तीचे अस्तित्व !!!
..तसे फार नाही जुने नाते तुझे माझे
गुंतले होते तेव्हापासूनच श्वास तुझे माझे ..
तुला माहीत नव्हते तेव्हा ..आहे मी कोण
फक्त लागली होती मी येणार याची कुणकुण !
मग आग्रह झाला तुला तपासणीचा ..
आणी लागला पत्ता तुला मी मुलगी असल्याचा !!
जणू पायाखालची जमीन सरकली वाटले तुझ्या मनात
काय होईल .तेव्हा जेव्हा कळेल हे सारे जनात !!
मग घ्यावा लागला निर्णय मला संपवून टाकण्याचा
विचार सुध्दा केला नाहीस तेव्हा माझ्या मनाचा ..
अजून आले नाही जगात ..पण आहे ग मी सजीव
माझ्या पण इवल्याशा शरीरात आहे ग धगधगता जीव ..
आई आई ग ..मी तुझी लाडकी कळी
नको ना करू मला तुझ्या पासून वेगळी ...!!!
वृषाली ..गोटखिंडीकर