#उन्हाळा
#
🌱पुदीना पाणी 🌱
🌱मागील आठवड्यात दादर मधील जिप्सी रेस्टॉरंटला जेवायला गेलो होतो
तेव्हा प्यायला दिलेले पाणी थंड तर होतेच आणि पुदिन्याच्या वासाचे व चवीचे होते
पाण्याच्या बाटलीकडे पाहिले तेव्हा लक्षात आले बाटलीत पुदिन्याच्या पानासकट काड्या घातल्या होत्या
🌱मग मी पण हा प्रकार घरी करून पाहिला
पुदीना आणल्यावर त्याच्या काड्या स्वच्छ धुऊन पानसकट पाण्याच्या बाटलीत ठेवल्या
शिवाय काही बाटल्यात पुदिन्याची पाने पण घातली
🌱अक्षरशः अप्रतिम चवीचे जिभे सकट मेंदूला पण थंडावा देणारे पाणी तयार झाले
🌱गेली अनेक वर्षे आमची सवय आहे की सकाळी फिरुन आल्यावर छीया सीड , आल्याचा किस व मीठ घालून लिंबू पाणी प्यायचे (साखरअजिबात नाही)
त्यात हे पुदिन्याचे पाणी वापरले तेव्हा तर फिरून दमून आलेला जीव अगदी शांतवला ♥️
🌱एकच मात्र काळजी घ्यायची एक दिवस झाला की बाटलीतील पुदिन्याची पाने काढून टाकायची
नाहीतर ही पाने कुजून जायची शक्यता असते
🌱छीया सीड पाण्यात फक्त अर्धा तास भिजवले की ते छान फुगतात
त्यात फक्त पाणी आणि मीठ घालून प्यायचे
सोबत आल्याचा किस व छीया सीड भिजवून ठेवलेला फोटो आहे
🌱पुदीना गुणधर्म गुगल ने सांगितलेले असे आहेत...
पुदिना ही एक औषधी वनस्पती आहे आणि त्याचे अनेक आरोग्यदायी गुण आहेत. पुदिना ही भारतात उगवणारी वनस्पती आहे. पुदिन्याच्या पानांचा वापर अनेक प्रकारे केला जातो.
पुदिन्याचे गुणधर्म:
• पुदिना वजन नियंत्रणात मदत करते.
• पचनक्रिया सुधारते.
• काही प्रदूषकांवर उतारा म्हणून काम करते.
• अॅसिडिटी, अपचन यांसारखे आजार क्षणात बरे होतात.
• रक्तसंचय आणि सायनुसायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
• पोटदुखीवर उपयोगी आहे.
• शरीरास थंडावा देणारी वनस्पती आहे.
• वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.
• त्वचेसाठी आणि तोंडाच्या दुर्गंधीसाठी फायदेशीर आहे.
पुदिन्याची वैशिष्ट्ये:
• पुदिना ही एक कोमल औषधी वनस्पती आहे.
• पुदिना अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
• पुदिना ही स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींपैकी एक आहे.
• पुदिन्याचे लँटिन नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे.
• हिचे लँटिन कूळ लॅमिएसी (