एक शिंपला
लाटेवरती स्वार होऊनी
आला किनार्याला....
एक शिंपला
वाळूत रूतला तिथे थबकला
वाट कुणाची पाहू लागला
एक शिंपला
तिन्हीसांजेला आतुरला
भरतीच्या ओढीने गहिवरला
अचानक तो मला गवसला..
एक शिंपला
तुझेच असणे तुझे थबकणे
गुज मनीचे मला सांगणे
तुझे नि माझे मन्मथ एकच
योग साजिरा जुळूनी आला
एक शिंपला...