हे काहीसे असे झाले...
हे रोजचेच आता तुला स्मरणे झाले,
संपून जराजरासे काहीसे उरणे झाले.
अवखळ तुझ्या बेटांची बारात आठवे मला,
नशेत चांद रात्रीच्या काहीसे झुरणे झाले.
नाहीसे केले होते मी भास तुझे हृदयाशी,
जिंकून डाव प्रेमाचा काहीसे हरणे झाले.
वचनांची वर्दळ होई रोज माझ्या मनाशी,
गर्दीत सृजनाच्या काहीसे हसणे झाले.
गातो सुरेल आता गाणे माझ्या मनाचे,
मैफिलीत इष्काच्या काहीसे शहाणे झाले.
रचनाकार-पल्ल्लवी काटेकर