🩸खजूर चिंच चटणी
🩸जेवताना किंवा नाष्टा करताना तोंडी लावायला, चाट, पाणीपुरीवर घालायला चिंचेची चटणी लागतेच ही चटणी चविष्ट तर आहेच पण त्याचसोबत ती पौष्टीकही आहे.
🩸साहित्य..
बिया नसलेली चिंच एक वाटी
बिया काढलेला खजूर एक वाटी
एक वाटी गूळ
एक चमचा बडीशेप पावडर
अर्धा चमचा धने पावडर
अर्धा चमचा जिरे पावडर
अर्धा चमचा सुंठ पावडर
एक चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
🩸 कृती..
प्रथम कढईत चिंच, खजूर आणि गूळ टाका.
नंतर त्यात दोन वाट्या पाणी टाका
आणि हे सर्व चांगले मिसळा.
आणि दहा मिनिटे शिजवा
🩸यानंतर बडीशेप पावडर, धने पावडर, जिरेपूड, सुंठ पावडर, लाल तिखट आणि मीठ घालून मिसळा.
🩸पाच मिनिटे परत मंद आचेवर शिजवा
थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमधून सरबरीत वाटून घ्या
🩸आकर्षक रंगाची चटणी तयार होते
यात थोड पाणी घालून पातळ केली असता भेळीसाठी अथवा चाट साठी उपयोगी येते
🩸टीप
.चिंच आणि खजूर सम प्रमाणात असावा
तिखट पावडर लाल असावी
चटणी नेहेमी मध्यम आचेवर शिजवावी