Marathi Quote in Shayri by Manish Gode

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#Kavyotsav
ऋणानुबंध

देवा... वावराकड़े जाशील,
तर माझा एक निरोप देशील..?
सांगशील त्या धरणी मातेला,
तुझ्या कृपेने, तुझे हे पोरं...
पोट भरत आहे,
आनंदाने नांदत आहे..!
कृपा आहे तुझी,
कशे फेडू हे ऋण..?
सांगशील त्या अन्नदाते ला,
आमच्यावर तुझी कृपा,
अशीच राहू दे..!
विहिरी, तलाव, नदया,
तुझ्या मायेनी भरू दे..!!
आलेले संकट, आपल्या
सावलित असू दे..!!!
देवा... तू भिऊ नकोस,
खचू ही नकोस..!
कारण तू जर खचलास,
तर सारे जग उपाशी राहील..!!
मातेचं ममत्व,
मुलांसाठी कधीच
कमी पडत नाही..!
मुलांकडून झालेल्या चुका,
आपल्या पदरी घे..!!
पुन्हा एकदा, कृषीक्रांती घडू दे,
पुन्हा एकदा, कोठया गोदमं भरू दे,
या वेळेस, मात्र झालेल्या चुका,
पुन्हा होणार नाही,
याची खंत असू दे..!
देवा... वावराकड़े जाशील,
तर माझा, हाच निरोप देशील,
माझा, हाच निरोप देशील..!!

Marathi Shayri by Manish Gode : 111031539
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now