Tujhach me an majhich tu..29 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग २९

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग २९

तुझाच मी अन माझीच तू...भाग २९

"ओह रायन... सॉरी.. तुझा फोन असेल असं मला वाटलच नव्हत.. तू माझा फोन कुठून मिळवलास? आणि.. मी जनरल म्हणाले होते भेटू.. सो काहीच न सांगता गेले होते.. आणि तू सुद्धा काही नाही विचारलंस.. पण मला भेटायचं तू खूपच मनावर घेतलेलं दिसतंय.." आभा हसू कंट्रोल करत बोलली.. तिच बोलण ऐकून रायन सुद्धा हसायला लागला,

"हो अग..माझ्या लक्षातच नव्हती आली ती गोष्ट.. आणि यु गेस्ड इट राईट.. मला तुला भेटायचं आहेच.. ऑफिस मध्ये मोकळेपणाने बोलता येत नाही ना.."

"येस.. पण माझा नंबर कुठून मिळला तुला?" आभा ने प्रश्न केला..

"ते महत्वाचे नाही आत्ता आभा... माझ्याकडे तुझा नंबर आहे... आणि आपण एकमेकांशी बोलतो आहोत.. तू जर ccd कोणत आणि किती वाजता सांगितलं तर आपण आज भेटू सुद्धा.." रायन हसत बोलला..

"येस येस.. भेटू.. तुझी इतकी एफीशियंसी पाहून मी तर जाम इम्प्रेस झालीये.. आपण ७ च्या सुमारास भेटू.."

"ग्रेट... पण कोणत ccd? आता तरी सांग.. नाहीतर मला पुण्यात सगळ्या ccd मध्ये फिरायला लावशील.." रायन हसत बोलला..

"गुड आयडिया खर तर.. तू शोध मला.. माझा नंबर शोधलास मग ccd कोणत हे शोधण तुला काही अवघड नाही ना रायन?" आभा ने सुद्धा रायन ची खेचली. पण आज तिला एकदम भारी वाटत होत. तिचा मूड नॉटी झाला आणि तिने रायन ला टॉंट मारला..

"नो नो प्लीज आभा... तुझा नंबर शोधूनच दमलो ह... आता अजून नको दमवूस.." रायन घाबरलेल्या आवाजात आभा शी बोलला.. आणि त्याचे बोलणे ऐकून आभा ला आता हसू आवरता येईना..

"ओके ओके..मी तुला जरा वेळात मेसेज करते.."

"काय ग आभा.. सांगून टाक की जागा.."

"सब्र रायन.. सब्र का फल हमेशा मीठ होता हे.." रायन ची खेचत आभा बोलली.. आभा इतकी मोकळी पहिल्या किंवा दुसऱ्या भेटीत व्हायची नाहीच.. पण रायन ने तिच्यावर जादूच जणू केली होती. आभा सुद्धा जे होतंय ते एन्जॉय करायला लागली होती.. तिने ठरवलेल्या काही गोष्टींचा तिला विसर पडत होता.. ती आधी जशी वाहवत गेली होती तसच काहीस आत्ता होत होत. तिला राजस ने सांगितलेल्या सल्ल्याचा सुद्धा विसर पडला होता..

"नो नो प्लीज आभा.. आज नको गंडवू... खरच खूप कष्टानी तुला नंबर मिळवला आहे.. भरपूर पापड लाटावे लागले तुझा नंबर मिळवण्याकरता.. सो आता अजून त्रास नको देऊस.."

"ओके ओके..मी जरा वेळात सांगते नक्की... आणि नाही गंडवत..भेटू नक्की.. मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की माझा नंबर कुठून मिळवलास.."

"चालेल.. पण नक्की ओके?"

"खात्री ठेव रे.. आता जरा माझी कामं करते.. भेटू ७ ला ccd.. जागा कळवते..बाय.."

आभा ने फोन बंद केला आणि रायन विचारात पडला.. "सहजासहजी कशाला हो म्हणत नाही ही आभा.. कोई नही.. वाट पाहायला लावणार ही. ठीके.. बघू वाट!" रायन च्या मनात विचार आला आणि त्याबरोबरच रायन च्या मनात काही प्लान शिजायला लागले सुद्धा होते. आता रायन ला आभा च्या मेसेज ची वाट पाहण्यापेक्षा दुसरा कोणता ही पर्याय रायन ला दिसत नव्हता. सो तो जे होतंय ते फक्त पाहणार होता. तो मोबाईल वर टाईमपास करत होता तितक्यात मेसेज आल्याचा वज आला.. रायन ने लगबगीने बाकीची अॅप्स बंद केली आणि sms कोणाचा आहे ते चेक केलं.. त्याच्या पेशंस ची आज खरी परीक्षा होता. मेसेज आला होता तो बँकेचा.. त्याच्या account मध्ये कोणतेतरी पैसे जमा झाले होते..पैसे बरेच होते. नेहमी रायन बँक मेसेज पाहून खुश व्हायचा पण आज तो वैतागलाच.. "xxx" त्या ने एक शिवी हासडली.. आणि तो मोठ्याने बोलला. "ह्या बँकांना काही काम धंदे नाहीत का.. सारखे कसले मेसेजस करतात.. आत्ता पैश्यांपेक्षा आभा चा मेसेज माझ्यासाठी जास्ती महत्वाचा आहे.. पण अजून कसा नाही केला तिने मेसेज? आय थिंक ती गंडवणार मला.. पण नो.. मी इतके कष्ट करून तिचा नंबर मिळवला, आजचा हा चान्स सोडणार नाही.. तिचा मेसेज आला नाही ५ मिनिटात तर मी तिला फोन करणार परत.." रायन ने मनाशी ही गोष्ट पक्की केली आणि तो हसला.. त्याने मोबाईल समोर ठेवला तेव्हाच परत मेसेज आल्याचा आवाज आला.. अधीर होऊन रायन ने मोबाईल पाहिला आणि त्याचा जीव भांड्यात पडला..

"आला आला फायनली आभा चा मेसेज आला... म्हणजे ती आज भेटणार.." खुश होऊन रायन ने मेसेज उघडला.. आणि तो मेसेज वाचायला लागला. मेसेज मध्ये लिहिलेलं वाचतांना रायन ला थोडा राग यायला लागला होता. मेसेज मध्ये आभा ने लिहिले होते,

"आज जरा बिझी आहे.. आपण परत कधीतरी भेटू... सॉरी पण अर्जेंट काम आलंय.. सो आज भेटायला जमणार नाही.. खरच सॉरी.."

आभा च्या मेसेज मुळे रायन ने ठरवलेले सगळे प्लान्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना त्याला दिसले.. त्याने कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण रायन ला खूप लगेच राग यायचा. त्याने फार विचार न करता आभा ला फोन लावला. ह्यावेळी आभा ने लगेच फोन उचलला,

"काय आभा? नॉट फेयर.. तूच म्हणाली होतीस आज भेटू आणि तूच जमत नाही सांगतेस. चालणार नाही... तुझ्या घरी येऊन तुला घेऊन जाईन.. माझे प्लान कोणी बदलेले मला आवडत नाहीत.. " रायन नेहमीच्या सवयीने आभा शी बोलला आणि चुकून तो घरी येऊन घेऊन जाईन हे सुद्धा बोलला आणि ते ऐकून आभा एकदम भडकली...तिला राजस ने सांगितलेले शब्द आठवले.. पण आभा लेची पेची नव्हतीच... ती कोणाला घाबरून जायची नाहीच... तिच असुद्ध आवज चढला..

"हे रायन..आपण काल भेटलोय.. आणि काहीही काय बोलतोस? काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच तुला सांगितलं न आज जमत नाहीये. आणि धमकी कोणाला देतोस? घरी येऊन घेऊन जाईन अश्या धमक्यांनी मी घाबरणार नाही..तुला आवडत नाही ते तुझ्यापाशी ठेव.." आभा सुद्धा एकदम चिडली आणि ती सुद्धा फडाफडा बोलायला लागली.. आभा अरे ला कारे करतांना कधीच घाबरायची नाही.. आणि रायन ला तर ती नीट ओळखत सुद्धा नव्हती तरी तो काही बोलतोय ही गोष्ट तिला सहनच झाली नाही.. आभा ने रायन ला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं.. हे रायन साठी थोड अनपेक्षित होतं पण आभा च्या बोलण्याने रायन जरा भानावर आला. त्याला आभाच्या गुड बुक्स मधेच राहायचे होते.. सो वेळप्रसंगी तो एक पायरी खाली येणार होता..

"नो नो आभा.. तुला चिडवलं का मी? सॉरी! मी काही प्लान ठरवले होते.. ते पूर्ण होणार नाही ह्या विचाराने जरा चिडचिड झाली.. काही हरकत नाही... तुला जमत असेल तेव्हा सांग... आणि तुझ्या घरी कसा येईन ग.. मला कुठे माहिती आहे तू कुठे राहतेस.. ते मी रागाच्या भरात बोललो.. सॉरी अगेन.." आभा ने शांतपणे रायन चे बोलणे ऐकून घेतले.. रायन ला तिच्या घरचा पत्ता कुठे माहिती होता मग तरीही ती इतकी का चिडली हे आभा ला कळल नाही.. तिला हसू आलं.. पण आभा ने मोठ्याने हसण टाळल होते. ती मनात हसली.. आभा ने जरा वेळ विचार केला.. ती काहीच बोलली नाही.. आभा काहीच बोलत नाही हे पाहून रायन जरा अस्वस्थ झाला.. आणि तो बोलला..

"फोन वर आहेस न आभा?"

क्रमशः..