Kamini Traval - 11 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ११

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ११

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ११

मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धन आणि कामीनी बाईंसह भय्यासाहेबांचं घर सोडलं आणि आता ते वेगळ्या ठिकाणी राहू लागतात आता पुढे बघू.

***

प्राची हर्षवर्धन आणि कामीनीबाई यांना भय्यासाहेबांचं घर सोडून बरेच दिवस होतात. हर्षवर्धनची तब्येत आता छान झाली असते.

आत्ता पर्यंत हर्षवर्धनला नवरा बायको हे नातं कळलेलं नव्हतं कारण ड्रग्जने त्याच्या मेंदूचा ताबा घेतलेला होता. प्राचीने कामीनी बाईंच्या डोळ्यातील वेदना वाचली आणि तिने हर्षवर्धनला या ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं ठरवलं.प्राची आणि कामीनीबाईंनी यासाठी खूप कष्ट घेतले.त्याचच फळ म्हणजे हर्षवर्धन पहिल्या सारखा होउन घरी परतला.

हर्षवर्धन ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर पडला पण अजूनही त्याचा मेंदू खूप सक्षम झालेला नव्हता त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता हर्षवर्धनच्या मेंदूत आलेली नव्हती.

हर्षवर्धन दिवसेंदिवस प्राचीकडे एका अनामिक ओढीने खेचल्या जात होता. प्राचीशी बोलताना बराच अडखळायचा पण त्याचे डोळे मात्र त्याच्या मनातील प्रेमाची भावना बोलायचे.

हर्षवर्धन आता प्राचीशी खूप प्रेमाने बोलायला लागला असतो. त्याच्या प्रेमळ नजरेनं प्राची क्षणोक्षणी मोहरते असते आणि पुन्हा पुन्हा हर्षवर्धनच्या प्रेमात पडत असते.

कामीनीबाईंना दोघांच्या नजरेतील प्रेमाचा खेळ बघून खूप आनंद होतो.याच दिवसांची तर त्या वाट बघत होत्या. कामीनीबाई मनोमन देवाजवळ प्रार्थना करत असतात की,

"परमेश्वरा प्राची आणि हर्षवर्धन यांचं प्रेम असंच बहरू दे.या प्रेमाची हर्षवर्धनला गरज आहे.या प्रेमाच्या बळावर तो पूर्वीसारखा होईल.प्राचीचे माझ्यावर खूप उपकार आहेत.मी कशी उतराई होऊ मला कळत नाही पण प्राची आणि हर्षवर्धनचा संसार सुखाचा कर एवढंच मागणं आहे."

***

हर्षवर्धनसाठी भविष्यातील उद्योग धंद्याचा विचार आता प्राची आणि कामीनी बाई करू लागतात.

हर्षवर्धन एकदा कामीनी बाईंना म्हणाला,

" आई मी काही काम करू शकेन काग?"

हर्षवर्धनच्या डोळ्यात उमटलेली अगतीकता बघून कामीनी बाईंना भडभडून आलं. कसतरी स्वतःला सावरून त्या म्हणाल्या, "हर्षवर्धन तू चिंता करू नकोस.सगळं ठीक होईल. प्राची आणि मी दोघी तुझ्या बरोबर आहोत." कामीनी बाईंनी हळूच हर्षवर्धनच्या चेह-यावरून हात फिरवला. हर्षवर्धनने तत्क्षण कामीनी बाईंचा हात घट्ट पकडला.त्याच्या मनातील उलघाल कामीनी बाईंना कळत होती.
त्या म्हणाल्या, " हर्षवर्धन तुला आयुष्याचा जोडीदार खूप चांगला मिळाला आहे. प्राची जर नसती तर तू या ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर आला असता की नाही माहिती नाही. पण तू आता चिंता करू नकोस.प्राची खूप धीराची आणि कणखर मनाची आहे.तुला ती अशी मधेच सोडणार नाही.पुन्हा पहिल्या सारखं होण्यात तुला मदत करेल.हं कळलं?"

हर्षवर्धनच्या डोळ्यात आता भीतीऐवजी प्राची बद्दल प्रेम दिसू लागलं.

" आई मला प्राची खूप आवडते.किती हुशार आणि प्रेमळ आहे.मला ती सोडून जाणार नाही नं!"

" हर्षवर्धन प्राचीने तुला त्या दिवशीच सोडलं असतं ज्या दिवशी तिला तू ड्रग्जच्या जाळ्यात अडकला आहेस हे कळलं.पण तिने तसं केलं नाही.तिने तुला या ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी धडपड केली.ती कशी तुला आता मध्येच सोडून जाईल.तू आता ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर आला आहेस.आता तू तिचं सगळं ऐक. एवढच कर. तिच्या हातात हात देउन पुढे जा. करशील नं बाळा असं.ऐकशील नं माझं?"

"हो आई." एवढं बोलून हर्षवर्धनने कामीनी बाईंना मिठी मारली.त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं.
कामीनी बाईंचे डोळेही ओलांडले.

प्राचीने दारातूनच दोघांचं संभाषण ऐकलं होतं.प्राचीच्या लक्षात आलं की हर्षवर्धनला आपल्या प्रेमाची उब द्यायला हवी तेव्हाच तो या भांबावलेल्या मन: स्थितीतून बाहेर येईल.

प्राचीच्या चेहे-यावर एक हलकासा स्मीत उमटलं.तिने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकला.आई मुलाच्या या सुंदर क्षणाला अडथळा न आणता प्राची हळूच आवाज न करता आपल्या खोलीत गेली.

खोलीत आल्यावर तिच्या आवडत्या इझीचेअरवर बसून तिने शांतपणे डोळे मिटले.तिच्या डोळ्यासमोर गेल्या काही दिवसांचा तिने केलेला संघर्ष हर्षवर्धनसाठी केलेली धडपड, कामीनी बाईंना दिलेला आधार आणि भय्यासाहेबांसारख्या विकृत विचारांच्या माणसाला दिलेली हुलकावणी तसंच स्वतःला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी केलेली धडपड सगळं सगळं तिला आत्ता आठवलं.

प्राचीच्या मनात आलं हे सगळं झालं. आता हे भूतकाळात जमा झालं. खरी परीक्षा पुढे आहे. हर्षवर्धनमधे आत्मविश्वास निर्माण करावा लागणार आहे. ड्रग्जमुळे काम न करणाऱ्या त्याच्या मेंदूला कार्यरत करावं लागणार आहे. हे करताना त्यांचं मन सांभाळून करावं लागणार आहे. ही तारेवरची कसरत असणार आहे याची पूर्ण कल्पना प्राचीला होती.

कामीनीबाईंचा तिला भक्कम पाठींबा असल्यानेच तर प्राचीने हर्षवर्धनच्या आयुष्याचं शिवधनुष्य उचलण्याची हिंमत केली होती. तेव्हा जर कामीनी बाईंनी भय्यासासेबांना घाबरून त्यांचं पाऊल मागे घेतलं असतं तर आज ती हर्षवर्धनला या विषारी विळख्यातून बाहेर काढून शकली नसती. या कामात आपल्या बरोबर कामीनी बाईंचाही तेवढाच सिंहाचा वाटा आहे हे प्राची जाणून होती.

विचार करता करता प्राचीचा डोळा कधी लागला हे तिलाच कळलं नाही.

****
कामीनी बाईं प्राचीशी बोलण्यासाठी तिच्या खोलीत आल्या तर तिला ती इझीचेअरवर झोपलेली दिसली. क्षणभर कामीनी बाईंना वाटलं,

''झोपू द्यावं पोरीला. किती दगदग झाली आहे तिला आत्तापर्यंत. माझ्या हर्षवर्धनचं नशीब चांगलं म्हणून एवढी विचारी, समजुतदार,नीट बायको मिळाली. लग्न झाल्यादिवसा पासून प्राची तिला बायको म्हणून न ओळखणा-या माणसासाठी सावित्रीसारखी लढली. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री किती स्वप्न उराशी बाळगून मुलगी नव-याची वाट बघत असते. प्राचीच्या नशीबात मात्र ड्रग्ज न मिळाल्याने होणा-या वेदनेने विव्हळणा-या नव-याची वाट बघणं लिहीलं होतं.एखादी असती तर ती हे घर हा असा नवरा सोडून गेली असती. प्राचीने असं केलं नाही हे माझं आणि हर्षवर्धनचं भाग्य चांगलं.

कधी कधी वाटतं यांचा लंपटपणा हर्षवर्धनचं आयुष्य सुधारण्यासाठी चांगला ठरला. कधीकधी वाईटातून चांगलं घडत म्हणतात तेच असावं हे. परमेश्वरा प्राचीच्या पाठीशी रहा. तिला हिम्मत दे.''

आपल्या डोळ्यातून वहाणारं पाणी हळूच पुसत पायाचा आवाज न होऊ देता कामीनी बाई खोलीबाहेर पडल्या.

***

फोनच्या रिंगमुळे प्राचीला जाग आली.फोन रावांचा होता.

" हॅलो,बोल ग!"
" प्राची बिझी आहेस का?" " नाही.बोल नं."
"हर्षवर्धन कसा आहे?"
"छान आहे.त्याचा आत्मविश्वास कमी झालाय.तो वाढवावा लागेल."
" तो कमी होणारच.आधी भय्यासाहेबांनी कमी केला नंतर ड्रग्स ने कमी केला.पण तू टेन्शन घेऊ नकोस."
"नाही मी टेन्शन घेत नाही. आपल्याला खूप विचार पूर्वक, त्याच्या कलाकलाने त्याच्यातला आत्मविश्वास वाढवावा लागणार आहे." " हो खरंय.विचार करू यावर."
" तुझं काम कसं सुरू आहे? " " चालू आहे. तुला कधी वेळ होईल तसं सांग आपण हर्षवर्धनचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करू शकतो यावर बोलू." " हो नक्की. तुझी गरज लागणार आहे." " मॅडम मी सदैव तुमच्या बरोबर आहे." राधा हसत म्हणाली." माहिती आहे मला.तुझ्या भरवशावरच मी हर्षवर्धनच्या बाबतीत एवढी उंच उडी घेतली.मी तुला कळवते." " ओके.बाय."
" बाय." दोघींनी फोन ठेवला.

***
प्राची अजूनही आपल्याच विचारात होती.तेवढ्यात तिला चाहूल लागली म्हणून तिने बघीतलं तर हर्षवर्धन परत जायला निघालेला दिसला.त्याला बघून प्राची म्हणाली, " हर्षवर्धन काय झालं?" " काही नाही.मी…" अडखळत हर्षवर्धन अर्धवट बोलून थांबला.
" काय काम होतं?" " काम…नाही मी काही तरी तुला सांगणार होतो."
" अरे! मग न सांगता का चाललास? ये बस.सांग"
हर्षवर्धन काहीतरी आपल्याला सांगणार आहे हे प्राची साठी महत्वाचं वाटलं. हर्षवर्धन हळूच पलंगावर बसला. प्राची त्याच्याजवळच बसली.ती टक लावून हर्षवर्धन कडे बघत होती. हर्षवर्धनची चुळबुळ चालली होती.अचानक तो उठून उभा राहिला.
" हर्षवर्धन काय झालं? बोल नं. तू काहीतरी सांगणार होतास नं मला?"
" हो.पण आता नको नंतर सांगेन."
" हर्षवर्धन सांग. मी ऐकतेय.तू बोलल्याशिवाय मला कसं कळेल की तुला काय सांगायचं आहे. न घाबरता बोल. मी तुला रागावणार नाही.बायको आहे तुझी. हं पण तू जर बोलला नाहीस तर मी तुझ्यावर रुसून बसेन. तुझ्याशी बोलणार नाही.चालेल तुला?"
" नको नको रुसू नकोस.सांगतो."

हर्षवर्धन प्राचीकडे एकटक बघू लागला.त्याला खूप काही बोलायच होतं.प्राचीला बरंच काही सांगायच होतं.पण त्याला ते शब्दात बांधता येत नव्हतं.

प्राची हर्षवर्धनचा चेहरा बारकाईने न्याहाळत होती. तिला थोडीफार कल्पना आली होती कारण तिने हर्षवर्धन आणि कामीनी बाईंचं संभाषण ऐकलं होतं. तिला हर्षवर्धनच्या तोंडून त्याच्या मनातील तिच्याबद्दलच्या भावना ऐकायच्या होत्या.प्राचीची उत्सुकता शिगेला पोचली.

हर्षवर्धन काय सांगेल हे तिचे कान ऐकण्यास उद्युक्त झाले.
हर्षवर्धन अजूनही प्राचीकडेच बघत होता

__________________________________
क्रमशः हर्षवर्धनला काय सांगायचं असेल प्राचीनता.बघू पुढील भागात.
मीनाक्षी वैद्य.