स्वतः ला शोधताना
स्वतःला शोधताना करू आत्मपरीक्षण
आपल्यातल्या गुण दोषांचे करू जरा निरीक्षण
आपल्यातल्या गुणांचा करू पाठपुरावा
दोष असेल तो तो त्वरित दूर करावा
स्वतःतील सुप्त कलागुणांना देऊ चालना
स्वतःमधील कौशल्याची करू नित्य जोपासना
स्वतःमधील प्रतिभेचा नको अहंगंड
स्वतःमधील उणिवेचा नको न्यूनगंड
चांगल्या दिवसांमध्ये नसावा व्यर्थ अभिमान
वाईट दिवसांमध्ये न कधी जावी खाली मान
इतरांकडून मिळालेल्या सूचनेचा करू स्वीकार
आत्मविकासा कडे नेई नम्रतेचा अंगीकार
दांभिकपणा नको सदा असावं इमानदार
वागण्यात आपल्या असावा केवळ सदाचार
स्वतःला रोज शोधताना ह्या बाबी बघाव्या नित्य
तरच या दुनियेत ठरेल वागणं आपलं स्तुत्य
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★