..आस्तित्व ...!!
.......कस सांगू ग ..तुला ..
काय आहेस ..तू माझ्यासाठी ??
..पहाटेची मनाला सुखवणारी ...
...मंद वार्याची सुगंधी "झुळूक ".....!
..तहानलेल्या ..चातका..साठी ..
..एक थंड पाण्याचा "थेंब".....!
..अर्ध्या रात्री ऐकू ..येणारी ..
..लाटांची घनगंभीर "गाज"..!
...तापलेल्या मातीवर .दरवळणारे
..मृद्गन्धाचे .सुवासिक "अत्तर"!
..हे सारे ,..सारे ..खूपच..अपुरे आहे !!!
...नाही होणार माझ्या मनातल्या .तुझ्या "अस्तित्वाचे "मोजमाप
..तूच कधी डोकावून पाहशील माझ्या मनात .....
..तर तुलाच ..कळेल .."आपोआप "..!!