म्हैसूरचा दसरा
म्हैसूर शहरात दसरा हा मोट्या प्रमाणात व पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. हमकास म्हैसूरचा दसरा पाहण्यास हजारोनी लोक लांबून येतात. दसऱ्यादिवशी म्हैसूर शहर अगदी सोन्यानी सजवलेली लखलखीत शहर दिसतं. शहरात एंट्री करताच शहर अगदी विदयुत रोषणाईने जगमग दिसून येते, येथील म्हैसूर राजवाडा नवरात्रीचे १० दिवस अगदी फुलांच्या सजावटीनं व विदयुत रोषणाईने सजवतात. शहरात असलेल्या चामूंडेश्वरीचे मंदिर, वृंदावन गार्डन, ललित महाल, प्राणीसंग्रालय, मैसूर पॅलेस, सुद्धा अगदी नवरीला सजावल्यासारखे सजवतात.
चामुंडी बेटवर गेल्यावर तिथून आपल्याला एका नजरेत पूर्ण म्हैसूर शहराचे दर्शन होते, हे दृश्य बगताना अगदी मन तृप्त होऊन जाते. म्हैसूर शहरातील मुख्य आकर्षिक कार्यक्रम म्हणजे नवरात्रीच्या नवव्या दिवशी (महा नवमीच्या दिवशी) राजघराण्यातील तलवारीची पूजा करून, माता चामुंडेश्वरीची मिरवणुक केली जाते.
या चामुंडेश्वरीच्या मिरवणुकीमध्ये सजवलेले हत्ती, घोडे आणि उंट हे सुद्धा या मिरवणुकीत दिसते. तेथील बँडच्या तालावर लोक वाजत, गाजत, आनंदात नाचत असतात. अगदी हे दृश्य वारंवार बगण्यासारखे असते. मैसूर शहरात वृंदावन गार्डन मध्ये दसऱ्याच्या निमित्ताने फुलाचे एक्सिबिशन सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येते हे दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक येऊन येते भेट देतात. खरच म्हैसूरचा दसरा अगदी बघण्यासारखा आहे.
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solutions