🍆वांग्याचे भरीत
🍆भरीत मी नेहेमीच वेगवेगळ्या प्रकारे केले जाते..
कधीं दह्यातल..
कधी मिरची घालुन..
कधीं चींच कोळ घालून...
तर कधी लसुण घालून
🍆हे खास चमचमीत कोल्हापुरी भरीत 😊
🍆कोल्हापूरात आम्हाला सगळ्या गोष्टीत लाल रंग आवडतो 😃
कांदा लसूण तिखटाची लाल तवंग आमटी..
लाल रंग आलेली भाजी
लाल भडक तर्री असलेली मिसळ वगैरे..
भरीत सुध्दा जांभळ्या वांग्याचं असो वा हिरव्या..
चांगले चरचरीत हवे
तिखट चमचमीत
आणि रंगाला लाल
तिखटाचा रंग उतरायला हवा पदार्थात 😃
🍆साहित्य
दोन मोठीं जांभळी वांगी किंवा जी उपलब्ध होतील ती..
जांभळी वांगी चवीला जास्त चांगली वाटतात
एक कांदा बारीक चिरुन
कोथींबीर चिरलेली
तिखट एक मोठा चमचा
मीठ चवीप्रमाणे
फोडणी मोहरी हिंग
🍆कृती
प्रथम तेलाचा हात लावून वांगी खरपुस भाजुन घ्या
गार झाल्यावर साल काढून गर वेगळा काढून घ्या
एका लोखंडी कढईत तेलात हिंग मोहरी ची फोडणी करून
कांदा टाका
दोन मिनीटे परतून
लगेच त्यावर एक मोठा चमचा तिखट टाका
व गॅस बंद करा
असे केल्याने रंग छान येतो
थोडे गार झाले की त्यात भाजलेल्या वांग्याचा गर चवीनुसार मीठ व चिरलेली कोथींबीर घाला
चमचमीत चविष्ट भरीत तयार आहे.
🍆लोखंडी कढईत चवीष्ट होतेच..
शिवाय शरीराला लोह सुद्धा मिळते
मात्र लोखंडी कढई मध्ये
भरीत करून झाल्यावर वेगळ्या भांड्यात काढून ठेवा