Tujhach me an majhich tu..-16 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग १६

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग १६

तुझाच मी अन माझीच तू...भाग १६

राजस अमेय ला भेटून आल्यापासून एकदमच फ्रेश झाला.. आता तो मोकळा झाल होता आणि पूर्णपणे नाही पण आभाच्या विचारातून बाहेर येण्यास तो यशस्वी होत होता. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि त्याला छान वाटत होते.. त्याने पटापट आवरले आणि तो ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आला.. त्याचे आई बाबा त्याचीच वाट पाहत होते.

"काय आहे आज आई?"

"सँडविच केलंय.. सॉरी रे.. काल अचानक बाहेर जाव लागल आणि तुला खायला सुद्धा काहीच नव्हता.."

"वॉव!! भरपूर चीज घातलं आहेस न.. आणि ठीके ग आई.. तुम्हाला पण तुमच आयुष्य आहेच.. माझ्यासाठी तुम्ही किती अडकणार..." राजस हसत बोलला... मग त्याचे बाबा बोलायला लागले,

"हो हो राजस.. मला माहिती आहेत तुझ्या खाण्याच्या सवयी.. तुला चीज फार आवडत.. सो भरपूर चीज आहेच!!"

"थँक्यू आईsss...आय लव्ह यु ग मम्मू..."

"आय लव्ह यु टू राजस..." आई डोळे मिचकावत बोलली.. आई आणि मुलाच बोलण पूर्ण झाल आणि मग शेवटी बाबा बोलायला लागले,

"कुठे उंडारून आलास पठ्या काल? काल बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला होता.. " बाबा हसून बोलले

"काय हो बाबा... उंडारतो कुठे मी? ऑफिस आणि घर इतकाच तर आयुष्य आहे माझा.."

"हो हो गम्मत केली रे राजस!!"

"मी काल अमेय बरोबर गेलो होतो... काल तुम्ही दोघे नव्हतात... गेला होतात हिंडायला आणि घरी काही खायला सुद्धा नव्हत.. मग गेलो जेवायला. खर तर बऱ्याच दिवसांनी भेटलो अमेय ला.. छान वाटल..भेटू भेटू म्हणतो पण तो बिझो मी बिझी.."

"ओह गुड.. गुड!! बर झालं ना.. तुझी अमेय शी भेट झाली.. काय म्हणतोय तो? बऱ्याच दिवसात घरी पण नाही आला.. त्याला सांग आठवण काढतोय आम्ही.."

"होय हो... मोठी झाली की शिंग फुटतात ह्या मुलांना.. आधी सारखी मागे मागे करणारी भेटायला सुद्धा येत नाहीत.." आई मधेच तिची मते मंद्यला ती विसरली नाही. आई ने हसून बाबांना दुजोरा दिला.. पण राजस मात्र वैतागला.

"बास करा ना.. मी त्याला घरी बोलावतो मग त्याचा हव तितक झापा.. मला लेक्चर प्लीज नका देऊ...डायरेक्ट बोला.." राजस चे बोलणे ऐकून आईने मानेने बाबांना शांत राहायला सांगितलं.. खर तर राजस इतक्या लघेच वैतागायचा नाही.. पण त्याचं काहीतरी बिनसलं आहे ह्याची जाणीव आईला झाली... काय बिनसलं आहे ते राजस सांगेल ह्याची आईला खात्री होतीच..

"बर बर.. तू जा ऑफिस ला.. आणि कर मजा!! आणि हो, अमेय ला घरी बोलाव..मी त्याच्याशी बोलतो.."

"बर बर मी सांगतो त्याला निरोप...आणि मी आता पळतो.. लेट नको व्हायला ऑफिस ला... आणि येस, सँडविच भारी ग मम्मे! " एक सँडविच उचलत आणि तोंडात कोंबत आपली ऑफिस बॅग गळ्यात अडकवून राजस ने बाहेर धूम ठोकली.. त्याच हे वागण पाहून आई बाबांना हसू आवरता आले नाही...

"साधा घोड्यावर स्वार असतो ना आपला राजस.. सगळ्याची घाई त्याला.. लहानपणापासूनच!!" राजस चे बाबा चेष्टेने बोलले आणि बाबांचं बोलण ऐकून आई पण त्याला दुजोरा द्यायला लागली..

"मग काय तर... माझ्या पोटातून बाहेर यायची पण घाईच झाली होती त्याला.. मुक्त जगायचं असेल तेव्हा सुद्धा... मनाप्रमाणे आयुष्य जगात आला...स्वातंत्र त्याला नेहमीच आवडत!!" आई सुद्धा हसत बोलली..

"हो ना.. आता अशीच एखादी छान त्याला साजेशी कोणीतरी लाईफ पार्टनर मिळाली पाहिजे.."

"येस येस..अगदी माझ्या मनातल बोललात.. मी काढणारे आता लग्नाचा विषय. आत्ता लगेच नाही कारण जरा वैतागलेला वाटला.." अर्थात राजस ह्यावर कसा रियॅक्ट होईल ह्याबद्दल मात्र दोघांना खात्री नव्हती. पण बाबांनी तिच्या मनातल बोलल्यामुळे आई खुश झाली.. दोघांचे राजस च्या लग्न बद्दलचे प्लान्स आखायला लागले. दोघांना हे माहिती होते की राजस त्यांच काहीही ऐकणार नाहीये पण दोघे मनाचे समाधान करून घेत होते. राजस त्याच्या मर्जीने जगात आला होता. त्याच्या निर्णयात कोणाचीच लुडबुड तो खपवून घ्यायचा नाही. आणि आई किंवा बाबांना त्याने आधीच सांगितले होते की त्याच्या निर्णय त्याला घेण्याची मुभा मिळाली पाहिजे. त्याचसाठी विचारांचे स्वातंत्र अतिशय महत्वाचे होते.

राजस ऑफिस मध्ये जाता जाता फुलं घ्यायला थांबला. आणि त्याने २ फुलांचे गुच्छ घेतले.. एक स्वतःसाठी आणि एक आभा साठी...बुके घेऊन तो स्वतःशीच हसला.. "नो घाई.. गो स्लो राजस!! सगळ होणार आपल्या मनासारखच.." स्वतःशीच बोलत राजस ऑफिस च्या दिशेने निघाला. राजस चा मूड आता नॉर्मल झाला होता.. राजस ऑफिस मध्ये पोचला.. त्याने त्याचा डेस्क साफ केला..बॅग साईड ला ठेवली आणि खुर्चीत बसला.. लॅपटॉप ऑन केला..मेल्स चेक केली.आज त्याला बरच काम पूर्ण करायचं होत.. त्याने उसासा टाकला.. आणि कॉफी प्यायचा विचार केला.. त्याने आजूबाजूला नजर फिरवली.. आभा चा डेस्क रिकामाच होता. त्याने समोरच पडलेला एक कागद उचलला आणि त्यावर काहीतरी लिहिले आणि तो शिट्टी वाजवत कोणाला काही समजणार नाही अश्या पद्धतीने आभा च्या टेबले पाशी गेला आणि त्याची चिठी आहे न ते त्याने चेक केले.. चिट्ठी होती... त्याने ती चिट्ठी उचलली आणि त्या जागी आत्ता लिहिलेली वेगळी चिट्ठी ठेवली आणि त्यानी आभा साठी आणलेला गुच्छ सुद्धा आभा च्या डेस्क वर ठेवला... आणि तो तिथुन सटकला.. त्याच्या डेस्कपाशी जातांना त्याला राहवून न रहावून अमेय चे शब्द आठवत होते..आपण त्याच ऐकून योग्य वागलो ह्याची जाणीव होऊन तो खुश झाला..

मग मात्र तो पटकन कॅँटीन मध्ये गेला आणि त्याने गरम गरम कॉफी ची ऑर्डर दिली.. कॉफी येईपर्यंत तो इकडे तिकडे पाहायला लागला. समोरून नेहा आली आणि तिने सुद्धा कॉफी ची ऑर्डर दिली.. मग ती राजस शी बोलायला लागली,

"काय राजस.. काल न बोलताच गेलास.."

"सॉरी ग नेहा... पण कामात बुडून गेलो आणि मग वेध लागले होते घरी जायचे.."

"येस येस.. मी असच म्हणाले रे.."

"आज जेवतांना भेटू. तुझ्याशी जरा बोलायचं आहे.."

"आज नाही जमेगा.. खूप काम आहे अरे.. मी डेस्क वरच खाईन डबा.."

"ओह.. प्रोजेक्ट संपत आलाय.. करा करा काम!!" राजस हसत बोलला.. राजस नेहा शी बोलला तितक्यात दोघांची कॉफी आली.. राजस ने कॉफी चा घोट घेतला आणि त्याने कॅँटीन मध्ये काम करणाऱ्या मुलाला हाक मारली,

"क्या हुवा साब? कॉफी अच्छी नही क्या?" त्या मुलाने प्रश्न केला..

"नही नही... डरो मत.. कॉफी बढीया बनी हे.. ये ही बताना ना.. इतना डरो मत.. अगर कोई भी परेशानी हो तो बिनदिक्कत बतावो मुझे..."

"ठीक हे साब!!" इतक बोलून तो मुलगा तिथून जायला लागला पण राजस ने त्याला परत हाक मारली आणि थांबायला सांगितलं.

"और कुछ् चाहिये साब?"

"ह..." राजस इतक बोलला आणि त्याने त्याने त्याच्या पाकिटातून पैसे काढले.. "ये लो तुम्हारी बक्षिस..खुदके पास रखो.. काऊंटर पे मत डालो.." राजस ने हसून त्या मुलाला उत्तर दिले. आणि हातात थोडे पैसे ठेवले.. राजस च्या वागण्यामुळे तो मुलगा सुद्धा खुश झाला. तो राजस कडे पाहून हसला आणि धावत काऊंटर पाशी गेला.. आणि पैसे मोजून घेतले.. मग तर तो मुलगा अजूनच खुश झाला.

राजस काय करतोय ह्याकडे नेहा चे लक्ष होते.. नेहा राजस कडेच पाहत होती.. तिला राजस आता काय करणार हे पाहण्याची उत्सुकता होती. राजस जे वागला ते पाहून नेहा ला खूप छान वाटल. तिने त्याला एक फ्लाइंग किस दिली आणि ती बोलायला लागली,

"कसं जमत रे राजस तुला.. तो मुलगा किती खुश झाला पाहिलं का?"

"खूप काही भारी नाही करत ग.... किती कष्ट करतात बघ ही मुलं.. फुकट नाही मागत नाहीत.. मग थोडी मदत केली तर कुठे बिघडलं ना.. आपल्याकडे आहे मग ते थोड वाटलं पाहिजेच ना.. फक्त स्वतःपुरत ठेऊन काय उपयोग?" राजस हसला. आणि कॉफी पिण्यात मग्न झाला.. आभा मगाशीच कॅँटीन मध्ये आली होती आणि राजस ला ह्या गोष्टीचा पत्ता सुद्धा नव्हता. आभा राजस च निरीक्षण करत होती आणि राजस ला पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले..

क्रमशः