आम्ही विदर्भ वासी..घरी बालाजी कुल दैवत आहे. आणि लहानपणापासून बालाजी नवरात्राचे 10 दिवस चांगल्या आठवणीत आहेत. 10 दिवस अहोरात्र सुरू राहणारी समई तील वात तयार करणे , देवाचे नवीन वस्त्र शिवून घेणे. घट स्थापना अभिषेक , 10 दिवस धान्य फराळाचं वेगळेपण , रोजचे सकाळचे नैवेद्य ताट, सकाळ संध्याकाळ पूजा आरती.. छान आठवणीत राहणारे दिवस.
आमच्या कडे जी बालाजी आरती आहे ती कोणत्याच पुस्तकात दिसत नाही पण खूप छान आहे. खालील प्रमाणे..
॥ श्री बालाजी आरती ॥
शेषाद्री सिंहासनी , तुम्ही बैसले हो देवा । इंद्रादी सकल देव , करीताती हो सेवा ॥आरत्या उजळोनी, लागताती हो पाया। जयजयकार करीती, गिरी वैकुंठराया ॥ सुन्दरा व्यंकटेशा
अहो राजसा व्यंकटेशा हरा क्लेश स्वामी माझे , सुन्दरा व्यंकटेशा
तांडव नृत्य करीति, गणाधीश आपण । नारद घेऊनी वीणा करी सामगायन। किन्नर वाजे घंटा सप्तसुर साधुन ॥ शारदा घेऊनी टाळ करी अनुवाद ॥ सुंदरा वेंकटेशा.
आणिमा अष्टसिद्धी वारिताती चामर , इन्द्र हा धरुनी छत्र, उभा राहे सामोर गर्जितातीं वेद चारी श्रुतींचाही गजर । अप्सरा नृत्य करीती उभ्या राहोनी सामोर ॥ सुंदरा वेंकटेशा
रुद्र हा भद्र जेथे यम न्याय विचारी, विरंची वाचताहे, पत्र घेवोनिया करी, विडिया करुनी देती, रमा आपुले हो करी , चन्द्रमा सूर्य दोन्ही , द्वारपाळ हो द्वारी ॥ सुंदरा वेंकटेशा
ऐसा हा राजसोहळा , नित्य होतो वैकुंठी , आनंद थोर थोर, देवा न समावे चित्ती , धन्य हा जन्म माझा , देव देखिला दृष्टी , गोविंदतनय - गिरी, धन्य धन्य ही सृष्टी ॥सुंदरा व्यंकटेशा
अहो राजसा, व्यंकटेशा , तुम्ही त्रैलोक्य राजे, रंक मी शरण तुम्हा, हरा क्लेश स्वामी माझे, सुंदरा व्यंकटेशा
🙏🙏🙏