भाग पहिला
न्याय.
( फोन ची रिंग वाजते)
राजू ; ( फोन चालू करून ) हा अब्बा साहेब बोला
अब्बा ( फोनवर) कुठं आहे साहेब
राजू : घरीच आहे उशिरा झोपेतून उठलो
रात्री बातमी बनवताना खूप उशीर झाला होता
अब्बा:. मी गांधी रोड ला आहे जमेल का यायला जरुरी काम आहे
राजू : हो येतो थोडा वेळ द्या १० मिनिटात येतो
अब्बा: हो चालेल...मारवाडी चाय वाला जवळ थांबलो आहे
राजू : हो निघतो थोड्या वेळात ( फोन बंद करून बाथरूम मध्ये जातात )
राजू : ( गांधी रोड पर्यंत चालत चालतं जावून उसाचा रस वाला आहे त्याच्या गाडी जवळ थांबतात आणि मोबाईल फोन चालू करून )
अब्बा साहेब रसवाल्या जवळ थांबलो आहे या ईकडे... ( असे बोलून फोन बंद करतात आणि रसवाले यांच्याशी बोलतात ) दोन ग्लास बनवा .( रसवाले उसाचा रस काढण्या मध्ये दंग असतात राजू कडे पाहून मान हलवून हो चा इशारा देतात तेवढ्यात समोरून अब्बा साहेब येतात आणि राजू जवळ येवून थांबतात )
अब्बा : चहा घेतली असती
राजू : नको घरी दोन वेळा चहा घेतली आहे.. रस घेवूया...( रस वाला दोन ग्लास भरून दोघांना रस देतो ग्लास हातात घेऊन )
अब्बा: एका महिलेची केस आहे त्या विषय बोलायच होत
राजू : कोणत्या संदर्भात
अब्बा : त्या महिलेने फोन केला होता थोडक्यात सांगितले की एका मुलाने तिच्याशी कोर्ट मॅरेज करून पुन्हा एका दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे तिला पोलीस स्टेशन मधून सुद्धा मदत मिळत नाही असे ती फोनवर बोलली आहे ..ती मदत मागत आहे
राजू : पोलीस मदत करीत नाहीत असे कसे होणारं.. पोलीस अधिकारी महिला ची तक्रार पहिली घेतात... काही तरी वेगळं प्रकरण असणारं ? तुमची भेट झाली का तिच्याशी
अब्बा ; नाही.. फोन वर बोलने झाले आहे माझे... बोलवू का तिला ( दोघे ही रसाचे खाली ग्लास ठेवतात)
राजू : हो बघा फोन करून.. आपल्याकडून जमेल तेवढी मदत करू
अब्बा : ( फोन चालू करून त्या महिलेशी बोलतो ,) मॅडम तुम्ही आता भेटू शकता का
महिला : ( फोन मधून महिला बोलते...)..हो.. कुठे येवू अब्बा ,: नेताजी चौकात या ( फोन बंद करतात.. अब्बा राजू कडे पाहून) ज्या मुलाने तिला धोका दिला आहे तो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे
राजू ,: बघू ...मुलगी आल्यावर कळेल काय प्रकरण आहे ते... गाडी कुठे आहे
अब्बा: तिकडे चाय वाल्या समोर उभी केली आहे.. चला आपण नेताजी चौकात थांबू येईलच आता ती
राजू : ( रस वाले यांच्या कडे पाहून) किती ग्लास झाले
रसवाले : ( डायरीत लिहून ) पहिले १५ आणि हे दोन सत्रा
राजू : ठीक आहे.... ( दोघे ही मोटार सायकल कडे जातात आणि मोटार सायकल वर बसतात आणि पुढे जातात
( शेष पुढील भागात)