Tujhach me an majhich tu..2 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग २

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग २

तुझाच मी अन माझीच तू...भाग २

"हाहा.. किती आखडू ना.. मी बघणारच आहे, माझ्या चार्म पासून वाचशील... आणि यु रियली थिंक की तू माझ्यापासून फार काळ लांब राहू शकशील? मी सारखा तुझ्या तोंडासमोर असणारे सो बचके राहो आभा.. आणि ऑल द बेस्ट!!" राजस ने शेक हॅंड करायला हात पुढे केला पण आभा फक्त नाटकी हसली.. तिने आपला हात शेक हॅंड करायला पुढे नाही केला.. पण राजस आपल्या समोर बसणार ही गोष्ट तिला इतकी आवडली होती.. आभा मनोमन खुश झाली..ते चेहऱ्यावर दिसणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली होती. आणि ती डेस्क वर बसली..हात हलवून बाय ची खुण राजस ला केली. राजस समोरून गेला आणि तिने आपली पर्स उघडली... त्यातून बरंच सामान बाहेर काढलं आणि ते डेस्क वर नीट अरेंज करून ठेवायला लागली.. राजस त्याच्या डेस्क वर गेला होता पण त्याच लक्ष मात्र आभाकडेच होते. तो मनोमन काहीतरी विचार करतोय हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.. पण आभा चे मात्र त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते.. ती मग्न होऊन काम करत होती.. राजस हसला...आणि त्याने काम चालू करायला लॅपटॉप चालू केला.. पण त्याचे लक्ष कामात अजिबात लागत नव्हते.. आज त्याचे कामात किती लक्ष लागणारे ह्याबद्दल त्याला शंका होती.. आभा खूपच सुंदर दिसत होती आणि त्याची नजर तिच्यावरून हलत नव्हती..

"आता काही खर नाही राजस साहेब.. पण लागा आता कामाला... चांगल अप्रेझल मिळाल नाही तर प्रमोशन विसरव लागेल.." राजस स्वतःशी बोलला आणि त्याने लॅपटॉप चा अँगल थोडा बदलला.. आता आभा याच्या डोळ्यासमोर नव्हती ह्याची त्याने खात्री केली आणि लॅपटॉप मध तोंड खुपसलं..आणि मग्न होऊन काम करायला लागला.... पण त्याचा इगो मात्र दुखावला गेला होता...

आभा शी अजून एक दोन लोकं बोलली.. पण यापैकी कोणीच राजस सारखं हेल्पिंग आणि इंटरेस्टिंग तिला वाटलं नव्हत. तिने लॅपटॉप उघडला.. आणि ती काम पाहायला लागली.. पण तिला काहीच सुधरेना.. आता काय करावं ह्याच विचारात तिला सगळा वेळ निघून गेला. आज पहिलाच दिवस असल्यामुळे कामाच काहीच बर्डन तिच्यावर नव्हत.. अजून ती सगळ शिकून घेणार होती मग तिचं काम चालू होणार होतं. आभा ने कोणाला विचारणे टाळले होते.. तिने राजस कडे एकदा पाहिले तो कामात मग्न होता. त्याचं कुठेही लक्ष नव्हत. सो तिने त्याला डिस्टर्ब करायचं टाळल. तितक्यात तिने मोबाईल पाहिला. तिच्या आई चा फोन येऊन ग्ला होता. तिने सकाळ पासून मोबाईल कडे ढुंकून देखील पाहिले नव्हते. तिला तिच्या मोबाईल चा जणू विसरच पडला होता... पण तिला एकदम भूकेची जाणीव झाली.. किती वाजलेत हे पाहण्यासाठी तिने मोबाईल बाहेर काढला.. आणि तिला आई चा मिस्ड कॉल दिसला..तिने लगेच आईला फोन केला.

"आई.. सॉरी! सकाळ पासून मोबाईल पाहिलाच नाही... बोल का फोन केलास?"

"नवीन ऑफिस कसा आहे हे विचारायला फोन केला ग..."

"ओह.. मस्त आहे नवीन ऑफिस.. अजून काम चालू व्हायचं आहे.. आई नंतर बोलू का.. भूक लागलीये.. जेवते!!"

"ओके.. जेव मस्त! तुझी आवडती भरली वांगी ची भाजी केलीये.."

"ओह.. थँक्यू आई.. मी करते तुला नंतर कॉल.."

तिने फोन बंद केला आणि तिने परत एकदा राजस कडे पाहिलं. लंच ची वेळ झाली तरी राजस काम करत बसला होता.. त्याची ऑफिस मधली कलीग नेहा त्याला जेवायला बोलवायला त्याच्या डेस्क वर आली..

नेहा ने राजस ला हलवले... "चल रे राजस लवकर.. मला जाम भूक लागलीये.." नेहा ने राजस ला हलवलं.. पण राजस लॅपटॉप मधून डोक वर न काढता बोलला,

"थांब ग नेहा.. डोंट डिस्टर्ब!! काम पूर्ण करायचं आहे... आणि नेमकी एक अडचण येतीये... तो फॉल्ट मिळाल्याशिवाय मी नाही उठणारे.. तू जा आणि जेवून घे.."

"बर.. पण काय रे राजस.. मी तुझ्याशिवाय खात नाही माहितीये ना...." थोडी कुरकुरत नेहा बोलली..

"आय अॅम सॉरी नेहा... पण हा इश्यू सोल्व्ह होत नाही तोपर्यंत मला अनइझी होत राहील... यु नो न...एक दिवस कर अॅडजस्ट नेहा!! आणि आय थिंक, इश्यू सोल्व्ह होईल लवकरात लवकर... मग मी येतोच आहे.. मला पण भूक लागलीये.."

"ओके..होईल लवकर तुझा इश्यू सोल्व्ह..मग ये लगेच!! मी आहेच.. मी जाते कारण मला जाम भूक लागलीये... पण तू ये लवकर.. तुझ्या आवडीची भेंडी भाजी आहे आज.."

"वॉव.. येतो मी पण थोडा वेळ दे... भेंडी ची भाजी आहे म्हणजे मला सोल्युशन मिळणारच..आणि तू खाऊन घे फक्त थोडी भाजी ठेव माझ्यासाठी.. आणि विसरलोच बघ, थांब थांब नेहा... समोर आभा आहे तिला दाखव कँटीन कुठे आहे.. तिचा आज पहिला दिवस आहे सो ती जरा गोंधळेल.. तिच्या बरोबर खा डबा..मी आलो असतो पण नेमका अडकलोय.."

"बर.. आभा ला घेऊन जाते.. आणि तुला ठेवते थोडी भाजी...." इतक बोलून नेहा आभा ला बोलवायला समोर च्या डेस्क वर गेली..

"हे आभा.. मी नेहा!! चल तुला जेवायचे असेल ना.. मी दाखवते कँटीन कुठे आहे.." आभा ने तिच्याकडे पाहून स्माईल दिली.. आणि लॅपटॉप बंद केला. पहिल्या दिवशी आभा जरा बावचळली होती आणि ते नेहा ने हेरलं. "आभा, डोंट वरी.. इथे सगळे कुल आहेत... आणि राजस तर एकदमच कुल.. आत्ता तो येत नाहीये.. कारण त्याच काम आहे.."

"हाय नेहा..थँक्यू सो मच!! आज माझा पहिलाच दिवस आहे आणि इथली काही माहिती नाही. मी विचार करत होते कोणाला विचारू.. इथे राजस सोडून कोणाशी ओळख नाही झालीये अजून.."

"ओह राजस शी ओळख झाली सुद्धा.. ग्रेट.. मी आज लेट आले सो.. आणि राजस...तो खूप मस्त आहे.. थँक्यू मला नको म्हणूस ग.. थँक्यू म्हण राजस ला.. रोज आम्ही एकत्र डबा खातो... त्याला बोलवायला गेले तेव्हा तो म्हणाला मी बिझी आहे.. काम करून नंतर येईल पण त्याने तुला कँटीन कुठे आहे हे दाखवायला सांगितले सो आले.."

"ओह... रोज तुम्ही डबा एकत्र खाता?"

"हो हो.. आमची मैत्री झाली लास्ट इयर... आणि मग आम्ही बेस्टी झालो.. १ वर्ष एकत्र काम करतोय आणि आता एकमेकांची सवय झालीये..आम्ही दोघ एकमेकांचा ऑक्सिजन आहोत..आणि तुझ माझ जमेना टाईप्स मैत्री आहे आमची.."

"ओह.." आभा इतक बोलली. पण नेहा चे बोलणे ऐकून आभा कारण नसतांना अस्वस्थ झाली.. आभा आज पहिल्यांदी राजस ला भेटली होती पण तरी ही गोष्ट तिला आवडली नाही..त्याचे कारण तिला उमगेना..आभा एकदमच अस्वस्थ झाली. तिला हे काय होतंय तिला उमगेना.. शेवटी मग तिने मनात विचार केला, 'आभा,तुला काय होतंय आभा..असू दे की नेहा आणि राजस ची खास मैत्री.. तुला काय फरक पडणारे? तू राजस ला आत्ता तर भेटलीस त्याला..इतक काय होतंय तुला?'

आभा ने स्वतःला लेक्चर दिलं आणि मग ती थोडी शांत झाली.. आणि तिने राजस चा विचार सोडून दिला आणि नेहा बरोबर कँटीन मध्ये गेली.. दोघी डबा खायला लागल्या..

"तू काय आणल आहेस आभा डब्यात?"

"मी भरलं वांग आणलय..."

"ओह वॉव!! आय लव्ह इट...भारी दिसती आहे भाजी.. मी टेस्ट करू? सॉरी आभा.. पण मला आणि राजस ला डबा शेअर करून खायची सवय आहे..आज तो नाही आलाय...आणि मिसिंग हिम.."

"ओह नाईस!! येईल राजस त्याचं काम झालं की.. डोंट वरी!! आणि तुला आवडते वांग्याची भाजी मग घे की भाजी..." आभा बोलली आणि तिने डबा नेहा समोर धरला... नेहा हसली आणि तिने भाजीचा एक घास घेतला आणि तिच्या तोंडून वॉव आलं.

"भारी झालय ग भरलं वांग.. तू केलं आहेस?"

"नो नो नेहा.. मला अजून स्वयपाक करता येत नाही.." आभा जीभ चावून बोलली.. "आई मागे लागते शिकून घे स्वयपाक पण मला फार आवड नाहीये.."

"ओह हो.. सेम पिंच ग.. मी पण नाही रमत स्वयपाक घरात.. आणि आता सगळी कामं बाहेरून होतात..आउटसोर्स करता येतात मग कशाला ना घालवायची शक्ती?" नेहा बोलली.. आणि दोघी हसायला लागल्या..

क्रमशः..