क्षमा
किती सुंदर शब्द आहे ना हा SORRY. ..
sorry म्हणजे काय तर क्षमा आणि क्षमा म्हणजे?
फुलाच्या चुरगळलेल्या पाकळीतून सुद्धा घेतलेला सुगंध म्हणजे क्षमा...
खवळलेल्या समुद्राला शांत करायची ताकद ठेवणारा शब्द म्हणजे क्षमा...
प्रत्येक नात टिकावं म्हणून कुठंतरी बांधून ठेवलेली गाठ म्हणजे क्षमा...
आता सर्व संपलं म्हणून पाठ फिरवल्यावर सुद्धा माग वळून घट्ट मिठी मारायची हिम्मत म्हणजे क्षमा...
चुकलेल्याला सुधारण्याची संधी म्हणजे क्षमा...
नात्यातील तुटणाऱ्या विश्वासाला अलगद सावरणारा विश्वास म्हणजे क्षमा...
रडणाऱ्याच्या चेहऱ्यावरील अश्रू,चिडणाऱ्याच्या चेहऱ्यावरील राग आणि रुसणाऱ्याच्या मनातील गोष्टी घालवने म्हणजे क्षमा...
हसणाऱ्याच्या चेहऱ्यावरील विश्वास म्हणजे क्षमा...
खरंच...फुलाच्या चुरगळलेल्या पाकळीतून घेतलेला सुगंध म्हणजे क्षमा...
लेखक-प्राजक्ता संतोष दिवेकर