बाजारपेठा सज्ज आहे गणपतीच्या विक्रीसाठी
गणपतीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी बाजारपेठ साहित्यांनी अगदी फुलून गेला आहे, गणरायाच्या स्वागतासाठी.
कोरोनाची संख्या कमी होत असल्यामुळे सर्व व्यावसायिकांना दुकाने रात्री उशिरापर्यत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये आनंदाची लहर आली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण बाजार पेठ गजबजायला सुरू झाली आहे. गणपती बाप्पाला सजविण्यासाठी कोणतीही कसर राहू द्यायची नाही, अशी ग्राहकांच्या इच्छापूर्ती साठी बाजारपेठ अगदी साहित्याने ओसंडून गच्चं असा भरला आहे.
पूजेचे साहित्य रंगीबेरंगी आकर्षक रेडीमेड सजावटीचे साहित्य, विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने, बाजूबंद, कंबरपट्टा, मुकुट, तोडे, जास्वंदीची कंटी, मोदक, त्रिशूळ, जास्वंदाची फुले, अष्टविनायकानी नक्षीकाम केलेली पाने, कर्णभूषण, पूजेचा पाय, आशीर्वाद हात, सुदर्शन चक्र, कलश, पूजेचे ताट या सर्व साहित्यांनी दुकाने चमकू लागलेली आहेत. त्याचबरोबर मोत्यांच्या माळा, रुद्राक्ष माळा, गणपतीचा रुमाल, शेला, गणपतीचे वेगवेगळे आकर्षक फेटे, स्टोन माळा, धूप - अगरबत्ती, चिनी बनावटीचे प्रकाश दिवे, विद्युत रोषणाई त्याचबरोबर प्रत्येक स्टाल विविध रंगांच्या प्रकाशदिव्यांनी चमकत दिसून येत आहेत. आकर्षक असे लहान मोठ्या जरीच्या फेट्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. गणरायाच्या मूर्ती प्रमाणे ग्राहक फेटे खरेदी करत आहेत.
मात्र अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नाही, तरी कोरोनाची सावधगिरी घेत आपण गणपती उत्सव साजरा करायला हवा…
Article By . Anjali Patil
Brainsmedia Solutions