तुझाच मी अन माझीच तू..

(489)
  • 474.7k
  • 60
  • 256.4k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर पाहिले आणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला, "आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?" "टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.." "ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला..

New Episodes : : Every Tuesday & Friday

1

तुझाच मी अन माझीच तू...भाग १

तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर पाहिले आणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला, "आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?" "टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.." "ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला.. ...Read More

2

तुझाच मी अन माझीच तू...भाग २

तुझाच मी अन माझीच तू...भाग २ "हाहा.. किती आखडू ना.. मी बघणारच आहे, माझ्या चार्म पासून वाचशील... यु रियली थिंक की तू माझ्यापासून फार काळ लांब राहू शकशील? मी सारखा तुझ्या तोंडासमोर असणारे सो बचके राहो आभा.. आणि ऑल द बेस्ट!!" राजस ने शेक हॅंड करायला हात पुढे केला पण आभा फक्त नाटकी हसली.. तिने आपला हात शेक हॅंड करायला पुढे नाही केला.. पण राजस आपल्या समोर बसणार ही गोष्ट तिला इतकी आवडली होती.. आभा मनोमन खुश झाली..ते चेहऱ्यावर दिसणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली होती. आणि ती डेस्क वर बसली..हात हलवून बाय ची खुण राजस ला ...Read More

3

तुझाच मी अन माझीच तू...भाग ३

तुझाच मी अन माझीच तू...भाग ३ दोघी गप्पा गोष्टी करत डबा खात होत्या. पाच दहा मिनिटे झाली राजस दोघींसमोर हजर झाला... त्याला बघून नेहा तर आनंदी झालीच पण आभा ला सुद्धा छान वाटले.. आपण सकाळी जरा जास्ती बोलून गेलो ह्या जाणीवेने राजस ने आभा शी बोलणे टाळले.. त्याने तिच्याकडे पाहिलं पण नाही.. पण नेहा ने मात्र त्याच्याशी बोलायला चालू केलं, "राजस? येणार नव्हतास ना लगेच?" "ठेवलीस ना ग मला भेंडीची भाजी? भेंडी च्या भाजीच नाव ऐकलं आणि मला पुढच्या क्षणी उत्तर मिळाला..मग पटापट काम आवरून आलो लगेच डबा खायला.. पोटात कावले ओरडत होते.." राजस ने हसत ...Read More

4

तुझाच मी अन माझीच तू...भाग ४

तुझाच मी अन माझीच तू...भाग ४ राजस चा आवाज बदलला होता.. त्याच हे वागण एकदम अनपेक्षित होते नेहा त्याच्याकडे पाहत चेहरा वेडा वाकडा करत होती... ती राजस ला नीट ओळखत होती आणि त्याच्या तोंडून सॉरी येणे किती अवघड आहे ह्याची जाणीव तिला होती... तिचं लक्ष आता पूर्णपणे आभाकडे होतं. तिला राजस ला काय उत्तर देते ही तिला पहायचं होत..तिची उत्सुकता शिगेला पोचली होती..आणि खर तर नेहा हे सगळ खूप एन्जॉय करत होती. खूप रेअर अशी गोष्ट आज झाली होती.. सो नेहा ला मजा येत होती.. राजस चे बोलून झालं आणि राजस ने स्टॅच्यु ऑफ केला... आभा रीलाक्स झाली.. ...Read More

5

तुझाच मी अन माझीच तू...भाग ५

तुझाच मी अन माझीच तू...भाग ५ रायन फार काही चांगला नाही हे आभा ला जाणवले होते आणि रायन शी बोलतांना आभा चा आवाज मध्ये थोडा चढला होता तेव्हा राजस चे तिच्याकडे लक्ष गेले होते... आणि तो आभा रायन ला काय प्रतिसाद देते हे पाहत होता. आभा ने रायन ला भिक घातली नाही हे पाहून राजस ला हसूच आलं. रायन तसा ऑफिस मध्ये फेमस होता तो त्याच्या अॅऱोगंट आणि केअरलेस वागण्यामुळे.. पण राजस ला तो कसा आहे हे सुद्धा चांगले माहिती होते... त्याने आभा ला वॉर्न करायचा विचार सुद्धा केला होता पण त्याने तो विचार झटकला.. काही सांगायला गेलो ...Read More

6

तुझाच मी अन माझीच तू...भाग ६

तुझाच मी अन माझीच तू...भाग ६ राजस ला हसू आले.. आणि तो आभा ला उत्तर तर देणार "आहेच मग मी भारी...मी फक्त स्वतःला भारी समजू नकोस!! ऐक, बदल हा गरजेचा असतो... सो बदल तुझा हा स्वभाव... नाहीतर तुलाच त्रास होईल.. मी बघ... सकाळी हार्ट ब्रोकन होतो पण आता आहे की नाही नॉर्मल? आयुष्य मस्त असत.. ते मस्तच जगायचं... जास्ती त्रास नाही करून घ्यायचा.." राजस ने नकळत आभा चा हात हातात घेतला आणि तो बोलला.. आभा ह्यावेळी चिडली नव्हती पण तिने हळूच राजस चा हात बाजूला केला. "ओके... करते ट्राय.. आणि आता तू झालास मिस्टर फिलोसोफर.. माझ्यापेक्षा ...Read More

7

तुझाच मी अन माझीच तू...भाग ७

तुझाच मी अन माझीच तू...भाग ७ आभा ला रायन बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. पण राजस लगेच बोलणार नव्हता. "सांगतो ते ऐक ग... उगाच स्वतःला जास्ती भारी समजून वागू नकोस!! मी तुला सकाळीच सांगणार होतो की स्टे अवे फ्रोम रायन...आणि आत्ता पण सांगतो, जास्ती नादी लागू नकोस त्याच्या.. हे ऐक ग.. " "पण का?" "आज पहिला दिवस आहे तुझा.. कर की एन्जॉय!! इथे मस्त काम एन्जॉय कर.. बाकी कश्याच्या फंदात पडू नकोस!!" "ठीके.. मी इथे नवीन आहे सो ऐकते तुझ.. चलो.. माझ खाऊन झालं.. आता मी जाते.. थोड काम करून विल लिव्ह द ऑफिस.." ...Read More

8

तुझाच मी अन माझीच तू...भाग ८

तुझाच मी अन माझीच तू...भाग ८ आभा ऑफिस मधून निघून गेली.. आभा जेव्हा राजस च्या डेस्क जवळून तेव्हा आभा जातांना त्याला आभा च्या जाण्याची जाणीव झाली होती पण तो तिच्याशी बोलला नाही...कारण सारखं सारखं तिच्याशी बोलून आपण किती डेस्परेट आहे हे दाखवायची आणि बोलायची त्याला गरज वाटली नव्हती. अजून दोघांची नीट ओळख सुद्धा झाली नव्हती. पण राजस ला आभा बद्दल जे वाटत होत ते लव्ह अॅट फर्स्ट साईट आहे ह्याची हळुवार जाणीव व्हायला लागली होती. आभा ला पाहून त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. पण आभा हे प्रकरण सोप्प नाही ह्याचा त्याला अंदाज आला होता. पण सगळ्यात आधी त्याला ...Read More

9

तुझाच मी अन माझीच तू...भाग ९

तुझाच मी अन माझीच तू...भाग ९ आभा घरी जातांना सुद्धा तिच्या मनात मध्ये मध्ये राजस चा विचार होता.. आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा येत होते.. आभा तिच्या विचारात मग्न झाली होती. आणि ती यांत्रिकपणे तिची स्कुटी चालवत होती.. पण विचारात बुडली असल्यामुळे तिने चुकून सिग्नल सुद्धा मोडला आणि ही गोष्ट तिच्या लक्षात सुद्धा नाही आली पण तिथेच सिग्नल वर पोलीस मामा उभे होते.. आपण इथे असतांना ही मुलगी सिग्नल मोडते ही गोष्ट त्यांना सहन नाही झाली.. त्यांनी जोरात शिट्टी वाजवली... "थांबा थांबा ताई.. सिग्नल मोडून कुठे चाललाय?" ट्राफिक पोलीस मामाने ने जोरात शिट्टी वाजवली आणि ते ...Read More

10

तुझाच मी अन माझीच तू...भाग १०

तुझाच मी अन माझीच तू...भाग १० आभा चे बोलणे ऐकून आईला हसूच आले. आभा तशी लहानपणापासूनच भांडखोर स्वतःच्या मत बद्दल ठाम होती. आभा मध्ये काहीच बदल झालेला नव्हता. आईने आभा ला छोटा फटका मारला, "काय ग भांडत असतेस सारखी... आता काय लहान आहेस का सारखी भांडण करायला?" "आई... यु नो, मी माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आलीये.. कोणाची अरेरावी किंवा गळेपडूपना का सहन करू ग.. तुम्हीच तर बनवलं मला इंडिपेंडन्ट..." चहा चा घोट घेत आभा बोलली.. "हो हो.. माहितीये पण सारखी भांडू नकोस ग आभा.. मैत्री कर लोकांशी... मग तेच मित्र आपल्या बरोबर राहतात जन्मभर.." ...Read More

11

तुझाच मी अन माझीच तू...भाग ११

तुझाच मी अन माझीच तू...भाग ११ तिकडे राजस सुद्धा आभाच्याच विचारात होता. तो पण घरी पोचला आणि पहुडला. त्याने घरी पोचल्या पोचल्या आई ला हाक मारली..."ए आई..आहेस ना? मला प्लीज मस्त कॉफी हवीये!! दे ना..." राजस स्वतःच्या धुंदीत बोलला पण त्याला काही उत्तर मिळाले नाही...आणि त्याला आठवलं आई ने त्यला सांगितलं होत की ती आणि बाबा आत्या कडे जाणार आहेत.. त्याने डोक्याला हात मारून घेतला.. "माझीच मला कॉफी करावी लागणार.. नो!!" राजस जोरात ओरडला.. पण त्याचा आवाज ऐकायला कोणीच नव्हत. त्याचा आरडा ओरडा ऐकून घ्यायला आई घरी नव्हतीच.. त्याने मनात एक शिवी हासडली.. तो एकुलता एक असल्यामुळे ...Read More

12

तुझाच मी अन माझीच तू...भाग १२

तुझाच मी अन माझीच तू...भाग १२ राजस ने अमेय शी बोलून लगेचच फोन बंद केला आणि आवरायला अमेय चिडलाय त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी काहीतरी आयडिया करायचं राजस ने ठरवलं.. आणि त्याने समोरचे कपाट उघडले.. अमेय हा राजस चा खास मित्र.. अमेय राजस शी सगळ काही शेअर करायचा. त्याचे आई बाबा व्हॉलेंटरी रीटायरमेंट घेऊन गावात राहून शांत आयुष्य जगत होते. अमेय एकटाच राहत असल्यामुळे त्यानी स्वतःला कामात बिझी करून घेतले होते. त्याला सुद्धा एका एमएनसी मध्ये जॉब होता.. फक्त काम हे व्यवधान असल्यामुळे याला एकावर एक बरीच प्रमोशन्स मिळाली होती.. राजस त्याचा खास मित्र पण तो पण बिझी ...Read More

13

तुझाच मी अन माझीच तू...भाग १३

तुझाच मी अन माझीच तू...भाग १३ "बर बर...माहितीये तू पण अनोळखी लोकांचीच साईड घेणार!! सगळा मूड खराब आता खा लवकर.. आणि आज माझे पैसे पण तूच दे.." राजस वैतागून बोलला.. "चालेल.. आणि येस.. आता रोजच दिसणार ती आभाsss...मग अजून काय काय बदलणार राजस साहेबात बघू!! " अमेय हसून बोलला... त्याला जाणवलं आभा मुळेच राजस आज असा विचित्र वागला.. आणि अमेय चा राग पळून गेला. यात त्याला याच्या आवडीचे गिफ्ट देखील मिळाले होते. त्यामुळे अमेय ची स्वारी खुश झाली होती... "चालेल म्हणजे काय.. द्यायलाच लावणार तुला पैसे.. काय लावलीये रे तुझी फालतूगिरी अमेय?? मला कोणी नाही बदलू ...Read More

14

तुझाच मी अन माझीच तू...भाग १४

तुझाच मी अन माझीच तू...भाग १४ अमेय आणि राजस च्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता राजस ने ला लग्न कर हा सल्ला दिला खरा पण त्याचा हा सल्ला अमेय ला मात्र पटेना. त्याचे आधी वेढे घेण चालू झालं. "लग्न??..मी लग्न करू? जमणार नाही रे राजस!! आणि सध्या नको म्हणालोय ना.. आत्ता नाही वाटत गरज...तुला मी सुखात राहतोय हे पाहवत नाही का रे?" अमेय बोलला. "तुला वाटत तितक वाईट नसत रे लग्न हे नातं.. प्रेम आणि लग्न हे सगळ्यात सुंदर नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडून तिच्या बरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं... किती थ्रिलिंग!! पण अर्थात, लग्न ...Read More

15

तुझाच मी अन माझीच तू...भाग १५

तुझाच मी अन माझीच तू...भाग १५ अमेय ने हॉटेल बाहेर पडतांना राजस ला चिडवले होतेच पण राजस चिडला नाही हे पाहून अमेय मात्र विचारात पडला होता. अमेय ला राजस कसा आहे हे चांगलेच माहिती होते. पण अमेय ला वाटले होते तसा राजस वागलाच नव्हता. आता राजस काय करणार ह्या बद्दल ची त्याची उत्सुकता ताणली गेली होती. पण राजस एकदम थंडपणे बोलला, "हो रे.. मजा आली आज.." "ह? तू अजिबातच नाही चिडलास राजस... मला वाटल आता माझं काही खर नाही.. आज अचानक इतका बदल कसा झाला रे तुझ्यात?" "करेक्ट.. आज मी खूप चिडलो होतो..मी आधी सारखा ...Read More

16

तुझाच मी अन माझीच तू...भाग १६

तुझाच मी अन माझीच तू...भाग १६ राजस अमेय ला भेटून आल्यापासून एकदमच फ्रेश झाला.. आता तो मोकळा होता आणि पूर्णपणे नाही पण आभाच्या विचारातून बाहेर येण्यास तो यशस्वी होत होता. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि त्याला छान वाटत होते.. त्याने पटापट आवरले आणि तो ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आला.. त्याचे आई बाबा त्याचीच वाट पाहत होते. "काय आहे आज आई?" "सँडविच केलंय.. सॉरी रे.. काल अचानक बाहेर जाव लागल आणि तुला खायला सुद्धा काहीच नव्हता.." "वॉव!! भरपूर चीज घातलं आहेस न.. आणि ठीके ग आई.. तुम्हाला पण तुमच आयुष्य आहेच.. माझ्यासाठी तुम्ही किती अडकणार..." राजस ...Read More

17

तुझाच मी अन माझीच तू...भाग १७

तुझाच मी अन माझीच तू...भाग १७ आभा काही वेळापूर्वीच कँटीन मध्ये आली होती. पण राजस नेहा शी इतका गुंगून गेला होता की त्याला आभा त्याच्या कडे पहातीये हे कळलं सुद्धा नव्हत. पण आभा ला मात्र हळू हळू राजस बद्दल गोष्टी समजायला लागल्या होत्या. राजस फक्त दिसायला नाही तर वागायला सुद्धा तितक्याच आकर्षक आहे हे आभा ला जाणवलं होत. तिला राजस शी ह्या विषयी बोलायचे होते पण अजून एखादी चांगली गोष्ट राजस करतो का ह्या विचाराने तिने राजस शी लगेच बोलणे टाळले होते..म्हणजे तिला राजस ला पूर्ण पणे जाणून घ्यायची इच्छा दिवसेंदिवस वाढत होते. आणि त्यात ती इतक्या पटकन ...Read More

18

तुझाच मी अन माझीच तू...भाग १८

तुझाच मी अन माझीच तू...भाग १८ राजस चे वागणे आभा ला जरा विचित्रच वाटले.. त्याचे कालचे वागणे आजचे वागणे ह्यात जमीन आस्मानाचा फरक होता. तिला कळत नव्हत राजस मध्ये एकदम इतका बदल कसा झाला.. आभा ला राजस ला भेटून काही तास झाले होते पण तरीही त्याचे विचार काही केल्या आभा च्या मनातून जात नव्हते. सगळ्या भावनांचा गोंधळ तिच्या मनात होत होता. राजस ने तिच्या साठी आठवणीने फुलं आणली होतीच पण त्याचबरोबर ही चिट्ठी.. "श्या..काय चालूये हे.." आभा ने मनात विचार केला... ऑफिस ची सुरवात अश्या पद्धतीने होईल ह्याची आभा ला कल्पनाच नव्हती. तिची थोडी चीड चीड सुद्धा झाली.. ...Read More

19

तुझाच मी अन माझीच तू...भाग १९

तुझाच मी अन माझीच तू...भाग १९ राजस ला आभा चे वागणे अजिबात आवडले नव्हते.. त्याने आभा ला होते स्टे अवे फ्रॉम रायन पण त्याकडे दुर्लक्ष करत आभा रायन शी गप्पा मारतांना पाहून राजस चे डोके थोडे फिरलेच होते.. त्याला एक मिनिटे अस्वस्थ सुद्धा वाटले होते.. त्याच्या मनात एक क्षण भीती सुद्धा वाटून गेली होती.. पण त्याने स्वतःला सावरले कारण आभा इतकीही लेची पेची नाही हे राजस ने जाणले होते. अगदीच गरज लागली तर तो तिच्यासाठी असणार होताच पण मुद्दाम आभा शी ह्या विषयावर बोलणे टाळायचे ठरवले...आणि आपले तोंड परत लॅपटॉप मध्ये खुपसले.. आभा सुद्धा काम करत होती.. ...Read More

20

तुझाच मी अन माझीच तू...भाग २०

तुझाच मी अन माझीच तू...भाग २० राजस च्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते. चिट्ठी देऊन आपण चुकीच हे त्याला जाणवले होते. जे होतंय ते होऊन द्यायला हवं होते असे विचार त्याच्या मनात सतत येत होते. कुठून आपण शेण खाल्ले हे राजस ला काही केल्या कळत नव्हते.. पण आता तो झालेली चूक सुधारणार होता.. त्याने लगेच नेहा ला पिंग केले.. ती कामात होती त्यामुळे नेहा ने राजस च मेल पाहिलं नाही.. मग तर राजस चे डोके अजूनच फिरले.. आधी आभा चे वागणे त्याला अजिबात आवडले नव्हते. त्याला आभा बद्दल काही ठरवण्याचा अधिकार तर नव्हताच पण तरी तो आभा ...Read More

21

तुझाच मी अन माझीच तू...भाग २१

तुझाच मी अन माझीच तू...भाग २१ आभा आणि रायन एका कोपऱ्यात बसले आणि गप्पांच्या बरोबर दोघे मोठ अक्षरशः खिदळत होते. त्यांचा आवाज दूर पर्यंत येत होता.. अगदी नेहा ला सुद्धा दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. नेहा ला त्याने फार फरक पडत नव्हताच.. नेहा कोणती कॉफी ट्राय करायची ह्या विचारात मग्न होती.. पण आभा आणि रायन ह्यांच्या मुळे कॅफेटेरिया मधले काही लोकं वैतागले होते आणि त्यांना दोघांना जरा हळू बोला आणि हळू हसा अशी ताकीद सुद्धा दिली होती.. हे पाहून नेहा ला हसूच आले होते.. तिने पटकन मोबाईल काढला आणि राजस ला टेक्स्ट मेसेज केला.. राजस चा सुद्धा ...Read More

22

तुझाच मी अन माझीच तू...भाग २२

तुझाच मी अन माझीच तू...भाग २२ आभा च्या वागण्याने राजस अस्वस्थ होत होता... आणि त्याची खात्री मात्र झाली आभा रायन च्या जवळ जाण्याचे मुख्य कारण तो स्वतः आहे... ही गोष्ट राजस च्या मनाला खात होती. पण आपण आपली चूक कशी सुधारायची हा मुख्य प्रश्न होता. राजस ने इतक सांगून सुद्धा आभा रायन ची बोलयला गेली होती.. म्हणजे ह्यापुढे अजून काहीही घडू शकत अशी भीती राजस ला वाटून गेली. आणि रायन चांगला वागला असल्यामुळे आभा चा राजस वरचा विश्वास थोडा कमी झाला होता.. राजस उगाच लोकांबद्दल काहीही खोट पसरवतो आहे अशी जणू खात्री आभा ला झाली होती.. आता आभा ला ...Read More

23

तुझाच मी अन माझीच तू...भाग २३

तुझाच मी अन माझीच तू...भाग २३ "हसू नकोस ग नेहा.... खर दुखतंय डोकं.." "मग घरी रोज करतोस की नीट काम... एखाद्या दिवशी लवकर गेलास तर कोणी काही बोलणार नाही.." नेहा परत हसून बोलली. "तू जरा शांत बस ग.. मी येतो कॉफी पिऊन.. आणि तू ये १० मिनिटात.. मला फोन करायला लाऊ नकोस आणि माझं डोकं फिरवू नकोस..." "हो ह साहेब... आणि मी काय केलंय.. तू तुझ डोकं फिरवून घेतोस. कोणामुळे आपण डोकं का फिरवून घ्यायचं हे तुझेच शब्द होते... मला लेक्चर द्यायचास.. आणि आता स्वतःच स्वतः चे शब्द विसरलास?" राजस ला एक फटका मारत नेहा ...Read More

24

तुझाच मी अन माझीच तू...भाग २४

तुझाच मी अन माझीच तू...भाग २४ आभा ने जरा विचार केला आणि ती बोलायला लागली, "ओह.. आय तो तुझ्याविषयी बोलतांना भडकलेला असतो.. " "हो ना.. वाटलाच मला.. उगाच मला बदमान करत फिरत असतो.. ठीके मी मान्य करतो मी एकदा चूक केली होती.. पण नंतर मी बदललो.. पण राजस ची माझ्यावरची खुन्नस काही केल्या कमी झाली नाही.." रायन बोलला.. रायन तसा लकी होता.. त्याला राजस ने तयार केलेली वातावरणाचा फायदा कसा करून घ्यायचा हे चांगलेच माहिती होते.. रायन ने मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि रायन थोडा सुधारला सुद्धा होता. त्याच्या आयुष्यात ज्या घटना ...Read More

25

तुझाच मी अन माझीच तू...भाग २५

तुझाच मी अन माझीच तू...भाग २५ आभा विचार करत होती तो रायन चा.. रायन चे स्पष्टपणे बोलण्याने जर जास्तीच इम्प्रेस झाली होती.. इतक्या लगेच आणि इतक्या सहजपणे रायन ने आपली चूक मान्य करत त्यावर सुधारणा करतो आहे हे सुद्धा सांगितले होते. अर्थात, हाच रायनचा स्वभाव आभा च्या मनावर राज्य करायला लागला होता. तिला माहिती होते, एक तर कोणी आपली चूक इतक्या सहज मान्य करत नाही...पण रायन ने आभा समोर आपली चूक मान्य तर केली होतीच पण आपण कोणासाठी तरी बदलायचा प्रयत्न करतो आहोत ही गोष्ट सुद्धा त्याने बोलून दाखवली होती.. ह्यात कोणतीतरी म्हणजे तिच अशी धारणा आभा ने ...Read More

26

तुझाच मी अन माझीच तू...भाग २६

तुझाच मी अन माझीच तू...भाग २६ रायन कधी नव्हे ते एकदम चांगला वागला होता. त्याने नकळत आभा सगळे शेअर सुद्धा केले होते. पण अरायण खर तर असा कधीच नव्हता.. ही मे बी ही आभा ची जादू होती पण स्वतःच्या वागण्यामुळे रायन जरा अस्वस्थ झाला होता. स्वतःचे असे वागणे त्याच्यासाठी सुद्धा सरप्राईजिंग वाटत होते..आपण चुकीचे वागलो असं राहून न राहवून त्याला वाटत होते.. त्यामुळे रायन ची आभा च्या डोळ्यात पहायची हिम्मत होईना.. पण आता आभा काय बोलणार ह्याकडे रायन चे लक्ष लागून राहिले होते. आभा जरा वेळ शांत होती.. ती काहीतरी विचार करतीये हे रायन ला जाणवले होते.. त्यामुळे ...Read More

27

तुझाच मी अन माझीच तू...भाग २७

तुझाच मी अन माझीच तू...भाग २७ आभा ऑफिस मधून गेली होती.. रायनला संध्याकाळी आभा ला भेटायचे होतेच असे काही होणार नव्हते... त्याला काहीच सुचत नव्हते. आभा तर ऑफिस मधून कधी गेली हे सुद्धा ला हातात आलेला चान्स जाताना दिसत होता आणि त्याच डोक अधिकाधिक फिरत होत. त्याला आभा ला अजून जाणून घ्यायचं होत..आता आभा आणि आभा.. सध्या तरी अजून कोणीच मुलगी तिची जागा घेणार नव्हती. "आभा बाय करून गेली आणि मी काही न बोलता तिला जाऊन कसं दिलं? उसलेस ऑफ मी.." रायन स्वतःवर एकदमच चिडला.. पण चिडून काहीच उपयोग नव्हता ही गोष्ट रायन च्या लक्षात आली.. आणि ...Read More

28

तुझाच मी अन माझीच तू...भाग २८

तुझाच मी अन माझीच तू...भाग २८ रायन आणि राजस दोघांना एकमेकांविषयी तशी चीड होतीच आणि दोघांचे संबंध अशी कोणतीही आशा नव्हतीच... राजस ला का कोणास ठाऊक पण रायन बद्दल अजिबात खात्री वाटायची नाही.. हे मे बी भूतकाळात झालेल्या प्रकारामुळे असेल पण आता राजस ला रायन च्या मनात अढी निर्माण झाली होती.. एक प्रकारची खुन्नसच.. त्यामुळे राजस रायन वर लक्ष ठेऊन असायचा... आता राजस ला अंदाज आलाच होता की रायन च्या डोक्यात काहीतरी शिजतंय.. राजस च्या लक्षात आलं रायन जिथून बाहेर आला तिथे कोणालाही जायला परवानगी नसते.. तरी रायन तिथे जाऊन आला. रायन जिथून आला तिथे सगळी कॉंफीडेनशियल माहिती ...Read More

29

तुझाच मी अन माझीच तू...भाग २९

तुझाच मी अन माझीच तू...भाग २९ "ओह रायन... सॉरी.. तुझा फोन असेल असं मला वाटलच नव्हत.. तू फोन कुठून मिळवलास? आणि.. मी जनरल म्हणाले होते भेटू.. सो काहीच न सांगता गेले होते.. आणि तू सुद्धा काही नाही विचारलंस.. पण मला भेटायचं तू खूपच मनावर घेतलेलं दिसतंय.." आभा हसू कंट्रोल करत बोलली.. तिच बोलण ऐकून रायन सुद्धा हसायला लागला, "हो अग..माझ्या लक्षातच नव्हती आली ती गोष्ट.. आणि यु गेस्ड इट राईट.. मला तुला भेटायचं आहेच.. ऑफिस मध्ये मोकळेपणाने बोलता येत नाही ना.." "येस.. पण माझा नंबर कुठून मिळला तुला?" आभा ने प्रश्न केला.. "ते महत्वाचे नाही ...Read More