Marathi Quote in Song by Santosh Udmale

Song quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

नजरानजर नजरानजर नजरानजर
नजरानजर नजरानजर नजरानजर

जेव्हा तुझी माझी झाली एक नजर
काळजात वाजला माझ्या प्रेमगजर

पाहुनीया मला बावरली तुझी नजर
पाहुनीया तुला शहारली माझी नजर

जेव्हा नजरेने प्रेम व्याली तुझी नजर
तेव्हा नजरेने प्रेम प्याली माझी नजर

हळुवार प्रणयांत धुंद करी तुझी नजर
त्या प्रणयधुंदीत मदमस्त माझी नजर

प्रश्नार्थक नजरने प्रश्न करी तुझी नजर
लाजत लाजत खाली झुके माझी नजर

माझ्या नजरेच्या आड जाते तुझी नजर
नजर स्पर्शासाठी धजावते माझी नजर

प्रेमाच्या डोहाची अंनंतखोली तुझी नजर
प्रेमात पडायाला व्याकुळली माझी नजर

शांतप्रशांत अगम्य कातरवेळ तुझी नजर
कातरवेळी पहुडेल निरागसी माझी नजर

जेव्हा तुझी माझी झाली एक नजर
काळजात वाजला माझ्या प्रेमगजर

नजरानजर नजरानजर नजरानजर
नजरानजर नजरानजर नजरानजर

Marathi Song by Santosh Udmale : 111914184
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now