चहा
घेतले मी पातेले
त्यात गेले पाणी
हळूच उडी मारली त्यात
चहा पावडर व साखरेने
मग आल्याला वाटले
यावी चहाला चव
मग किसून ठेवलेले आले
चहा मध्ये पडले
गॅस केला चालू मग
चहाला आली उकळी
ते बघताच दुधाला आठवण
झाली चहात पडण्याची
मग दुधाने मारली चहात उडी
मग चहाला आली उकळी
मग गाळला गेला चहा कपात
मग कपातून गेला पोटात .
- prajakta kotame