Marathi Quote in Poem by अनु...

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

मनाच्या वाटेवरती.....

वाटेवरती मनाच्या,
तुझ्याच पाऊलखुणा ।
अंतरंगी या हृदयाच्या,
चांदणे तुझे सरेना ।

सर्वस्व तुला देऊनी,
प्रीत का रे ही विरही??
उचकी माझ्या नावाची,
तुला का लागत नाही??

नको बांधु वचनात,
मनधरणी नको रे ।
शब्दांविना भावना तू,
माझ्या समजुनी घे रे!

पाऊस प्रेमाचा सदा,
मनभावन बरसला ।
चिंब झाले मन माझे,
तू कोरडाच राहिला।

सानिध्यात तुझ्याच रे,
फुलली ही रातराणी।
तुला कळलीच नाही,
या वेदनांची कहाणी।

धुक्यात सारे विरले,
उक्ती अन मोठ्या बाता।
अबोला हा जीवघेणा,
भासतो 'अनु'स आता।

Marathi Poem by अनु... : 111573638
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now