🟠आलू बोंडा
🟠थंडीचे दिवस म्हणजे गरम गरम चमचमीत खायला लागतेच
वडा तर कित्येकांचा वीक पॉइंट असतो..😊
हा चवीष्ट आलू बोंडा खाताना मजा येइल
🟠साहित्य
बटाटे चार मध्यम
हिरा बेसन दोन वाट्या
धणे पावडर एक चमचा
तिखट पाव चमचा
गरम मसाला पाव चमचा
लिंबू रस
दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर
आले एक इंचभर चिरून
मीठ चवीनुसार
🟠कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या
व थंड झाल्यावर सोलून ठेवा
आता एका वाडग्या मध्ये बेसन घ्या
त्यात चवीनुसार मीठ टाकून थोडे थोडे पाणी घालीत मिक्स करा जेणेकरून छान गुळगुळीत व थोडे घट्ट अस मिश्रण तयार होईल
हे मिश्रण कमीत कमी २० मिनिट भिजवून बाजूला ठेवा
🟠एका पसरट भांड्यामध्ये बटाटे घ्या त्यात धणे पावडर, तिखट ,गरम मसाला, लिंबूरस, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळून घ्या.
तयार मिश्रणाचे लहान लहान गोल गोल गोळे तयार करा .
🟠एका कढईत तेल गरम करायला ठेवा
बेसन पिठात थोडे कडकडीत तेल घालुन चांगले फेसुन घ्या
तयार केलेला बटाट्याचा गोळा बेसनाच्या मिश्रणात बुडवून कढईत टाका व हलका तांबूस रंग होईपर्यंत तळुन घ्या
हे गरम गरम बटाटे वडे तुम्ही टॉमेटो सॉस अथवा नारळाच्या चटणी सोबत किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता 😋