शांत होती पहाट
धुक्याने झाकलेली
कोवळ्या उन्हाने धुक्याची
दवबिंदू झाली
हवेच्या मंद झुळुकेनी
दवे ही नाहीशी झाली
पुन्हा आज एक
निर्मळ सकाळ उगवली..
तुझ्या पापणीच्या झोळीत
स्वप्ने कितीतरी साठलेली
काही अवखळ क्षणांनी
त्यांची माती करू पहिली
म्हणून का सरते सारे वेडी
त्यांनाही मिळू दे झुळुकेची साथ थोडी..
जातील धुके सरूनी
येईल तीच निर्मळ पहाट जुनी..
स्वैर कर मना बघ
पूर्ण होऊ पाहती ती स्वप्ने अजुनी
-Pradnya Narkhede