शोधले स्वतःला मी
फार दूर गेलो आहे ,
हरवलो मी जीवनात,
मलाच मी भेटलो नाही .
समजून घेतले सगळ्यांना
मला कोणी घेतले नाही,
जवळ घेऊ मला कोणी
आपुलकीने बोलले नाही .
जगता जगता हरलो मी
मला आपले कोणी केले नाही ,
मी कवटाळले मरणाला तरी
माझ्यासाठी कोणी हळहळले नाही .
आपुलकीचे डोंग सारे
पंख पसरूनकोणी माया दिली नाही ,
पडलो उडलो धडपडलो कितीवेळा तरी
मला कुशीत कोणी घेतले नाही .
जरी सूर्य मावळला आशेचा
अंधार झाला नरेशचा तरी
नवी दिशा पाहून नवीन
संधी शोधणे सुहासने सोडले नाही