झाडाला मारायला टपलेला माणूस...
माणसाला वृक्ष घेतात सावलीत... माणूस बघतो वाट.झाड मरणाची... शक्कल लढवतो झाड कापण्याची... झाडे दीर्घायुषी. माणूस अल्पायुषी. पुरावा लेखी वृक्षांचे आयुष्य सुमारे पाचशे वर्ष...
मानवाचे जीवन किती... अंदाजे शंभर वर्षे...
झाड परिघात प्राणवायू पुरवते. माणूस परिसरात प्रदूषण करतो. दुर्गंधी पसरवतो.
झाडा सोबत जगतात वेली, झुडपे,तृणे.
माणूस जगतो घरात... गात निसर्ग गाणे.
झाड सजीव... माणूस सजीव.
साम्य एक स्थळ. वृक्षलागवडीचे उत्सव क्वचित काळ.
वटपौर्णिमेच्या सणात. एकदाच वृक्ष पूजा होते. माणूस आणि झाड यामध्ये फरक काय... झाड स्थिर आहे... अचल.
माणूस अस्थिर आहे... चलबिचल.
याचे कारण काय माहित हाय...
माणसाचे दोन हात... दोन पाय
-Chandrakant Pawar