मेथी डाळ वडी सांबार
☘️हा एक थोडा वेगळा पण चविष्ट प्रकार आहे
☘️साहित्य
बारीक चिरलेली मेथी एक वाटी
एक वाटी शिजवलेली तूर डाळ शक्यतो फार शिजलेली नको
बेसन पाटवड्या
फोडणी साहित्य
अर्धी वाटी डाळीचे पीठ
ठेवलेली मिरची एक मोठी
पंचफोडण.. फोडणीचे साहित्य
एक आमसूल
☘️कृती
प्रथम बेसन पाटवडी करून तयार ठेवावी
पाटवडी तयार झाली की
☘️बारीक चिरलेली मेथी मिरची सोबत पाणी घालून एका भांड्यात झाकण लावुन शिजवून घ्यावी
मेथी शिजली की त्यात शिजलेली डाळ, आमसूल मीठ व हळद घालून ढवळून शिजवावे
पाण्याचे प्रमाण आवश्यक तितके ठेवावे
☘️एक उकळी आली की
दुसऱ्या छोट्या कढईत पंचफोडण, हींग घालून लसणाचे तुकडे लाल तळून घ्यावेत
ही फोडणी उकळी आलेल्या मेथी वर ओतावी
व चांगलें मिसळून घ्यावे
☘️यात तयार पाटवडी घालून
भांडे लगेच खाली उतरवावे
कोथींबीर खोबरे घालून गरम गरम असतानाच खायचा घ्यावें
(पाट वडी घालून उकळू नये
वडी मोडण्याचा संभव असतो)
किंवा हे सांबार खाताना ऐन वेळी वडी वर मेथी डाळ घालून घेतली तरी चालते