🌱पालक मिक्स भजी
नेहेमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारची ही भजी चविष्ट लागतात
साहित्य
पालक अर्धी जुडी
एक बटाटा 🥔साल काढून
दोन मिरच्या मध्ये कापून तुकडे करून
सात आठ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
एक इंच आले तुकडा बारीक चिरुन
अर्धी वाटी डाळीचे पीठ
एक वाटी मैदा
अर्धी वाटी 🌽 कॉर्न फ्लोअर
तीळ
हळद
ओवा
मीठ चवीनुसार
कृती
🌱प्रथम पालक जुडी ओबड धोबड चिरून घ्यावी
बारीक अजिबात चिरायची नाहीं
साल काढलेल्या बटाट्याचे लांबट आकारात लहान तुकडे करावे
🌱डाळीचे पीठ कॉर्न फ्लोअर व मैदा घेउन
त्यात पालक, मिरची, बटाटा, हळद, मीठ, तीळ, आले, लसूण , ओवा हे सर्व घालून चांगले मिसळून घ्यावे
🌱 आता या मिश्रणात थोडे थोडे पाणी मिसळून थोडा घट्टसर गोळा करुन घ्यावा
🌱 दहा मिनीटे हे मिश्रण झाकून ठेवावे
त्यानंतर एका कढईत तेल चांगले तापवावे
तेल तापले की गॅसची आच मंद करावी
या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून खरपुस तळून घ्यावेत.
छान खुसखुशीत भजी होतात 😋
आपल्या आवडीच्या चटणी अथवा सॉस सोबत खायला घ्यावी.