....फुलपाखरू....
फुलपाखरू कस रंगीबेरंगी असते
फुलावरती बसल्यानेआणखी सुंदर दिसते
फुलपाखरू नाजूक किती असते
हात लावता त्याला पंख फाटते
रंग त्याचा पाहता मनमोहुनी जाते
पाहताच आपल्या मनामध्ये बसते
त्याला पाहूनी आपण दुःख विसरून जातो
पाहुनी त्याला आनंद होतो
आज जेव्हा पाहतो मी खोडी
फुलपाखराची
आठवण येते मला माझ्या खोडकर मित्राची
मित्र माझा खोडकर होता भारी
वर्गामध्ये शिकतांना खोड्या खूप करी
खोड्या करून मित्र माझा बसायचा चूप
त्यामुळे दोघांनाही मार पडायचा खूप
-Amol Wankhede