दोन भिन्न विचार :
वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे बदलणारे माणसाचे हे स्वभाव कधी कधी मनाला खूप यातना देतात,असे वाटते की,हीच का ती प्रेमाची माणसे जी मनात खोलवर रुतून बसलेली आहेत? अशी काय जादू झाली आहे,या आधुनिकतेची कि आपलीच माणसे आपल्यला परकी वाटू लागतात. भावनिकता,निस्वार्थी प्रेम, आपुलकी,माणुसकी यासारख्या रत्नाचा ऱ्हास होत चालला आहे.आज सकाळचीच एक घडली घटना सांगते, बसमधून येताना एका कॉलेज तरुणी आणि एक ६०-६२ वर्षांचे एक वयस्कर गृहस्थ या दोघांच्यात भांडणे जुंपली,त्याचे झाले असे की, ती तरुणी बसमध्ये वर चढताना तिचा पाय त्या गृहस्थांना लागला, आता त्यांच्या मते, तिने चुकले म्हणावे किंवा त्यांना नमस्कार करावा, पण तस तिने काहीही न करता ती एका सीट वर जाऊन बसली,पण इकडे त्या राग आलेल्या गृहस्थांनी मात्र तिला बडबड करायला सुरुवात केली, तिने हि शांत न बसता प्रत्येक शब्दाला शब्द बोलत राहिली. त्यांच्या मनातली घुसमट बाहेर आली आणि ते एकदम बोलले, कि, तुमच्यासारख्या तरुणांमुळेच देश बिघडत चालला आहे, देशाची संस्कृती विस्कटत चालली आहे, तिला वेशीवर टांगून ठेवले आहे तुम्ही लोकांनी,..पण त्या तरुणीने हि त्यांना ऐकवले कि तुमच्यासारखे लोक आडकाठी आणतात. देशाच्या विकासात म्हणून प्रगती होत नाही तुम्हीच बिघडवला देशाला .शेवटी बस मधील इतर लोकांनी दोघांना शांत केले व तिचा बसस्टोप आल्यानंतर ती उतरून गेली,पण हा प्रसंग माझ्या मनाला मात्र स्पर्श करून गेला कि ,हि भांडणे फक्त त्या दोघांची नाही तर आजची पिढी आणि एक टप्पा माघे अशी मागची पिढी.खरंच फारच अंतर पडले आहे या दोन पिढींमध्ये.अश्या दोन पिढीची भांडणे होती ती त्यांच्या विचारांमधील तफावतीची भांडणे होती ती.दोन पिढीच्या परस्परांमधील घुसमटीमुळे आज मानसिकतेचे आजार?