हे राम... रघुपति राघव राजाराम... जेव्हा जेव्हा आंधी येईल. तेव्हा-तेव्हा गांधी येईल...
तोपर्यंत नेहरू, लालबहादूर श्यामाप्रसाद,इंदिरा, सावरकर असतील.
त्याआधी लोकमान्य टिळक जन्मतील. त्याच्याही आधी जनतेचा राजा शिवाजी येईल. नंतर येतील मोगल, तुघलक .ठीक त्यानंतर आक्रमणकर्ते येतील. सनातनी कौरव-पांडव रावण लढतील. थोर बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतील .अगदी शेवटी येतील माननीय समाजसेवक.
जोपर्यंत सूर्य चंद्र उगवतील. तोपर्यंत माणुसकी राहिल. जग चालेल. जनता धावेल. तिरंगा ध्वज फडकत राहिल. यदा यदा ही धर्मस्य... ग्लानिर्भवति भारत...
तदा तदा अवतरतील
महादर्शने...
-Chandrakant Pawar