एक अबोल नात ❤️ ...
एक अबोल नात
तुझ नी माझं
ओठांवमध्ये दडलेले
डोळ्यांनी फुललेलं ...
एक अबोल नात तुझ नी माझं
पावसात भिजलेल ह्रदयात कोरलेल
कुणालाही न कळता मोगऱ्याच्या
गंधात दरवळलेल ...
एक अबोल नात तुझ नी माझं
निर्मळ झऱ्यावाणी वाहणारं
पण कधी कुणाला न कळणार
विरहाच्या आगीत आयुष्यभर झुरणार ...
एक अबोल नात
तुझ नी माझं
कधी एक न होणार पण
एकमेकांसाठी आयुष्यभर तरसणार ...
अंबिका ...