एकटीच ती लढत होती
अडचणींचा पहाड चढत होती
नव्हती तिला कधी कोणाचीही साथ
नव्हता दिला कोणी मदतीचा हात
न बघे ती कधी कोणाची वाट
एकटीने झुंजण्याचा घातला तिने घाट
झुंज दिली रणांगणी बांधून पाठीशी बाळ
शत्रूसमोर उभी ठाके बनून महाकाळ
असता यशवंत पाठीशी अपयश मिळणार कुठून
'मेरी झाशी नही दूनगी' म्हणाली ती हटून
झुंज देऊन केली शत्रूला तिने पळता थोडी भुई
इतिहासाच्या सदा स्मरणी राही ती राणी लक्ष्मीबाई
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
वाचकांचा अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा