्फोट घेण्याऐवजी तसंच भय्यासाहेबांनी दिलेली ऑफर स्विकारण्या ऐवजी तिनी हर्षवर्धनला सुधारण्याचं धाडस दाखवलं. ते दाखवताना ती भययासाहेबांबरोबर गनिमी कावा खेळली. प्राचीला प्राप्त करण्याच्या विकृत लालसेपायी त्यांना तिचा कावा कळलाच नाही.ही त्यांच्या दृष्टीनी त्यांची शोकांतिका होती.

आठ वर्षांपूर्वी कामीनी ट्रॅव्हल्स सुरू केलं होतं. सुरवातीला भाड्यावर बसेस घेऊन शशांकच्या मित्राच्या मार्गदर्शनाखाली छोटे टूर आखल्या गेले. शशांकचा मित्र मंगेश भाई ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रातील बारकावे प्राचीला समजाऊन सांगत असे.

सुरवातीला हर्षवर्धनला प्रवासात एकटं न पाठवता प्राची जात असे.राधा आणि शशांक मधून मधून तिच्याबरोबर जात.संपूर्ण प्रवास एकट्यानी नियोजीत करून पूर्ण करण्या इतकी हर्षवर्धनच्या मेंदूची कृती तत्परता वाढली नव्हती. बरेच वर्षांच्या व्यसनामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी झालेली होती.

सुरवातीला तो बरा झाल्यावर त्याला काही बौध्दीक कसरती करायला दिल्या होत्या.रोज पेपरमधे येणारे शब्दकोडे सोडवा असं तिथल्या डाॅ.नी सांगीतलं होतं. शब्द कोडं सोडवताना योग्य शब्द आठवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर ताण येईल .त्यातून हळुहळू त्याची विचार करण्याची शक्ती वाढेल तशी त्याला एक दिशा मिळेल.

पहिले काही दिवस तर तास न तास बसूनही त्याला एकही शब्द आठवायचा नाही. हळुहळू त्याच्या मेंदूकडून तसा अभ्यास करवून घ्यायला सुरुवात केली.प्राचीची एक मैत्रीण मतीमंद मुला़ंच्या शाळेत शिकवायची.तिला प्राची नी विचारलं की "तू याबाबतीत माझी काही मदत करू शकतील का?"

हर्षवर्धन मतीमंद नव्हता पण खूप वर्ष ड्रग्ज घेतल्याने त्याच्या मेंदूला शिथीलता आली होती. कुठलीही भावना असो मग ती रागाची असेल किंवा प्रेमाची त्यात आत्यंतिक वरची पातळी तो गाठत असे.तेव्हा तो जसा वागायचा ते मन घाबरवून सोडणारा असायचं.

त्या भावना इतक्या तीव्र पातळीवर व्यक्त होऊ नये म्हणून शारीरीक व्यायाम त्याच्यासाठी आवश्यक होता तसंच मेंदूला ही व्यायाम आवश्यक होता. हळुहळू या व्यायामामुळे त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल. हर्षवर्धन पूर्वीसारखा होण्यासाठी धीर धरावा लागेल असं डाॅ. म्हणाले होते.शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम सुरू केल्यावर लगेच त्याचा परीणाम अपेक्षीत करू नका हेही डाॅ.चं म्हणणं प्राची आणि कामीनी बाई दोघींनी लक्षात ठेवलं होतं.

***

एकाच क्षेत्रात असून मंगेशभय्या त्यातील ट्रेंड सिक्रेट सहजपणे प्राचीला सांगत होते हे विशेष होतं.

कामीनी बाईंना त्यांचा मुलगा परत मिळाला याचा आनंद होता.प्राचीच्या धाडसाचं त्यांना कौतुक वाटतं असे.हर्षवर्धन व्यसनाच्या विळख्यातून आता पूर्णपणें बाहेर पडला होता. आता त्याच्या मेंदुची शक्ती वाढवायची होती.

एकदा ते शशांकला म्हणाले होते." शशांक प्राची हुशार आहेच पण धोरणी सुद्धा आहे. तिनी जे धैर्य दाखवलंय हर्षवर्धनला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्याला तोड नाही.ती या क्षेत्रात नवीन आहे पण तिचे काही प्रश्न असे असतात जसं काही ती या क्षेत्रात फार वर्षांपासून आहे. तिला मार्गदर्शन करायला मला खूपच आनंद होतो. खरतर प्राची ट्रॅव्हल्स च्या क्षेत्रात माझी प्रतीस्पर्धी आहे. तरी मला तिची मदत करावीशी वाटते. प्राचीनी या क्षेत्रात खूप लांबचा पल्ला गाठावा अशीच. माझी इच्छा आहे."

" मंगेश भाई प्राचीशी माझी ओळख राधा मुळे झाली. पण प्रत्येक भेटीत तिचा समजूतदारपणा आणि हर्षवर्धनला या व्यसनामुळे बाहेर काढण्याची तिची जिद्द मला दिसायची. म्हणून ती मला ग्रेट वाटते."

दोन वर्षापूर्वी कामीनी ट्रॅव्हल्सचं स्वतःचं ऑफीस झालं होतं. हर्षवर्धन आणि प्राचीच्या लग्नाला आठवर्ष झाली होती.त्यातील दोन वर्ष हर्षवर्धनला पाहिल्यासारखं करण्यात गेली. या सगळ्या घडामोडीत राधा आणि शशांक यांची प्राचीला खूप मदत झाली होती.

दोन वर्षांपूर्वी राधा आणि शशांक यांचं लग्न झालं. ते दोघं अजूनही प्राची आणि हर्षवर्धनच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत.

***

सुरवातीच्या काळात टूरवर प्राची बरोबर राधा आणि शशांक पण असतं. प्रत्यक्ष प्रवासात काय अडचणी येऊ शकतात हे मंगेशभय्यांनी प्राचीला सांगीतलं होतं.पण तोंडी सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षात ती अडचण आल्यावर सोडवणे हे वेगळं.

स्वत: प्राची प्रवासात असल्याने दोन गोष्टी झाल्या.
एक गोष्ट म्हणजे अडचणी अशाप्रकारच्या येऊ शकतात हे तिला कळलं. दुसरी गोष्ट ट्रॅव्हल कंपनीची मालकीण आपल्याबरोबर आहे. आपल्याशी बोलते.आपल्या अडचणींची लगेच दखल घेते. हे लक्षात आल्यानी प्रवासी खूष असायचे.

प्राचीला अश्या प्रवाशांनी केलेली जाहीरातच आणखी प्रवासी मिळवून द्यायचे.

कामीनी बाई हर्षवर्धनची देखभाल करण्यासाठी घरी असतं.
हळुहळू हर्षवर्धन मध्ये आत्मविश्वास जाणवू लागला होता. बोलतांना सुरवातीला तो अडखळायचा कारण पुढचं वाक्य कसं म्हणायचं हे त्याला पटकन कळत नसे.

आता ब-यापैकी तो उत्तर विचार करून देऊ लागला होता.या वेळच्या टूरमध्ये हर्षवर्धनला बरोबर घेऊन जावं असं प्राचीला वाटत होतं.
__________________________________
क्रमश: हर्षवर्धन प्राची बरोबर जाईल का? गेला तर तिथे हर्षवर्धनकडून कसा प्रतिसाद मिळेल? बघू पुढील भागात.
मीनाक्षी वैद्य.