कधी कधी वाटे मनी
सोडून जावे सारे जगी
स्थिर व्हावे असे कुठेतरी
जिथे मिळेल स्वप्नांची नगरी
या स्वप्नांच्या नगरीमध्ये
अंतर्मुख होऊन
ह्या अविरत जगाला
वाटते जावे सोडून
मनामध्ये सारखे माझ्या
येतात आगळेेवेगळे विचार
या जगात टिकायचे असेल तर
बनावे लागेल का लाचार?
नाही राहिले कोणी कोणासाठी
सगळेच करतात स्वार्थी विचार
मग मनातल्या इच्छा - आकांक्षाचा
होतो मनातल्या मनात कुचार
कधी निरर्थक मनाला येतात विचार
राहिली आहे का माणसामध्ये माणुसकी?
का प्रत्येकांस जडली आहे
अक्षम्य अशी आसक्ती ?
-दिपकरिंगे