Marathi Quote in Poem by NehKavya

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तिने जरासे लाजून पाहिले
धडधड उगीच वाढली
केस कानामागे टाकले अन्
माझी शंभरावी विकेट पडली

आता आपलं काही खरं नाही
मन म्हणायला लागलं
जवळ सरकून बसली
अन् तीच पैंजण वाजलं

इरादा मला तिचा काही
साधा दिसत नव्हता
हात तिचा हळू हळू
माझ्या छातीकडे सरकत होता

लाजरी बुजरी माझी बायको
स्वतःहून जवळ आली म्हणून आनंद झाला
हात तिने हळूचं माझ्या खिशात घातला

अन् धडधड माझी परत वाढली
तिने हळूच डोळा मारला
हिच्या लाजण्याच्या नादात
माझा सगळा खिसा रिकामा झाला...

~नेहा जोशी

Marathi Poem by NehKavya : 112009741
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now