Marathi Quote in Poem by Dr.Swati More

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

गटारी....

डॉ. स्वाती अनिल मोरे

व्रतवैकल्यांचा श्रावण आला दारी..
पण त्याआधी चला हो
साजरी करूया
सर्वांनी गटारी....

जरी आवडतो श्रावण
सगळ्यांना फार..
मांसाहारींची मात्र होते
महिनाभर उपासमार...

रविवार असो वा बुधवार
प्रत्येक घरातून दरवळतोय
मच्छी मटणाचा वास...
आज काय बेत आहे खास
हीच चर्चा रंगते हमखास..

मच्छीमार्केट असो की
मटण शॉप
जिथं तिथं झाली
लोकांची गर्दी अमाप

एकतरी काळी पिशवी
दिसतेय प्रत्येकाच्या हातात
तिला हलवत झुलवत
खुशीत स्वारी चालली टेचात

लसूण सोला, किसा खोबरं
कांदा चिरा नि वाटप करा
आज गृहिणीला वेळच नाई
झाली तिची फारच घाई


पापलेट फ्राय, मटणाचा रस्सा
फक्कड बेत बनला अस्सा
कोंबडी वडे व बिर्याणी भात
वाह क्या बात!वाह क्या बात!

सोबत टोमॅटो कांदा लिंबू
आता फार नका हो थांबू

पाहून ही लाजवाब मेजवानी
तोंडालाही सुटलं पाणी

मारा त्यावर आडवा हात
श्रावण मास यायच्या आत ...

काही हौशींनी केली तीही सोय,
चकण्यासंगे खास एक पेय
सोमरस पोटात गेल्याशिवाय बाय,
गटारी, गटारी सारखी वाटत नाय

सर्वांना गटारीच्या एकदम नॉन व्हेज शुभेच्छा 🍗🍗🐓🦞🍤🥃🍻

Marathi Poem by Dr.Swati More : 111821713
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now