अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा

डॉ. स्वाती अनिल मोरे

दिन हा भाग्याचा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा

दिवस पारतंत्र्याचे
बघितले ज्यांनी
मोल स्वातंत्र्याचे
जाणीले त्यांनी

अनेकांनी देऊनी
प्राणांची आहुती
उभारली ही
स्वातंत्र्याची गुढी

सलाम त्या प्रत्येक
स्वातंत्र्य सैनिकाला
ज्यांनी आयुष्य वाहिले
या लढ्याला..

सार्थकी लागले
त्यांचे बलिदान
आपण अनुभवतोय
स्वतंत्र हिंदुस्थान..

उत्सव तीन रंगाचा
आज देशभर होतोय साजरा

जयघोष हा भारतमातेचा
आसमंती निनादावा
सण हा स्वातंत्र्याचा
चिरायू व्हावा

Marathi Poem by Dr.Swati More : 111825621
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now