*लता मंगेशकर!*
या सात अक्षरात सामावलाय भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास
आपकी सेवामे` (१९४७) या सिनेमापासून सिनेसृष्टीच्या सेवेत रुजू झालेल्या या गायिकेने `आयेगा आनेवाला` (महल १९४९) म्हणत आपलं आगमन ठणकावून जाणवून दिलं. `रसिक बलमा...` (चोरी चोरी १९५६) म्हणत तिने घेतलेल्या तानेने मग अशी काही कमाल केली की सारे रसिक कानामनाने या `मधुमती`च्या ( आजा रे परदेसी. संगीतकार सलील चौधरी. १९५८) सेवेलाच लागले. मग `बरखा बहार आयी` (परख १९६०) म्हणत हा स्वर बहरतच राहिला. रसिकांच्या कानामनात विहरत राहिला.
लतादीदींनी सिनेमात गायलेलं हे पहिलं गाणं (नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी, संगीत सदाशिवराव नेवरेकर) रिलिज झालेलंच नाही. नंतर बालगायिका म्हणून त्यांचं गाणं `पहिली मंगळागौर` या सिनेमात आलं. (नटली चैत्राची नवलाई, संगीत दादा चांदेकर) ते त्यांच्यावरच चित्रित झालं होतं.
आर. डी. (बर्मन) ने माझ्यासाठी गाणं म्हणाल का?` असं विचारता त्या तयार झाल्या. ते गाणं (घर आजा घिर आये- छोटे नबाब १९६१) त्यांनी असं काही गायलं की मोठ्या बर्मननाही रहावलं नाही.
पुढच्याच सिनेमासाठीची गाणी (बंदिनी) त्यांनी लतादीदींकडून गाऊन घेतली.
लतादीदीने ही मनापासून गायले (मोरा गोरा रंग लईले, जोगी जबसे तु आया मेरे द्वारे)
धाकटी बहिण आशा (भोसले), जिच्यासोबत त्यांनी बडी माँ नावाच्या सिनेमात एकत्र कामही केलं. तिच्यासाठी पार्श्वगायनही केलं. (याची कथा वि. स. खांडेकरांची होती. निर्मिती आणि दिग्दर्शन होतं मास्टर विनायकांचं
लता मंगेशकर नामक देह इथे यापुढे जरी नसला, तरी त्यांचा स्वर मात्र आपल्या मनात असेलच.
आपल्या श्रृतीत लता दिदिंच असं असणं चिरंतनच आहे.
तिथे ही स्वरलता कायम बहरलेली होती, बहरलेलीच राहिल.