बालपणी भातुकलीच्या खेळात...
आवडीने नवरी व्हायचीस... मीच नवरा हवा यासाठी हट्ट धरायचीस...
तू आता कुठे असशील...
मी ही आता कुठेतरी आहे.
तू असशील कुणाचा तरी संसार फुलवीत...
मीसुद्धा अडकलो आहे स्वतःच्या संसारात... खरंच...ग... तू आता कुठे आहेस...
मी नाही दिसलो तर रडायचीस.
मी नाही बोललो तर
नाराजायचीस...
तू नाही भेटलीस तर राणी
वेडापिसा व्हायचो
मी लहानपणी...
भातुकलीच्या खेळात तु माझी असायचीच...
मी तुझा असायचो ...
हे काय घडलं.
तू कुठे...
मी कुठे...
तू तिथे...
मी इथे...
-Chandrakant Pawar