दूध पिल्यानंतर लगेच या गोष्टी खाऊ नका
काही असे पदार्थ आहेत जे चुकून हि मिसळून खाऊ नये कारण त्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. दूध हे आरोग्यासाठी चांगले असल्याने आपण त्यांचे सेवन करतो. आपण जेवताना कोणतेही पदार्थ आपल्या आवडीनुसार एकत्र खातो. पण आपल्याला माहीत नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाल्ले पाहिजेत. असे कोणते पदार्थ आहेत ते एकत्र खाल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते चला तर जाणून घेऊया.
* लिंबू किंवा आंबट पदार्थ व मसाल्याचे पदार्थ खात असाल तर एक तासापर्यत दूध सेवन करणे टाळा, हे एकत्र खाल्या पिल्याने ऍसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.
* मासे खाल्याने लगेच दूध पिउ नये. असे केल्याने पाचन समस्या चा प्रॉम्ब्लेम होतो त्याशिवाय पोटदुखी सुद्धा होऊ शकते.
* दूध प्यायल्यानतंर कधीही भेंडी, कारले या भाज्या खाऊ नका. दूध प्यायल्यानतंर लगेच आपण अशा भाज्या खाल्यावर आपणाला त्वचा रोग होऊ शकतो.
* तसेच जेवणाबरोबर जर का मुळा खाल्ला असेल तर लगेच दूध पिऊ नका. मुळा खाल्यानंतर कमीतकमी दोन तासानंतर दूध घ्या.
* लिंबू आणि संत्रेवर्गीय फळे खाल्यानंतर लगेच दूध घेणे टाळा. असे केल्याने त्या व्यक्तीला उलट्यांचा त्रास होऊ शकतो. अशाप्रकारची फळे खाल्याने कमीतकमी दोन तासानंतरच दूध प्या .
* उडीद डाळ व दूध दोन्ही एकत्र घेतल्याने आपल्याला पाचक ची समस्या, पोट दुखी, उलट्या आणि आपल्या शरीरात एक प्रकारचा भारीपणा जाणवतो.
* दूध आणि मीठ एकत्र घेऊ नये
* दूध आणि दही सुधा एकत्र घेऊ नका
*दूध प्यायल्या नंतर फणसाचे सेवन करू नका
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solutions