तो आणी ती : भातुकलीच्या खेळामध्ये
सर्वत्र दिवाळीचा झगमगाट होता. घरोघरी पणतीच्या चंदेरी प्रकाशाने अंगण आणी परिसर कसं उजळून निघाल होत. गावात फार तूरळक आकाशकंदील घरावर लोंबलेले दिसतात तरी आता यावर्षी हे चित्र बरंच पालटलं होत.आकाशकंदीलाची जणू लांबलचक रांगच गावात दिसत होती. त्याची ही तिच्याशिवाय पहिलीच दिवाळी होती. काळकुट्ट नभात फटक्याची आतीशबाजी व्हायची तसं त्याच्या काळजावर दुःखाचे चरे उमटायचे. बालपणासून तर आत्तापर्यंत प्रत्येक दिवाळी त्यांनी सोबतच साजरी केली होती पण आता परिस्थिती बदलली होती. ती ही शेजारून त्यालाच पाहत होती.. फरक फक्त एवढाच होता आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र होत.
अंगणात दिव्याच्या प्रकाशात सर्वजण फटाके उडवत होते. काही लहान मूले तिथेच भातूकलीच्या खेळात मग्न होते. तिथला प्रत्येकजण उल्हासाने दिवाळी साजरी करीत होता आणी 'तो'... तो..मनातल्या मनात जळत होता. विरहाचा अग्नी जरी पेटला असला तरीही त्याने वरून स्वतःला स्थीर ठेवलं होत. अलगद हळूच ती त्याच्या अंगणात आली. त्याच्याघरचे सर्वजण तिला ओळखतच होते. तिने कापऱ्या शब्दात त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानेही तिला हसून पुनःश्च शुभेच्छा दिल्या आणी बोट दाखवत म्हणाला
" किती निरागस असतात ना ही लेकरं स्वच्छ मनाने भातुकलीचा खेळ खेळतात कसलाही मुखवटा न चढवता ..नाहीतर आता चेहऱ्यावर किती मुखवटे चढवतात लोक. हा भातुकलीचा खेळ म्हणजेही गंमतच आहे हो ना? ".
दुःखी स्वरात ती म्हणाला " हो ना! हा भातुकलीचा खेळ म्हणजे गंमतच आहे.. या खेळात कसंलच आईवडिलांच मनावर ओझं नसतं.. या खेळात निदान मनासारखा नवरा तरी निवडता येतो.. नवरा म्हणून त्याला हाकही मारत येते" ती तशीच वायुवेगाने माघारी वळली आणी तो फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत होता.
समाप्त