माणूस झाला मोहाचा दास,
आस त्याला देहाची खास,
रोग असे कधी कारण दु:खाचे ,
देह सुदृढ जरी दुःख वेगळे तयाचे ,
रोग असे शरीराला, सावली जशी साथीला, आले गेले अनेक, चालु येरझार ,
माहित असे जरी येणारा प्रत्येक जाणार, वियोगाचे दु:ख अपार,
भोग कुणाचे न कुणी दिले न कुणी घेतले,
जे केले ते सुखासाठी, मिळवले अधिकार संपत्ती, संतती साठी सगळे केले,
भले केले ज्यांचे ते गेले विसरून,
स्वार्थी जग हे राहावे समजून,
मान सन्मान, संतती, संपत्ती न नेई समाधानाप्रति,
ज्याने घेतले नाम व भक्तित रमला परमात्मा तारेल त्याला ,
सतत जपा राम नामाला.
-गिरीश.