Tujhach me an majhich tu..6 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग ६

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग ६

तुझाच मी अन माझीच तू...भाग ६

राजस ला हसू आले.. आणि तो आभा ला उत्तर तर देणार होताच...

"आहेच मग मी भारी...मी फक्त स्वतःला भारी समजू नकोस!! ऐक, बदल हा गरजेचा असतो... सो बदल तुझा हा स्वभाव... नाहीतर तुलाच त्रास होईल.. मी बघ... सकाळी हार्ट ब्रोकन होतो पण आता आहे की नाही नॉर्मल? आयुष्य मस्त असत.. ते मस्तच जगायचं... जास्ती त्रास नाही करून घ्यायचा.." राजस ने नकळत आभा चा हात हातात घेतला आणि तो बोलला.. आभा ह्यावेळी चिडली नव्हती पण तिने हळूच राजस चा हात बाजूला केला.

"ओके... करते ट्राय.. आणि आता तू झालास मिस्टर फिलोसोफर.. माझ्यापेक्षा भारी लेक्चर देतोस.. मी झाले थोडी इम्प्रेस!! पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण फ्रेंड्स झालो.. लेट मी बी क्लिअर!" आभा खडूस पणे बोललीच.. त्यावर राजस ने काही उत्तर दिले नाही पण तो नाटकी हसला...

मग दोघे जरा वेळ काहीच बोलले नाहीत. दोघे फक्त कॉफीचा आस्वाद घेण्यात मग्न झाले होते.

"कॉफी मस्त आहे रे राजस!!"

"येस.. कॅन्टीन मध्ये सगळचं चांगल असत.. काही महिन्यांपूर्वी बराच राडा झाला.. मग शेवटी कॅन्टीन च कंत्राट दुसऱ्याला दिलं.. आणि हा नवीन चांगला आहे.."

"ओह.." कॉफीचा घोट घेत आभा बोलली.. "लेट मी गेस.. तू पुढाकार घेतलास असशील ना?" आभा ने राजस ला प्रश्न केला... आणि तिच्या प्रश्नाने राजस विचारात पडला..

"ह.. तुला कसं कळलं? मी तर काही सुद्धा बोललो नव्हतो ह्या विषयी.." राजस ने उत्सुकतेने आभा ला प्रश्न केला.. त्याचं बोलण ऐकून आभा हसली...

"आय टोल्ड यु.. मी लोकं वाचायचा प्रयत्न करते.. मी इथे आल्यापासून ६-७ तास झाले.. बऱ्याच लोकांशी बोलण झालं पण तुझ्या सारख कॉन्फिडेंट कोणी नाही वाटला... तू ज्या प्रकारे ऑफिस मध्ये वावरतोस त्याचं सुद्धा निरीक्षण केलं मी.."

"ओह हो.. पण तू कधी म्हणलीस की तू माणस वाचतेस... तू माणस वाचत असशील तर माझ्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते ह.... आय हॅव्ह मेनी डार्क सिक्रेट्स... नेहा ला सुद्धा मी कळायला किती दिवस जावे लागले होते.. आणि तिला अजून काहीच सिक्रेट्स माहिती आहत माझी.. पण तू तर भलतीच स्मार्ट निघालीस."

"मग.. वो तो मै हु.. आणि डार्क सिक्रेट्स... ओह माय गॉड.. बट डोंट वरी! इतक्या खोलात नाही जाणार.. यु हॅव्ह युअर प्रायवेट लाईफ.. आणि मी कोणाच्या खाजगी आयुष्यात जास्ती शिरत नाही.. सो यु आर सेफ!!" आभा हे बोलून आभा दिलखुलास हसली...

"थँक्यू.. पण तू काय आत्मविश्वासाने बोललीस की तू माणस वाचतेस.. तेव्हा एक क्षण मी पुरता गोंधळून गेलो..म्हणजे गोंधळून पेक्षा घाबरून गेलो जास्ती बरोबर आहे.. " राजस आभा बरोबर हसण्यात सामील झाला..

"तुही कंपनी तसही छान आहे... म्हणजे यु आर नॉट अॅट ऑल बोरिंग!!"

"ह.. बाय द वे, २ मिनटे.. यु वॉँट समथिंग टू इट?"

"अ.." आभा विचार करायला लागली.

"काय छान मिळत इथे?"

"ह.. तसं इथे सगळाच छान मिळत.. ट्राय नॉन व्हेज बर्गर..तो भारी असतो.. यम! मी आणतोय माझ्यासाठी.. तुला पण आणतो.. आणि आज तुझा पहिला दिवस.. माझी तुला वेलकम पार्टी समज.." राजस उत्साहाने बोलला पण त्याचे बोलणे ऐकून आभा ने मानेने नकार दिला..

"नो.. मी नाही खात नॉन व्हेज.."

"ओह.. तू नॉन व्हेज खात नाहीस??" राजस ने आश्यार्याने आभा ला प्रश्न केला..

"नो.. आय अॅम व्हेजीटेरीअन.."

"चालेल मग.. २ वडा पाव आणतो.. " राजस ने लगेच त्याच्या खाण्याच्या प्लान मध्ये बदल केला..

"तू खा की नॉन व्हेज बर्गर.. प्रत्येक जण स्वतंत्र असतो.. "

"नो.. आज मला पण वडा पाव चा मूड आलाय.. " इतक बोलून राजस धावत काउन्टर पाशी गेला. फूड काउन्टर थोड लांब असल्या कारणामुळे त्याला आभा दिसत नव्हती.. तो हसला.. आणि काउन्टर वर ऑर्डर द्यायला लागला..

"भय्या.. २ वडा पाव.. गरम दो.." २ वडा पाव ची ऑर्डर दिली..

"५ मिनिट रुको.."

"ठीक हे.. जल्दी बनाओ.." आणि तिथे शिट्टी मारत इकडे तिकडे पाहायला लागला..

आभा सुद्धा टेबल वर बसून काहीतरी गुणगुणत होती.. तितक्यात समोरून रायन अचानक आभा समोर आला.. आणि डायरेक्ट आभाच्या शेजारच्या खुर्चीवर बसला..

"हेलो स्वीट्स.. ओह सॉरी!! आभा.. तुला आवडत नाही ना सेक्सी, स्वीट्स म्हणलेलं?" आभा च्या खांद्यावर हात ठेवत रायन बोलला.. आभा त्याचं बोलण ऐकून वैतागलीच...

"बरोबर...थँक्यू.."

"मी इथे बसू ना?"

"नो अक्चूअली.. इथे राजस बसलाय. तो येतोय...समोरून.."

"ओह..राजस!! तो माझा चांगला मित्र आहे.. आणि पार्टनर इन क्राईम.." रायन हसत बोलला.. तितक्यात वडा पाव आणि तो आभा कडे यायला लागला.. त्याने रायन ला आभा शी बोलतांना पाहिलं आणि तो धावतच आभा पाशी आला..

"आभा हे घे.. गरम गरम वडा पाव!!" रायन कडे दुर्लक्ष करत राजस बोलला..

"अरे.. राजस तू कशाला घेतलास त्रास.. आभा.. मला सांगितलं असतस तर मी सुद्धा आणून दिला असता तुला वडा पाव...आणि राजस.. एकट्याने नाही करायची फक्त मजा... " आता मात्र राजस भडकला होता.. तो रायन ला खडे बोल सुनावणार होता पण आभा च बोलायला लागली..

"येस येस रायन.. पुढच्यावेळी तुलाच सांगेन.. पण आता प्लीज वडा थंड होण्या आधी खाऊ का आम्ही?" आभा च बोलण ऐकून राजस खुश झाला.. त्याने रायन ला खुणेने तिथून जायला सांगितलं.. आणि तितक्यात रायन चे मित्र सुद्धा समोरून यायला लागले.. सो रायन ला तिथे थांबता येणार नव्हते.

रायन गेला आणि आभा ने कपाळवर हात मारून घेतला.. आणि तिने वडा पाव चा एक घास तोंडात घातला..मग ती बोलायला लागली, "मस्त आहे रे राजस वडा पाव.. टेस्टी!"

"येस.. " राजस ने सुद्धा वडा पाव चा घास घेतला.. आणि २ मिनिटे दोघे काहीच बोलले नाहीत.. पण राजस मात्र आभा कडेच पाहत होता.. ती काहीतरी विचार करती आहे हे राजस ला जाणवलं.. आणि ती काहीतरी रीयॅक्षन देणार हे सुद्धा राजस ला माहिती होता.. आणि त्याच्या अंदाजाप्रमाणे आभा बोलायला लागली..

"अशी पण लोकं आहेत आपल्या ऑफिस मध्ये..?? अश्या लोकांचा मला फार राग येतो.. उगाच जास्ती जवळीक करायचा प्रयत्न नाही करायचा..मला नाही आवडत अशी लोकं.. किप सेफ डीस्टंस... आज पहिलाच दिवस आहे सो फार काही नाही बोलले मी.. पण पुढच्या वेळी सोडणार नाही.. " आभा तावातावाने बोलत होती.. तिच बोलण ऐकून राजस थोडा ओशाळला...

"सॉरी.. मी पण असाच वागलो होतो ना.." राजस जीभ चावून बोलला..."पण तू खरच मस्त आहेस.. तुला पाहिलं की तुझ्याशी लगेच बोलावस वाटतं.. तुझे डोळे तर इतके बोलके आहेत.."

"तुझ ठीके.. पण मी सुद्धा स्पष्ट पणे तुला सांगितलं मग तू तुझ वागण तर बदललं ना... आणि तू समहाऊ इरीटेट नाही करत.. रायन तर मला फार इरिटेटिंग वाटला... बट आय कॅन हॅँडल धिस टाईप ऑफ पिपल.."

"हो हो... सकाळ पासून आपल्यात किती काय काय झालं आणि मी माझी चूक सुधारली ना.. आणि डोंट टेक रायन सो कॅजूअली.. तो बडे बाप का बेटा आहे.. त्याला खर तर काही गरज नाही इथे काम करायची पण तो टाईमपास म्हणून येतो.. आणि शिक्षण वाया जाऊ नये म्हणून... आणि तो मुलींकडे टाईमपास म्हणूनच पाहतो..आणि जास्ती नादी नको लागुस रायन च्या.. "

"ओह आय सी.. जास्ती नादी नको लागू काय? मी काय घाबरून काहीही ऐकून घेणाऱ्यातली नाही.."

"सांगतो ते ऐक ग... उगाच स्वतःला जास्ती भारी समजून वागू नकोस!! मी तुला सकाळीच सांगणार होतो की स्टे अवे फ्रोम रायन..."

"ओह.. काही सिरिअस त्रास दिलाय का कोणाला?" आभा ने उत्सुकतेने प्रश्न केला..

क्रमशः