Kamini Traval - 7 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ७

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ७वा
मागील भागावरून पुढे.

संध्याकाळी नववधू प्राचीचं स्वागत पटवर्धनांच्या घरी खूप झोकात झालं. संपुर्ण बंगल्याला दिव्यांची रोषणाई केली होती.मुख्य दारापासून आतल्या दारापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. दोघांवरही फुलांचा वर्षाव केल्या जात होता.

नवीन नवरीच्या गृहप्रवेश झाला. नंतर उखाणे घेण्याचा कार्यक्रम झाला. इतकावेळ हर्षवर्धन आपल्याबरोबर असूनही तो आपल्यापासून खूप लांब आहे असंच प्राचीला वाटत होतं. त्याच्याकडे ती डोळ्यांच्या कोप-यातून बघत होती. त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. तो ढिम्मच बसलेला होता.

तिचं लक्ष सासूकडे गेलं आत्ताही त्यांचा चेहरा तसाच गंभीर होता जसा मांडवात होता. तिला एका खुर्चीवर बसायला जागा दिली कोणीतरी. ती बसली नंतर थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं ज्याची बायको म्हणून आपण या घरात आलो तो कुठेच दिसत नव्हता. बाकी सगळे चेष्टा मस्करी करण्यात गुंतले होते.तिचं भय्यासाहेबांकडे लक्ष गेलं ते तर खूपच रंगात आले होते.

तिचं त्यांच्याकडे लक्ष जायला आणि त्यांनी तिच्याकडे बघायला एकच वेळ झाली.ते ज्या पद्धतींनी हसले तिच्याकडे बघून तिच्या अंगावर सर्ररर...काटाच आला. तिनी मान खाली घातली.ज्याच्या डोळ्यात ती हे भाव शोधत होती तोच तिथे नव्हता.तिनी कामीनी बाईंकडे बघीतले.त्याही तिच्याकडे बघत होत्या पण त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता. कामीनी बाई, हर्षवर्धन आणि प्राची या तिघांना सोडून सगळे लागलेल्या गाण्यावर नाच करत होते.तिला काही सुचलं नाही.

ती हळूच कामीनी बाईंना म्हणाली " बसा नं इकडे उभ्या का?" त्या तिच्या शेजारी येऊन बसल्या. बोलल्या नाही. प्राचीच्या लक्षात आलं यांचे डोळे यांना जे बोलायचय ते बोलतात आहे. प्राचीनी धीर एकवटून विचारलं " काय झालं? गप्प का? त्या काही बोलणार तेवढ्यात भय्यासाहेबांचा आवाज आला " अगं मधुरा प्राचीला घेऊन ये इकडे." कामीनी बाई न बोलताच त्या उठून आत गेल्या.

मधुराने धावत येऊन प्राचीचा हात पकडला."चल वहिनी नाचायला.आज भय्या काका खूप खूष दिसतात आहे. आम्ही एवढी धमाल होईल अशी अपेक्षाच केली नव्हती." मधुराने ओढूनच नेलं प्राचीला. शेवटी तिला थोडं नाचावं लागलं. नाचतानही तिचं लक्ष आपल्या सासूकडे होतं. हर्षवर्धनचे काका काकू सुद्धा आनंदात सामील झाले होते. फक्त याच एकट्या कुठेतरी उभ्या होत्या.

त्यांचे विषण्ण डोळे तिला आनंदाने नाचू देत नव्हते. या नाचाचा आनंद ज्यांच्याबरोबर अधिक वाढला असता तो कुठे अदृष्य झाला होता हे तिला कळत नव्हतं.थोडावेळ नाचून ती सोफ्यावर येऊन बसली. जरा वेळाने सगळंच थांबलं कारण सगळ्यांना भूक लागली होती.प्राचीने त्या मधूराला हाक मारली.ती कोणाची कोण हे प्राचीला माहिती नव्हतं.पण मघाशी दोघी बरोबर नाचल्या म्हणून ओळख झाली होती.

"काय वहिनी काही हवंय?" मधुरानी विचारलं " अगं मला कपडे बदलायचे आहेत.कुठे बदलु?आणि माझी बॅग कुठे आहे?" प्राची नी विचारलं." एवढंच नं थांब काकूला विचारुन सांगते आणि तुझी बॅग बघते." ती आली तशीच वेगाशी काकूला विचारायला पळाली.

मधुरा पळत गेली पण प्राचीच्या डोक्यात विचार चालू झाले. ही आपल्या हर्षवर्धन दादाला विचारीन असं का नाही म्हणाली? मघाशी सगळे नाचत होते पण ज्याचं लग्नं होतं तोच या सगळ्यात नव्हता आणि कुणी काही त्यांच्याबद्दल विचारपूस सुद्धा केली नाही. हर्षवर्धन खरच इतका अबोल आहे की शिष्ट आहे.

त्याला हा सगळा गोंधळ गडबड आवडतं नाही का? काहीच कळत नाही. कामीनीबाई पण आता दिसत नव्हत्या. ती विचारातचं होती तेवढयात मधुरा तिथे आली."हे घे वहिनी तुझी बॅग. तुला तुझी खोली दाखवते.चल." मधुरा पाठोपाठ प्राची जीना चढून वर चालली होती. चढता चढता मधुराशी तिच्या जुजूबी गप्पा झाल्या.

"वहिनी काकू म्हणाली तुझं कपडे बदलून झाले की खोलीतच थोडा आराम कर.जेवायची वेळ झाली की तुला हाक मारीन." "हो चालेल. मधुरा तू कोणत्या वर्षाला शिकतेय."," वहिनी मी आता MBAला ॲडमीशन घेतली आहे." " अरे वाह मस्त. MBA झाल्यावर जाॅब करणार नं!" " हो आमचा गृप पुढच्या वर्षीच शोधायला लागणार." " तुझ्या सगळ्या मित्र मैत्रीणीना माझ्या शुभेच्छा सांग." " वहिनी खरं सांगू मला तू खूप आवडली." "मलापण तू आवडलीस." "आपली मैत्री होऊ शकते वहिनी?" "का नाही. आपल्यामधलं नातं आपण बाजूला ठेऊन.मग छान जमेल आपली गट्टी." एवढं बोलुन प्राची हसली तशी मधुरा पण हसली.

मधुरा आली तशीच निघून गेली. प्राचीला खरंतर हर्षवर्धन कुठे आहे?तो लाजरा,अबोल आहे का शिष्ट आहे हे तिला विचारायचं होतं. तिच्या दृष्टीनी हर्षवर्धन आणि कामीनी बाई दोघही रहस्यमय होते.ते रहस्य काय आहे हे तिला शोधायचं होतं.पण कसं? मधुराच एक होती जिला आपण विचारू शकत होतो पण तिही गडबडीनी निघून गेली. या घरात येऊन आपल्याला काहीच तास झाले. कोणाला आणि कसं विचारावं तिला कळत नव्हतं.

ऊद्या तर भेटतील हर्षवर्धन आणि कामीनी बाई मग त्यांनाच विचारु. विचार करता करता तिचे कपडे बदलून झाले.जरीच्या त्या साडीत तिला खूपच गुदमरल्या सारखं झालं होतं. अंगावरचे दागीने काढल्यावर आणखी मोकळं वाटलं तिला.

ब-याच वेळानी पुन्हा मधुरा बोलवायला आली. तेव्हा थकल्यामुळे प्राचीला खुर्चीवर बसल्या बसल्याचे झोप लागली होती." वहिनी जेवायला चला." मधुराच्या हलवण्यामुळे आणि तिच्या आवाजामुळे प्राचीला जाग आली.मधुरा तिच्याकडे बघून गोड हसली..प्राचीही हसली. दोघी जेवणासाठी खाली उतरल्या.

***

आज प्राची आणि हर्षवर्धनच्या लग्नाचा दुसरा दिवस होता. आज हर्षवर्धन आणि प्राची दोघं करणार होते पूजा. प्राचीच्या आई-वडिलांना आणि काका काकूंना जेवण्याची आमंत्रण होतं.गुरुजी वेळेवर आले.तशी पूजेची मांडामांड करून गुरुजी म्हणाले " बोलवा नवीन जोडप्याला." हे काम पुन्हा मधुरा कडेच आलं.ती प्राचीच्या खोलीजवळ आली. दार आतून बंद होत म्हणून दारावर टकटक करून म्हणाली " वहिनी मी आहे मधुरा. गुरूजींनी बोलवलं आहे." प्राची नी दार उघडलं.तयार झालेल्या प्राची कडे मधुरा डोळे विस्फारून बघत होती.

पिवळ्या जर्द साडीला लाल चुटूक काठ खूप सुंदर दिसत होते. काठावरचं डिझाईन सुंदर होतं.साडीचा पदरही झोकदार होता. "वहिनी साडी आणि दागीन्यांमुळे तू सुंदर नाही दिसत तर…"हे वाक्य ऐकून प्राचीचा चेहरा उतरला. तशी हसत मधुरा म्हणाली " वहिनी तुझ्यामुळे या साडीला आणि दागीन्यांना शोभा आली असं म्हणायचय मला." "होका.मला वाटलं ही कोणती खाष्ट नणंद आहे जी मला असं म्हणू शकते." असं म्हणत तिच्या गालावरून प्राचीनी हात फिरवला.

दोघी जिन्यावरून बोलत बोलत खाली येऊ लागल्या.प्राचीला बघताच भय्यासाहेबांचा दिलं एकदम खल्लास झाला होता. तिचं सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी आकंठ पीत होते. त्यांच्या मनातील विचार तिथे जमलेल्या कोणाच्या लक्षात येणं शक्य नव्हतं.तेवढे भय्यासाहेब हुशार होते.

चौरंगासमोर ठेवलेल्या दोन पाटांवर हर्षवर्धन आणि प्राची बसले होते. अचानक तिचं लक्ष वासंती कडे गेलं तिनं बसल्याबसल्याच हसून स्वागत केलं.प्राचीचं हसणं बघून अशोक वासंती खूष झाले. पुजा चालू झाली. हर्षवर्धनला काही समजलं नाही तर तिची सासू त्याला समजेल असं सांगत असे.

त्या पुजेच्या वेळात तिला बरंच काही लक्षात आलं. हर्षवर्धनला कोणतीच गोष्ट एकदा सांगून कळत नाही. दोनदा तरी सांगायला लागते. यापुढे आपल्याला कोणकोणत्या गोष्टीत कसं हर्षवर्धनशी जमवून घ्यावं लागेल याचा ती अंदाज घेत होती. आपल्या मनात काय चालू आहे हे प्राची चेहे-यावर अजीबात दिसू देत नव्हती.

पूजा संपल्यावर जेवणी झालीत नंतर पुन्हा गप्पांचा फड रंगला. त्यात प्राचीने आईबाबा आणि काकाकाकू पण सामील होते. कामीनी बाई या गप्पांमध्ये नव्हत्या. प्राचीला आश्चर्य वाटलं अख्खं घर गप्पांत रंगलंय आणि या कुठे गेल्या. तिला त्यांना बघावं वाटलं पण बघणार कुठे? अजून तिला हे घर नवीन होतं.या घराला किती खोल्या आहेत हे सुद्धा कळायचं होतं.ती गुपचुप आपल्या आईजवळ जाऊन बसली.

वासंतीनी कौतुकानी तिच्या चेह-यावरुन हात फिरवला. दोघी एकमेकींकडे बघून हसल्या. शब्दांच्या पलीकडले होते दोघींच्या डोळ्याचे संवाद. एकुलती एक मुलगी तिला एक दिवसानंतर वासंती बघत होती. त्यामुळे वासंतीला गलबलून आलं होतं ती काहीच बोलू शकली नाही.

सगळे पाहुणे हळुहळू आपापल्या घरी जायला निघाले.ते सगळे निघतांना प्राची सगळ्यांना खाली वाकून नमस्कार करत होती.ती एकटीच नमस्कार करत होती. कारण हर्षवर्धन होताच कुठे? मधुरा येऊन प्राचीला म्हणाली " वहिनी तुला कंटाळा आला की आमच्याकडे येत जा." "हो नक्की." प्राचीही हसून म्हणाली.

मधुरा ही आपली चुलत नणंद आहे हे तिला काल कळलं होतं. ती प्राचीला खूपच आवडली.नटखट चळवळी होती मधुरा. ती या घरात राह्यली असती तर किती छान झालं असतं असं क्षणभर प्राचीला वाटलं.

संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे गेलेत. आता घरात फक्त चौघजणच होते. भय्यासाहेब,कामीनीबाई हर्षवर्धन आणि प्राची. पटवर्धनांच्या घरी गृहप्रवेश झाल्यानंतर प्राचीला हर्षवर्धनचं नख तिला दिसलं नव्हतं. प्राचीची नजर खरंतर त्यालाच शोधत होती.आज त्यांची पहिली रात्र असणार यांनी प्राचीच्या अंगावर रोमांच उठला पण क्षणभरच. नंतर तिला वाटलं आजतरी हर्षवर्धन आपल्याला भेटणार आहे की नाही.

प्राची आपल्याच विचारात दंग होती.कुठे बसावं तिला कळलं नाही म्हणून ती स्वयंपाकघरात जाऊन बसली होती. तितक्यात कामीनी बाई तिथे आल्या. प्राचीला असं बसलेलं बघून क्षणभर त्यांना काही सुचलं नाही. "प्राची काय ग अशी का बसलीस?" आज पहिल्यांदा तिनी आपल्या सासूचा आवाज ऐकला."मला कळलं नाही कुठे बसावं म्हणून इथे बसले." यावर कामीनी बाईंनी तिच्याकडे बघून हलकं स्मीत केलं.

"प्राची तू अशी इथे नको बसू. यांनी बघीतलं तर हे रागावतील." "का? " प्राचीनी न कळून प्रश्न केला. " तू अजून नवीन आहेस या घरात.तुला काही हवं आहे का?भूक लागली का? शालीनी करतेच आहे स्वयंपाक" शालीनी ने हसून प्राचीला म्हटलं " हो स्वयंपाकच करतेय वहिनी पण थोडं थांबावं लागेल." "नाही एवढी भूक नाही लागली मला." प्राची हे बोलतेच आहे की भय्यासाहेब दारातुनच कामीनी बाईंवर ओरडले." काय हो तुम्हाला कळत नाही.आजच लग्नं झालं आहेनं हिचं. लगेच स्वयंपाकघरात जुंपलीत तिला. शालीनी कशाकरता येतेय."

कामीनी बाईंचं तोडच बंद झालं त्या चुपचाप उभ्या होत्या त्या बोलल्या नाही तर शालीनी कशाला बोलेल. प्राचीला दोघींची कीव आली.शेवटी तीच बोलली."मी स्वयंपाक करत नाही.मी कुठे बसावं हे मला कळलं नाही म्हणून इथे आले." " अरेच्या होका अगं मग समोर बसायचं खुर्चीवर. चल ये बाहेर बसू आपण." भय्यासाहेब स्वयंपाकघरातून बाहेर पडले.

कामीनी बाई आणि शालीनी चे चेहरे विचीत्र झाले.पण तिकडे लक्ष न देता प्राची बाहेरच्या खोलीत आली. बाहेर सोफ्यावर भय्यासाहेब बसलेत त्याच्या बाजूच्या खूर्चीवर प्राची बसली. सहज तिचं लक्ष भय्यासाहेबांकडे गेलं तर ते एकटक तिच्याकडे बघत होते. त्यांच्या अश्या बघण्यानी प्राचीला कसंतरीच वाटलं. तिचं स्वयंपाकघराकडे लक्ष गेलं तर तिथे दारात कामीनी बाई उभ्या. होत्या. त्यांचा चेहरा केविलवाणा होता.

"काय आवडतं तुला जेवणात?"भय्यासाहेबांनी प्राचीला विचारलं. "सगळं आवडतं."प्राची कसंबसं बोलली. तेवढ्यात तिला राधाचा फोन आला आणि तिला सुटल्यासारखं वाटलं." एक मिनीट माझ्या मैत्रीणीचा फोन येतोय." असं म्हणत ती भरभर पाय-या चढून आपल्या खोलीत गेली. खोलीत शीरता शीरता तिच्या कानावर भय्यासाहेबांचं ओरडणं ऐकून आलं. "माझ्यावर नजर ठेवता का तुम्ही ?आत जा" भय्यासाहेब कामीनी बाईंवर खेकसले.

कामीनी बाईंना आत्ता सुटल्यासारखं वाटलं पण किती दिवस यांच्यापासून आपण प्राचीला वाचवू शकू.भय्यासाहेब मनातच चरफडत होते. त्या फोनला सुद्धा आताच यायचं होतं. कामीनीबाई आपल्या खोलीत गेल्या. हर्षवर्धन त्याच्या खोलीतल्या पलंगावर अस्ताव्यस्त पडला होता त्याला कसलं भान नव्हतं. त्याला असं बघून त्या उदास झाल्या. आपल्या मुलाचं भविष्य त्यांना कळलं होतं पण या मुलीचं काय?

तिच्याशी हर्षवर्धनचं लग्नं का केलं हे त्या जाणून होत्या.त्यांना प्राची खूप आवडली होती.तिला यांच्यापासून वाचवायचं हे त्यांनी मनात पक्कं ठरवलं.पण खरी भीती आज रात्री होती. हर्षवर्धनला असं बघून प्राची कशी वागेल हा त्यांना प्रश्न पडला होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा भीती वाटत होती.

रात्री कामीनी बाईंनी तिला सांगीतलं " प्राची आज तुमची पहिली रात्र आहे.तू इकडच्या खोलीत जा.हे घे दुधाचा ग्लास." बोलतांना त्या प्राचीचा चेहरा बघत होत्या. ती सहाजीकच थोडी लाजत होती.पण दुधाचा ग्लास घेऊन ती सासूनी सांगीतलेल्या खोलीत गेली.भय्यासाहेब लांबून तिच्याकडे बघत होते.तिचा लाजलेला चेहरा बघताच.त्यांच्या हृदयाची धडधड वाढली.ते थोडे निराश झाले. हाताच्या मुठी आवळत चरफडत आपल्या खोलीतच फे-या मारत होते.

प्राची खोलीत शिरली हळूच दार लावलं आणि ती पलंगाकडे गेली तर तिला हर्षवर्धनचं पोट धरून विव्हळणं बघून प्राची गोंधळून गेली. प्राचीनी ग्लास टेबलवर ठेवला आणि हर्षवर्धनकडे वळली. "काय झालं तुम्हाला? तुमचं पोट दुखतंय का?" त्याने मान हलवून हो म्हटले आणि बोलला "आईकडे औषध आहे ते मला आणून दे." " हो आणते" घाईनी प्राची खाली धावत आली आणि म्हणाली

"आई हर्षवर्धन बघा कसं करतात आहे.त्यांच पोट दुखतय तुमच्याकडे औषध आहे नं" प्राचीचा चेहरा भेदरलेल्या होता. कामीनीबाईपण धास्तावल्या.आज त्याची पुडी द्यायची राह्यली होती. त्या चटकन उठल्या आणि कपाटातून पुडी काढली आणि खोलीकडे निघाल्या.मागून घाबरलेली प्राची होती. भय्यासाहेब जोरात ओरडले." तुम्हाला अक्कल नाही का? त्याला वेळेवर पुडी द्यायला नको?" "देतेय" घाबरलेल्या आवाजात त्या बोलल्या.

दोघी खोलीत शिरल्या. हर्षवर्धन विव्हळत होता. कामीनीबाईंनी पुडी फोडल्याबरोबर प्राचीला काहीतरी संशय आला आणि तिनी पुडीतलं औषध नाकाजवळ नेलं तसा तिचा संशय पक्का झाला. तेव्हाच तिचा नाकाजवळ असलेला हात खरकन कामीनी बाईंनी खाली खेचला. प्राची ओरडली "नको वीष आहे हे." पण त्यांच्या हातातली पुडी हिसकावून हर्षवर्धनने ती नशा ओढायला सुरुवात केली. प्राचीच्या पायाखालची जमीन सरकली. कामीनीबाई केवीलवाण्या होऊन तिच्याकडे बघत होत्या.

"वीष आहे कळतंय नं तुम्हाला मग का देता ही पुडी हर्षवर्धनला?"
कामीनी बाई रडतच बोलल्या "काय आणि कसं सांगू तुला त्यामागचं रामायण?"

प्राचीच्या अंगाचा तिळपापड झाला. ती म्हणाली "तुम्ही फसवलत आम्हाला. तुमचा मुलगा असा आहे हे तुम्हाला माहिती होतं नं. माहिती असणारच तुम्हीच आत्ता पुडी दिली त्याला. मग का केलं त्याचं लग्नं? तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणून मी सगळं सहन करीन. बोला आता गप्प का?" कामीनी बाई नुसत्या रडत होत्या. त्यांचं रडणं बघून ती आणखी चिडली आणि खोलीतल्या खुर्चीवर जाऊन बसली. रागानी तिला रडू पण फुटत नव्हतं.

प्राचीच्या आवाजांनी भय्यासाहेब वरती आले.त्यांना प्राची रागानी बसलेली दिसली आणि कामीनी बाई रडत होत्या हर्षवर्धन नशा करून पडलेला होता."काय चाललं आहे? एक काम तुम्हाला नीट करता येत नाही. पुडीची वेळ लक्षात ठेवता आली नाही.आपल्या खोलीत जा तूम्ही. झोपेल तो."नंतर प्राची कडे जाऊन त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटले.

"रागाऊ नकोस" खांद्यावरच्या त्यांचा हात झटकत ती म्हणाली" दूर व्हा माझ्यापासून.धोका दिलाय तुम्ही." प्राची रागानी लालबुंद झाली होती. तिच्याकडे बघत हसत भय्यासाहेब म्हणाले
"रागावलीस की आणखी छान दिसते" "छी काय बोलतात तुम्ही" कमीनी बाई न राहवून बोलल्या.

"काय म्हणालात? तुम्ही मला शिकवताय? हिम्मत कशी झाली तुमची? तुम्हाला तुमची मर्यादा सांगावी लागेल का? चला" हे बोलतांना त्यांनी त्यांचा दंड धरून असा पिरगळला की कामीनीबाईंच्या तोंडून "अआईग.." असा रडवेल्या आवाजात उद्गार निघाला. भय्यासाहेबांनी त्यांना खोलीच्या बाहेर काढलं. कामीनी बाईंना बाहेर काढून ते पुन्हा प्राचीच्या खोलीत शिरणार होते पण तेवढ्यात प्राचीनी चपळाईनी दाराला आतून कडी घातली.

भय्यासाहेब रागानी हाताच्या मुठी आवळू लागले.मनात राग होता तरी प्रेमानी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. "प्राची दार उघडं.एवढी रागाऊ नकोस." " मी नाही उघडणार दार." बराच वेळा त्यांनी तिला म्हणून बघीतलं पण प्राचीनी काही दार उघडलं नाही.ती संतापानी नुसती थरथरत होती.

भय्यासाहेब मनाशी चरफडतच आपल्या खोलीत गेले.

***

अशोक आणि वासंती मात्र प्राची वर काय संकट कोसळलं आहे याबद्दल अनभिज्ञ होते. आपली मुलगी छान घरी पडली.आता तिची आयुष्यभर काटकसरीशी ओळख होणार नाही.मजेत राहील.या विचारांनीच दोघं सुखावले.

"वासंती आज खूप बरं वाटतंय. प्राचीला हवं ते दिलं आपण.भय्यासाहेबांसारखी आपली कुठे पैशाची एवढी झेप?" "होन.खरच सुखात राहील आता.नोकरीसुद्धा करायची गरज नाही तिला." "वासंती छान कडक काॅफी कर.निवांतपणे काॅफी घ्यायची आहे. खूप धावपळ झाली." " हो करते." असं म्हणून वासंती स्वयंपाक घरात गेली." अहो पण ती आता सासरी गेली आहे हे लक्षात ठेवणं कठीण जातंय. सतत तिचा आवाज,तिची मस्ती याची सवय झाली होती." "होनं.पण मुलगी म्हटल्यावर तिचं लग्नं कधी ना कधी करावी लागणार."

काहीच न बोलता दोघंही शांतपणे काॅफी पिऊ लागले.

***

हर्षवर्धन ड्रग घेतो हे या लोकांनी लपवून ठेवलं यांचा प्राचीला राग आलाच पण काकुळतीला येऊन केवीलवाणा चेहरा करणा-या कामीनीबाईंचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. तिला प्रश्न पडला आपला मुलगा नशेच्या आहारी गेलाय हे यांना कळलं कसं नाही. एवढा पैसा असतांना त्याला रिहॅब सेंटरला का पाठवलं नाही.

प्राचीला या सगळ्या प्रश्नांनी गरगर फिरवलं होतं.लग्नाआधी ती या घरात आपल्या सासूला स्थान मिळवून द्यायचच या विचारावर ठाम होती. पण आता कळतंय हे वेगळंच आहे.

भय्यासाहेबांचा लंपटपणा तिच्या लक्षात आला होता. त्यांच्या कडक स्वभावामुळे हर्षवर्धन असा वागत असेल असं तिला वाटतं होतं. लग्नं झाल्यावर आपण त्याला आत्मविश्वास मिळवून देऊ मग सगळं ठीक होईल असं तिला वाटलं होतं पण इथे वेगळंच दिसलं तिला.

हर्षवर्धनला यातून कसं बाहेर काढणार? हर्षवर्धनच्या चुप्पी मुळे लग्नाच्या मांडवात आधीच कुजबूज चालू होती आता हे वेगळं प्रकरण कसं झेलायचं?

प्राचीचं लक्ष हर्षवर्धनकडे गेलं त्याला मघाशी घडलेल्या गोष्टींशी काही देणं घेणं नव्हतं. तो निपचीत पलंगावर पडला होता. त्याच्या चेह-यावर निरागसता होती आणि प्राची समोर खूप मोठा प्रश्न 'आ' वासून उभा होता. तिनी राधाला मेसेज केला.

एवढ्या रात्री प्राचीचा मेसेज बघून राधा धास्तावली. तिनी लगेच मेसेज वाचला. प्राचीनी लिहीलं होतं. "राधा मला हर्षवर्धनच्या वागण्यामागचं जे कारण वाटतं होतं ते नाही आहे. जे कारण आहे ते भयंकर आहे.तो नशेच्या आहारी गेलाय. आणि त्या नशेची पुडी त्याची आईच त्याला देते".

नंतर मघाशी जो प्रसंग घडला तो राधाला तिने सविस्तर लिहून पाठवला. भय्यासाहेबांचं वागणं कसं विचीत्र आहे हेपण लिहीलं. राधाला मेसेज केल्यावर प्राचीला थोडं हलकं वाटलं

"राधा आई-बाबांना हे सांगू नको.त्यांना फार धक्का बसेल आधी मी या धक्क्या तुन सावरू दे.मग मीच सांगीन."
"प्राची घाबरू नको मी नाही सांगणार.पुढे काय करायचं हे मात्र तुला लवकर ठरवायला हवं." राधाचा लगेच रिप्लाय आला.

ती खुर्चीवर डोकं टेकवून डोळे मिटून बसली.त्यातच तिला कधीतरी झोप लागली.
---------------------------------------------------------------
क्रमशः.
लेखिका...मीनाक्षी वैद्य.