दोस्तीत सर्व चालते.
दोस्ती एक कला आहे. ज्याला दोस्त आहे तो
दोस्तामध्ये अमर झाला.
ज्याला मित्र आहेत तो मोक्षाला पात्र ठरला. जीवाभावाचे मित्र दोस्तीसाठी प्राणाची कुर्बानी देण्यास सज्ज.
याउलट जिवाभावाचे मित्र दुश्मनी झाल्यावर जीव घेतात.
कुटुंबे दचकतात.
भग्न होतात.
नाती तुटतात.
समाज विध्वंसतो. नासतो. माणुसकी तुटते. दोस्ती मरते. हे दोस्तीतच घडतं बिंधास्त. हे मैत्रीतच होते अविश्वासाने. म्हणून तर गद्दारीचं फावतं. दोस्तीला शाप आहे तुटण्याचा.
मैत्रीला दुर्गंध येतो गैरसमजाचा.
क्षुल्लक संशयाने मरते यारी...
बेइमानी कट्टर वैरी गद्दारी...
-Chandrakant Pawar